महाराष्ट्र

तलाठी भरतीला मुहूर्त: पहिल्या टप्प्यात होणार एक हजार पदांची भरती!
महाराष्ट्र

तलाठी भरतीला मुहूर्त: पहिल्या टप्प्यात होणार एक हजार पदांची भरती!

मुंबई, : महसूल विभागाअंतर्गत तलाठी भरती प्रक्रिया करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात तलाठी संवर्गातील भरण्यात येणाऱ्या १ हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्यात यावी असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे - पाटील यांनी आज दिले. विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव असिम गुप्ता, महसूल विभागाचे सहसचिव श्रीराम यादव, सहसचिव संजय बनकर यांच्यासह महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.  गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा तलाठी याच्याशी संबंध येत असतो. सातबारा, दाखले यासाठी नियमितपणे तलाठी यांच्या संपर्कात राहावे लागते. सध्या तलाठ्याकडे ३ ते ४ गावांचा पदभार असल्याने गावोगावी जावे लागते. गावोगावच्या कार्यालयीन कामकाजाचे नियोजन करताना वार ठरवून घेण्या...
कुलगुरू महोदय, फेलोशिपधारकांकडून आठवड्याला किमान दहा तास काम घ्या, अध्यापकांचा दुष्काळ संपवा आणि पैसेही वाचवा!
महाराष्ट्र, विशेष

कुलगुरू महोदय, फेलोशिपधारकांकडून आठवड्याला किमान दहा तास काम घ्या, अध्यापकांचा दुष्काळ संपवा आणि पैसेही वाचवा!

औरंगाबादः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पूर्णवेळ संशोधन करणाऱ्या विशेषतः विविध संस्थांकडून फेलोशिप घेणाऱ्या संशोधक छात्रांसाठी बायोमेट्रिक उपस्थिती अनिवार्य केल्यामुळे या निर्णयाच्या विरोधात संशोधक छात्र आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. मात्र यूजीसी, सीएसएसआर आणि विविध राज्यस्तरीय संस्थांकडून ज्या नियम व अटींच्या अधीन राहून ही फेलोशिप बहाल करण्यात येते, त्याची अंमलबजावणी विद्यापीठ प्रशासनाकडूनच करून घेण्यात येत नसल्याची धक्कादायक माहिती आहे. या फेलोशिपधारकांकडून आठवड्याला दहा तासांपेक्षा जास्त होणार नाही, एवढा काळ काम करून घेणे अपेक्षित असताना विद्यापीठ प्रशासन या फेलोशिपधारकांना मोकळीक देत असल्यामुळे ते उंडारू लागले आहेत. त्यामुळे आता विद्यापीठ प्रशासनाने नियम व अटींच्या अंमलबजावणीचा बडगा उगारून त्यांना कामाला लावण्याची गरज निर्माण झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा वि...
शाळा, महाविद्यालयातील लैंगिक अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी राज्यात प्रभावी उपाययोजनाः फडणवीस
महाराष्ट्र

शाळा, महाविद्यालयातील लैंगिक अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी राज्यात प्रभावी उपाययोजनाः फडणवीस

नागपूर: शाळा, महाविद्यालयातील किशोरवयीन मुलांमध्ये अश्लील व्हिडिओ व तत्सम चित्रिकरण यांच्या प्रभावामुळे विकृत दृष्टीकोन निर्माण होणे व त्यातून लैंगिक अत्याचार/ हिंसेच्या घटना घडू नयेत यासाठी राज्यात प्रभावी उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली. मुंबईतील माटुंगा येथील महानगरपालिकेच्या शाळेतील तेरा वर्षीय विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेबाबत सदस्य उमा खापरे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले होते. त्याला उत्तर देतांना उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. माटुंगा येथील घटना चिंताजनक आहे. या घटनेचा तपास सुरू आहे. अशा विकृतींना आळा घालणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. सायबर गुन्ह्यांबाबत  संबंधित प्राप्त तक्रारीची तांत्रिक तपासणी करण्यासाठी राज्यामध्ये प्रत्येक पोलीस ठाण्यात सायबर प्रयोगशाळा स्था...
शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत राज्यपाल कोश्यारी म्हणाले, शिवाजी जुन्या काळातील आदर्श, नितीन गडकरी तर…
महाराष्ट्र, विशेष

शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत राज्यपाल कोश्यारी म्हणाले, शिवाजी जुन्या काळातील आदर्श, नितीन गडकरी तर…

