संभाजीनगरातील दंगलीची होणार एसआयटीमार्फत चौकशी, २५ दंगेखोरांची ओळख पटवण्यात यश ; ८ दंगेखोरांना पोलिस कोठडी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद): श्रीराम नवमीच्या आदल्या रात्री छत्रपती संभाजीनगरातील किराडपुरा भागात झालेल्या दंगलीची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्याचा निर्णय पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी घेतला आहे. सिडको पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली सात पोलिस अधिकारी आणि तीन पोलिस कर्मचाऱ्यांचे पथक या दंगलीची चौकशी करणार आहे. दरम्यान, या दंगलीस कारणीभूत असलेल्या २० ते २५ जणांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या किराडपुरा भागात तरूणांच्या दोन गटात गुरुवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे रुपांतर नंतर जाळपोळ, दगडफेक आणि हाणामारीत झाले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना गोळीबार, अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर करावा लागला होता. या दंगलीनंतर संभाजीनगर पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवत श्रीराम नवमीचा उत्सव नि...