मुंबईः भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पक्षाची नवीन प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली आहे. या नव्या जम्बो कार्यकारिणीत पश्चिम महाराष्ट्राला सर्वाधिक ५ उपाध्यक्षपदे देण्यात आली आहेत. विदर्भ- मराठवाड्याला मात्र प्रत्येकी तीन उपाध्यक्षपदे देण्यात आली आहेत.
उपाध्यक्षः माधव जनार्दन भंडारी (कोकण), चैनसुख मदनलाल संचेती (पश्चिम विदर्भ), सुरेश गणपती हळवणकर(पश्चिम महाराष्ट्र), संजय विश्वनाथराव भेगडे (पश्चिम महाराष्ट्र), अमर शंकर साबळे (पश्चिम महाराष्ट्र), श्रीमती स्मिता उदय वाघ (उत्तर महाराष्ट्र,) जयप्रकाश चंद्रबली ठाकूर ( मुंबई), संजय नथ्थुजी भेंडे (पूर्व विदर्भ), गजानन विट्ठलराव घुगे (मराठवाडा), राजेश बाबूलाल पांडे (पश्चिम महाराष्ट्र), विक्रम विनायक पावसकर (पश्चिम महाराष्ट्र), अतुल सुधाकर काळसेकर ( कोकण), श्री. अजित माधवराव गोपछडे (मराठवाडा), एजाज देशमुख (मराठवाडा), धर्मपाल नथ्थुजी मेश्राम (पूर्व विदर्भ), राजेंद्र गावित (उत्तर महाराष्ट्र)
सरचिटणीसः अॅड. माधवी संजय नाईक (ठाणे), विक्रांत बाळासाहेब पाटील (कोकण), मुरलीधर किसनराव मोहोळ ( पश्चिम महाराष्ट्र), रणधीर प्रल्हादराव सावरकर (विदर्भ), संजय किसनराव केनेकर (मराठवाडा), विजय वसंतलाल चौधरी (उत्तर महाराष्ट्र).
चिटणीसः भरत बाबुराव पाटील (पश्चिम महाराष्ट्र), जयंत किसनराव डेहनकर (पश्चिम विदर्भ), वर्षा चंद्रकांत डहाळे (पश्चिम महाराष्ट्र), सुरेखा विट्ठल थेतले (कोकण), अरुण भाऊसाहेब मुंडे (उत्तर महाराष्ट्र), महेश बाळासाहेब जाधव (पश्चिम महाराष्ट्र), राणी राजेश द्विवेदी (मुंबई), विद्या उत्तम देवाळकर (पूर्व विदर्भ), अजय एकनाथ भोळे (उत्तर महाराष्ट्र), देविदास चंदर राठोड (मराठवाडा), शालिनीताई राजेंद्र बुंधे (मराठवाडा), सरीता विजय गाकरे (पश्चिम विदर्भ), योगिता निलेश पाटील (कोकण), सुरेश पांडुरंग बनकर (मराठवाडा), किरण नारायणराव पाटील (मराठवाडा), नवनाथ विष्णुपंत पडळकर (पश्चिम महाराष्ट्र).
कोषाध्यक्षः मिहीर चंद्रकांत कोटेचा (मुंबई), रविंद्र अनासपुरे (मुख्यालय प्रभारी),
संघटन मंत्रीः उपेंद्र मार्तंडराव कोठेकर (विदर्भ विभाग), मकरंद सुधाकर देशपांडे (पश्चिम महाराष्ट्र), संजय कल्लपा कौडगे (मराठवाडा), शैलेंद्र जीजी दळवी (कोकण विभाग), हेमंत सदानंद म्हात्रे (ठाणे विभाग).