चंद्रकांत पाटलांनी ‘प्राथमिक शिक्षण’ पूर्ण केलं असतं तर…. रुपाली चाकणकरांचा खोचक टोला
मुंबईः महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भीक मागून शाळा चालवल्या, असे वादग्रस्त वक्तव्य करून महापुरूषांचा अपमान करणारे भाजप नेते आणि राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर सर्वस्तरातून टिकेची झोड उठली असून ‘चंद्रकांत पाटलांनी ‘प्राथमिक शिक्षण’ पूर्ण केलं असतं तर त्यांनी असे वक्तव्य केलेच नसते’ असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी लगावला आहे.
पैठण येथील संतपीठाच्या प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात बोलताना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भीक मागून शाळा चालवल्या, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले आहेत. चंद्रकांत पाटलांच्या निषेधार्थ काल औरंगाबादेत विविध संघटनांच...