औरंगाबादः महाराष्ट्राचे राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करत ते जुन्या काळातील आदर्श असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले. शिवाजी तर जुन्या काळातील आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील, असे कोश्यारी म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षांत समारंभात कुलपती म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी बोलत होते. शाळेत शिक्षण घेताना तुमचे आवडते नेते कोण असा प्रश्न आम्हाला शिक्षक विचारायचे. तेव्हा आमच्यापैकी काही जण सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी तर काही जण पंडित जवाहरलाल नेहरी यांचे नाव सांगायचे. शिवाजी तर जुन्या काळातील आदर्श होते. आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून नितीन गडकरी यांच्यापर्यंत नव्या युगाचे आदर्श सापडतील, असे कोश्यार...
काहीही झालं तरी धीर सोडू नका, मदत देण्यास सरकारला भाग पाडूः उद्धव ठाकरे यांचा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा
महाराष्ट्र

काहीही झालं तरी धीर सोडू नका, मदत देण्यास सरकारला भाग पाडूः उद्धव ठाकरे यांचा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा

औरंगाबादः परतीच्या पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आजपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी आज औरंगाबाद जिल्ह्याच्या गंगापूर तालुक्यातील दहेगाव व पेंढापूर येथील शेतीच्या नुकसानीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. काहीही झाले तरी धीर सोडू नका, अशा शब्दांत त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा आहे. यावेळी शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या. जे सुरू आहे ते सर्व दुर्दैवी आहे. पण तुम्ही काळजी करू नका, धीर सोडू नका. मी तुमच्या सोबत आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. संकटे येत असतात. त्या संकटांना सामोरे जायचे आहे. काहीही झालं तरी तुम्ही धीर सोडू नका. आता रडायचे नाही, लढायचे आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.  कोरोनाच्या काळात अर्थव्यवस्था ठप्प असताना शेतकरी जर उभा राहिला नसता तर आपल्या राज्याच...
वीज मनोरे व वाहिन्या उभारण्यासाठीच्या जमिनीसाठी देणार तीन वर्षातील खरेदी-विक्री व्यवहारातील सर्वाधिक दराने मोबदला
महाराष्ट्र

वीज मनोरे व वाहिन्या उभारण्यासाठीच्या जमिनीसाठी देणार तीन वर्षातील खरेदी-विक्री व्यवहारातील सर्वाधिक दराने मोबदला

मुंबईः अति उच्च दाब पारेषण वाहिन्यांसाठीच्या मनोऱ्यांसाठी जमिनीचा मोबदला देण्याकरिता सुधारित धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. वीज मनोरा आणि वाहिनी उभारण्यासाठी जमिनीचे अधिग्रहण केले जात नाही.  केवळ जमिनीचा वापर केला जातो. मनोरा उभारतांना जमिनीच्या आणि पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपोटी मोबदला दिला जातो. यासाठी सध्या असलेल्या शासनाच्या धोरणात सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. सध्याच्या धोरणात बाधित शेतकरी आणि जमीन मालकांना मिळणारी नुकसान भरपाई तुटपुंजी असल्याने त्यांचा तीव्र विरोध होत आहे. त्यामुळे पारेषण कंपन्याचे विविध प्रकल्प रखडले आहेत. नव्या धोरणामुळे मनोरा आणि वाहिनी उभारणी वेगाने होवून वीज निर्मितीस मदत होईल. या सुधारित धोरणाप्रमाणे ६६ के.व्ही. व त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या अतिउच्चदाब पारेषण वाहिन्यांसा...
प्रत्येक जिल्ह्यात कामगार रुग्णालये, तक्रार निवारणासाठी कामगार हेल्प लाईन
महाराष्ट्र

प्रत्येक जिल्ह्यात कामगार रुग्णालये, तक्रार निवारणासाठी कामगार हेल्प लाईन

मुंबई: राज्यातील कामगारांच्या पाल्यांना डॉक्टर होता यावे, यासाठी कर्मचारी राज्य विमा मंडळाच्या रुग्णालयामध्ये राज्याच्या प्रादेशिक विभागात प्रत्येकी एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्याची शिफारस कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी  गुरूवारी केली. कर्मचारी राज्य विमा मंडळाच्या महाराष्ट्र प्रादेशिक विभागाची ११३ वी बैठक आज मंत्रालयात पार पडली. यावेळी राज्यातील प्रादेशिक विभागात प्रत्येकी एक वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात यावे, यासाठी मंत्री डॉ.खाडे यांनी मान्यता दिली. या बैठकीस आमदार श्रीमती उमा खापरे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव नवीन सोना, कामगार आयुक्त सुरेश जाधव, कर्मचारी राज्य विमा मंडळाचे वरिष्ठ अधिकारी तसेच मंडळ सदस्य उपस्थित होते. कामगार मंत्री डॉ.खाडे यांनी उद्योग असलेल्या प्रत्येक जिल्ह्यात एक कामगार रुग्णालय बांधण्याच्या सूचना केल्या. ...
विद्यापीठे-महाविद्यालयांच्या सर्व परीक्षा ३१ मेपर्यंत आणि निकाल ३० जूनपर्यंतच, चंद्रकांत पाटलांनी दिली डेडलाईन
महाराष्ट्र, विशेष

विद्यापीठे-महाविद्यालयांच्या सर्व परीक्षा ३१ मेपर्यंत आणि निकाल ३० जूनपर्यंतच, चंद्रकांत पाटलांनी दिली डेडलाईन

मुंबईः राज्यातील विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या परीक्षा ३१ मेपर्यंत पूर्ण होतील याचे नियोजन करून ३० जूनपर्यंत निकाल जाहीर करावेत. जून-जुलैमध्ये सीईटी परीक्षा, निकाल आणि प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून १ ऑगस्टपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासाठी वेळापत्रकाचे नियोजन करा, अशा सूचना करत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील विद्यापीठांना डेडलाईन ठरवून दिली. राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या संयुक्त मंडळाची बैठक राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली राजभवनात संपन्न झाली. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी या सूचना केल्या. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, तंत्र शिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, उपसचिव अजित बाविस्कर, उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, शैक्षणिक शुल्क समितीचे अध्यक्ष विजय अचलिया, माजी मुख्य सचिव जे.पी. डांगे व सर्व व...
कर्नाटकच्या मराठीविरोधी प्रवृत्तीचा विधिमंडळात एकमुखाने निषेध ठराव, सीमा भागातील इंच न् इंच जमीन महाराष्ट्रात आणणार
देश, महाराष्ट्र, विशेष

कर्नाटकच्या मराठीविरोधी प्रवृत्तीचा विधिमंडळात एकमुखाने निषेध ठराव, सीमा भागातील इंच न् इंच जमीन महाराष्ट्रात आणणार

नागपूर: कर्नाटक शासनाच्या मराठी विरोधी प्रवृत्तीचा तीव्र शब्दांत निषेध करणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलेला ठराव मंगळवारी महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत एकमताने मंजूर करण्यात आला. महाराष्ट्र- कर्नाटक सीमा भागातील बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदर या शहरांसह ८६५ गावांतील मराठी भाषक जनतेसोबत महाराष्ट्र शासन खंबीरपणे निर्धाराने व सर्व ताकदीनिशी उभे आहे. सीमा भागातील इंच न् इंच जमीन तिथल्या मराठी भाषिक नागरिकांसह कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी आवश्यक तो सर्व कायदेशीर पाठपुरावा सर्वोच्च न्यायालयात करण्याचा आणि सीमा भागातील मराठी जनतेच्या सुरक्षिततेची हमी घेण्यासाठी कर्नाटक सरकारला समज देण्यात यावी, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दोन्ही सभागृहांत मांडलेल्या ठरावात म्हटले आहे. सभागृहातील दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी बाके वाजवत एकमताने ...
उच्च शिक्षण संचालकांचे अधिसंख्य पद निर्माण करून डॉ. धनराज मानेंना अभय; दर्जा आणि वेतन कायम, पण काम बदलले!
महाराष्ट्र

उच्च शिक्षण संचालकांचे अधिसंख्य पद निर्माण करून डॉ. धनराज मानेंना अभय; दर्जा आणि वेतन कायम, पण काम बदलले!

पुणेः  दृष्टीदोषामुळे सेवा करण्यास पूर्णपणे आणि कायमपणे अक्षम असलेले राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांना दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमातील तरतुदींचा दाखला देत  उच्च शिक्षण संचालकाचे एक अधिसंख्य पद निर्माण करून अभय देण्यात आले आहे. त्यांचा दर्जा आणि वेतन कायम ठेवण्यात आले असले तरी त्यांच्या कामाचे स्वरुप मात्र बदलले आहे. त्यांच्याकडे आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीचे कामकाज सोपवण्यात आले आहे. यासंबंधीचा शासन आदेश १६ नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आला आहे. डॉ. धनराज माने यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उच्च शिक्षण संचालनालयात संचालकपदी (गट-अ) नियुक्ती करण्यात आली होती. परंतु डॉ. धनराज माने यांना दृष्टीदोष असून ते काम करण्यास सक्षम नाहीत, अशा आशयाच्या तक्रारी झाल्यानंतर राज्य सरकारने सर जे.जे. रूग्णालयाच्या वैद्यकीय मंडळामार्फत वैद्यकीय तपासणीचे आदेश द...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!