राज्यातील सर्व विद्यापीठांतील विद्यार्थ्यांना या वर्षासाठी मिळणार कॅरिऑन, उच्च शिक्षणमंत्र्यांचे कुलगुरूंना निर्देश


मुंबई: राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांमध्ये विद्यार्थी हितासाठी कॅरी ऑन योजना लागू करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेची संधी देण्यासाठी विद्यापीठांच्या पातळीवर एक समानता ठेवावी तसेच या वर्षासाठी सर्व विद्यार्थ्यांना कॅरिऑनद्वारे प्रवेशाची संधी द्यावी, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील विद्यापीठांना दिले.

मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची ऑनलाईन बैठक झाली. 

या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उपसचिव अशोक मांडे, उपसचिव प्रताप लुबाळ, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर तसेच राज्यभरातील विविध अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू, कुलसचिव आणि संबंधित अधिकारी ऑनलाइनउपस्थित होते.

 काही वेळा शैक्षणिक कारणांमुळे किंवा अन्य परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देताना अडचणी येतात, त्यांना पुन्हा संधी  देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रवासातील अडथळे दूर करण्यासाठी ‘कॅरी ऑन योजनेचा’ उपयोग होतो. मात्र याबाबत सर्व विद्यापींठाच्या पातळीवर एकसमानता असली पाहिजे. यासाठी  कालबद्ध नियोजन करावे,अशा सूचना पाटील यांनी दिल्या.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, त्यांचे वर्ष वाया जाऊ नये, यासाठी कॅरी ऑन योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना या वर्षासाठी पुन्हा संधी उपलब्ध करून देण्यात यावी, असे निर्देशही पाटील यांनी यावेळी विद्यापीठांना दिले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!