राज्यात वयाची शंभरी पार केलेल्या मतदारांची संख्या ४७ हजारांवर, एकूण मतदारांची संख्या ९ कोटी ७० लाखांहून अधिक!


मुंबई: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्यात ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये ५ कोटी २२ हजार ७३९ पुरूष मतदार असून ४ कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ महिला मतदार आहेत. तर ६ हजार १०१ तृतीयपंथी मतदार आहेत. राज्यात शंभरी पार केलेल्या मतदारांची संख्या ४७ हजारांवर असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.

राज्यात सर्वात जास्त मतदार पुणे जिल्ह्यात आहेत. पुणे जिल्ह्यात ८८ लाख ४९ हजार ५९० मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये ४५ लाख ७९ हजार २१६ पुरूष मतदार, ४२ लाख ६९ हजार ५६९ महिला मतदार तर ८०५ तृतीयपंथी मतदार  आहेत. राज्यात सर्वात कमी मतदारांची संख्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ लाख ७८ हजार ९२८ इतक्या मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये ३ लाख ३६ हजार ९९१ पुरूष मतदार, ३ लाख ४१ हजार ९३४ महिला मतदार तर ३ तृतीयपंथी मतदार आहेत.

राज्यात वयाची शंभरी पार केलेले ४७ हजार ३८९ इतक्या मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये पुरूष मतदार २१ हजार ८९ आहेत, महिला मतदारांची संख्या २६ हजार २९८ आहे तर २ तृतीयपंथी मतदार आहेत.

कोणत्या वयोगटात किती मतदार?

  •  ४० ते ४९ या वयोगटातील एकूण २ कोटी ७ लाख ३० हजार ५९८ मतदारांमध्ये पुरुष मतदार १ कोटी ७ लाख ४९ हजार ९३२, महिला मतदार ९९ लाख ७९ हजार ७७६ तर तृतीयपंथी मतदारांची संख्या ८९० आहे.
  •  ५० ते ५९ या वयोगटातील एकूण १ कोटी ५६ लाख १० हजार ७९४ मतदारांमध्ये पुरुष मतदार ७८ लाख ५४ हजार ०५२, महिला मतदार ७७ लाख ५६ हजार ४०८ तर तृतीयपंथी मतदारांची संख्या ३३४ आहे.
  • ६० ते ६९ या वयोगटातील एकूण ९९ लाख १८ हजार ५२० मतदारांमध्ये पुरुष मतदार ५० लाख ७२ हजार ३६२, महिला मतदार ४८ लाख ४६ हजार २५ तर तृतीयपंथी मतदारांची संख्या १३३ आहे.
  • वर्ष ७० ते ७९ या वयोगटातील एकूण ५३ लाख ५२ हजार ८३२ मतदारांमध्ये पुरुष मतदार २६ लाख ३६ हजार ३४५, महिला मतदार २७ लाख १६ हजार ४२४ तर तृतीयपंथी मतदारांची संख्या ६३ इतकी आहे.
  • ८० ते ८९ या वयोगटातील एकूण २० लाख ३३ हजार ९५८ मतदारांमध्ये पुरुष मतदार ९ लाख १५ हजार ७९८, महिला मतदार ११ लाख १८ हजार १४७ तर तृतीयपंथी मतदारांची संख्या १३ इतकी आहे.
  • ९० ते ९९ या वयोगटातील एकूण ४ लाख ४८ हजार ३८ मतदारांमध्ये पुरुष मतदार १ लाख ९७ हजार ३२३ तर महिला मतदारांची संख्या २ लाख ५० हजार ७१५ इतकी आहे.
  • वयाची शंभर वर्षे पूर्ण झालेल्या १०० ते १०९ या वयोगटातील एकूण ४७ हजार १६९ मतदारांमध्ये पुरुष मतदार २० हजार ९८३, महिला मतदार २६ हजार १८४ तर तृतीयपंथी मतदारांची संख्या २ आहे.
  • ११० ते ११९ या वयोगटातील एकूण ११३ मतदारांमध्ये पुरुष मतदार ५२ तर महिला मतदारांची संख्या ६१ आहे. तर १२० हून अधिक वयोगटातील ११० मतदारांमध्ये पुरुष मतदार ५६ तर महिला मतदारांची संख्या ५४ आहे.
  • विशेष वयोगटामध्ये ८५ ते १५० वयोगटामधील एकूण १२ लाख ४० हजार ९१९ मतदारांमध्ये ५ लाख ४२ हजार ८९१ पुरुष, ६ लाख ९८ हजार ०२२ महिला आणि ६ तृतीयपंथी मतदार आहेत.
  •  १०० ते १५० वयोगटामधील एकूण ४७ हजार ३९२ मतदारांमध्ये २१ हजार ९१ पुरुष, २६ हजार २९९ महिला आणि २ तृतीयपंथी मतदार आहेत.
  • एकूण ६ लाख ४१ हजार ४२५ दिव्यांग मतदारांमध्ये पुरुष मतदार ३ लाख ८४ हजार ६९, महिला मतदार २ लाख ५७ हजार ३१७ तर तृतीयपंथी मतदारांची संख्या ३९ इतकी आहे.
  • सेवा दलातील (सर्व्हिस व्होटर्स)  एकूण १ लाख १६ हजार १७० मतदारांमध्ये १ लाख १२ हजार ३१८ पुरुष तर ३ हजार ८५२ महिला मतदार आहेत.
संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *