उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयात ‘ठाकुरी जादू’चे सुरेल प्रयोग: न्यायप्रविष्ठ प्रकरणात ‘कॅस’ करण्यास आधी नकार, नंतर होकार!
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद): औरंगाबाद विभागाच्या उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयात निर्णयाची भराभर अफरातफर होताना दिसत असून न्यायप्रविष्ठ प्रकरण असल्याचे कारण देऊन एका सहयोगी प्राध्यापकाला कॅस अंतर्गत अकॅडमिकस्तर मंजुरीसाठी शासन प्रतिनिधी देण्यास उच्च शिक्षण सहसंचालकांनी आधी स्पष्ट शब्दांत दिलेला नकार अवघ्या १७ दिवसांमध्येच ‘होकारा’त बदलला आहे. त्यामुळे उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयात ‘ठाकुरी जादू’चे सुरेल प्रयोग सुरू असल्याची चर्चा उच्च शिक्षण क्षेत्रात होऊ लागली आहे.
गंगापूर तालुक्यातील दगडोजीराव देशमुख महाविद्यालयातील ग्रंथपाल डॉ. भगवान रामभाऊ डोके यांनी कॅस अंतर्गत अकॅडमिक स्तर १३ए मंजुरीसाठी औरंगाबाद विभागाच्या उच्च शिक्षण सहसंचालकांकडे १७ मार्च २०२३ रोजी शासन प्रतिनिधीची मागणी केली होती. परंतु डॉ. डोके यांचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे कारण देऊन उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. सुरेंद्र...