एनएसएफडीसी कर्ज योजनेच्या लाभार्थ्यांची यादी जाहीर, जिल्हा कार्यालयात तत्काळ जमा करा ‘ही’ कागदपत्रे


मुंबई: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत २०२३-२४ मध्ये विविध योजना राबवल्या जात आहेत. या महामंडळांतर्गत एनएसएफडीसीच्या कर्ज योजनेसाठी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या एनएसएफडीसी योजना कर्ज प्रस्तावाबाबत ज्या लाभार्थीनी यापूर्वी एनएसएफडीसी कर्ज योजनेअंतर्गत लघु उद्योगासाठी १ लाख रुपये ते २ लाख रुपये, महिला समृध्दी योजना व लघु ऋण वित्त योजना यासाठीचे कर्ज प्रस्ताव जिल्हा कार्यालयात दाखल केले असून ज्याची लाभार्थी निवड समिती झालेली आहे व जे परिपूर्ण कर्जप्रस्ताव जिल्हा कार्यालयामार्फत प्रधान कार्यालय मंजुरीसाठी शिफारस करण्यात आले आहेत, अशा लाभार्थ्यांची यादी महामंडळाच्या सूचना फलकावर लावलेली आहे.

आता संबंधित अर्जदारांनी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात संपर्क करुन पुढीलप्रमाणे कागदपत्रे तत्काळ दाखल करावी-

 • लाभार्थ्याचा सिबील क्रेडिट स्कोअरसाठी सिबील रिपोर्ट.
 • लाभार्थ्याचे उद्योग आधार प्रमाणपत्र.
 • लाभार्थ्याचा विनंती अर्ज-कागदपत्रे खरी असल्याबाबत व ज्या जागी व्यवसाय चालू आहे. त्याच जागेचे प्रमाणित केलेले छायाचित्र.
 • चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी दाखला.
 • दोन सक्षम जामीनदारांपैकी नोकरदार असेल तर त्याच्या कार्यालयाचे लाभार्थ्याने वसुलीचा भरणा के ला नाही तर जामीनदाराच्या पगारातून कपात करून भरणा करण्यात येईल असे कार्यालयाचे हमीपत्र.
 • जर लाभार्थ्यांचा जामीनदार सरकारी नोकरदार असेल व तो सेवानिवृत्त झालेला असेल त्याच्या ऐवजी ज्या कर्मचाऱ्याची सेवा ५ ते ६ वर्ष बाकी आहे असा जामीनदार घेणे आवश्यक.
 • जिल्हा व्यवस्थापक यांचा स्थळपाहणी अहवाल व शिफारस.
 • अर्जदाराचे वारसदाराच्या स्वाक्षरीसह नामांकन शपथपत्र व त्यांचे आधारकार्डची झेरॉक्स प्रत.
 • यापूर्वी कर्जाच्या अर्जाबरोबर सादर केलेल्या इतर कागदपत्रांची खातरजमा उदा. जातीचा दाखला, रेशनकार्ड, रहिवाशी दाखला, निवडणूक आयोग ओळखपत्र इत्यादी.
 • लाभार्थ्याचा आधारकार्ड क्रमांक तसेच आधार संलग्न (Link) बँक खाते क्रमांक.
 • जी.एस.टी. क्रमांकासह व्यवसायाचे दरपत्रक.
 • अर्जदाराचे विहित नमुन्यातील शपथपत्र.

ही कागदपत्रे तत्काळ दाखल करावीत. आपली कागदपत्रे तत्काळ पूर्ण करून दाखल करून जास्तीत जास्त अर्जदारांनी शासकीय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!