छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्जांची आज छानणी करण्यात आली. त्यात एकूण ५१ उमेदवारांचे ७८ अर्ज दाखल होते. त्यापैकी ४४ जणांचे अर्ज वैध ठरले तर ७ जणांचे अर्ज अवैध ठरले, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. विद्यमान खासदार आणि एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार व माजी खासदार चंद्रकांत खैरे , शिवसेनेचे उमेदवार संदीपान भुमरे आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अफसर खान यांच्यात चौरंगी लढतीची शक्यता आहे. २० लाख ६१ हजार मतदार या उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला करणार आहेत.
शुक्रवारी सकाळी ११ वाजता जिल्हा नियोजन सभागृहात नामनिर्देशन छानणी प्रक्रिया पार पडली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व्यंकट राठोड तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. ही प्रक्रिया निवडणूक निरीक्षक कांतिलाल दांडे व राजशेखर एन. यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी उमेदवार, त्यांचे सूचक, प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
नामनिर्देशन दाखल करण्याच्या अंतिम दिवसाअखेर ५१ उमेदवारांचे ७८ अर्ज प्राप्त झाले होते. भारतीय लोकप्रतिनिधीत्व कायदा कलम ३६ व ३३ मधील तरतुदींनुसार ३६ निकषांच्या आधारे छानणी करण्यात आली. ज्यांची नामनिर्देशने रद्द झाली त्यांचे पूर्ण शंका निरसन होईपर्यंत कालावधी देण्यात आला. ही सर्व प्रक्रिया उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी, तसेच निवडणूक निरीक्षक यांच्या उपस्थितीत राबविण्यात आली.
छाननी प्रक्रियेनंतर लगेचच अर्ज माघारी घेण्याचा कालावधी सुरु झाला आहे. ज्यांना आपला उमेदवारी अर्ज माघारी घ्यावयाचा असेल ते कार्यालयीन कामकाजाच्या वेळात स्वतः अथवा आपल्या प्रतिनिधींमार्फत अर्ज माघारी घेऊ शकतात, असे जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले.
कोणाचे उमेदवारी अर्ज ठरले वैध?
- हर्षवर्धन रायभान जाधव, अपक्ष
- मनीषा खरात, बहुजन महाराष्ट्र पार्टी
- खान एजाज अहमद, अपक्ष
- सुरेश आसाराम फुलारे, अपक्ष
- खाजा कासीम शेख, अपक्ष
- बबनगीर उत्तमगीर गोसावी, हिंदुस्थान जनता पार्टी
- किरण सखाराम बर्डे, अपक्ष
- देविदास रतन कसबे, अपक्ष
- जगन्नाथ किसन उगले, अपक्ष
- चंद्रकांत भाऊराव खैरे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
- अरविंद किसनराव कांबळे, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी
- संदिपानराव आसाराम भुमरे, शिवसेना
- अब्दुल अजीम अब्दुल अजीज शेख, अपक्ष
- रविंद्र भास्करराव बोडखे, भारतीय युवाजन एकता पार्टी
- संजय भास्कर शिरसाट, अपक्ष
- मोहम्मद नसीम शेख, अपक्ष
- सुरेंद्र दिगंबर गजभारे, अपक्ष
- साहेबखान यासीनखान पठाण, अपक्ष
- गोरखनाथ राजपूत राठोड, अपक्ष
- प्रतीक्षा प्रशांत चव्हाण, आंबेडकरवादी रिपब्लिकन पक्ष
- जियाउल्लाह अकबर शेख, अपक्ष
- जगन्नाथ खंडेराव जाधव, अपक्ष
- भालेराव वसंत संभाजी, प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी
- पंचशीला बाबुलाल जाधव, रिपब्लिकन बहुजन सेना
- संगीता गणेश जाधव, अपक्ष
- नितीन पुंडलिक घुगे, अपक्ष
- सय्यद इम्तियाज जलील, एमआयएम
- संजय उत्तमराव जगताप, बहुजन समाज पार्टी
- नारायण उत्तम जाधव, पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक)
- मिनासिंग अवधेशसिंग सिंग, अपक्ष
- प्रशांत पुंडलिकराव आव्हाळे, अपक्ष
- मधुकर पद्माकर त्रिभुवन, अपक्ष
- मनोज विनायकराव घोडके, अपक्ष
- विश्वास पंडित म्हस्के, पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक)
- डॉ. जीवनसिंग भावलाल राजपूत, अपक्ष
- विशाल उद्धव नांदरकर, वंचित बहुजन आघाडी
- अफसर खान यासीन खान, वंचित बहुजन आघाडी
- भरत पुरुषोत्तम कदम, राष्ट्रीय मराठा पार्टी
- अर्जून भगवानराव गालफाडे, राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी
- संदीप देविदास जाधव, अपक्ष
- लतीफ जब्बार खान, अपक्ष
- संदीप दादाराव मानकर, अपक्ष
- अब्दुल समद बागवान, एआयएमआयएम (आयएनक्यू)
- भानुदास रामदास सरोदे पाटील, अपक्ष
यांचे अर्ज ठरले अवैध
- नंदा सुभाष मुके- भारतीय जवान किसान पार्टी
- श्रीराम बन्सीलाल जाधव, जय सेवालाल बहुजन विकास पार्टी
- रंजन गणेश साळवे, इन्सानियत पार्टी
- शेख समीर शेख शफिक, सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया
- सुरेश धोंडू चौधरी, अपक्ष
- सचिन रामनाथ मंडलिक, अपक्ष
- रामनाथ पिराजी मंडलिक, अपक्ष
औरंगाबाद जिल्ह्यात ३० लाख ६७ हजार ७०७ मतदार
लोकसभा निवडणुकीसाठी औरंगाबाद जिल्ह्याची अंतिम मतदार यादी जाहीर झाली असून नामनिर्देशनाच्या अखेरच्या दिवसापर्यंत (२५ एप्रिल) ही यादी अद्यावत करण्यात आली आहे. आता अद्यावत यादीनुसार जिल्ह्यात ३० लाख ६७ हजार ७०७ मतदार मतदानात भाग घेतील, अशी माहिती निवडणूक शाखेमार्फत देण्यात आली.
जिल्ह्यातील मतदार यादीत १६ लाख ६ हजार ६१३ पुरुष, १४ लाख ५८ हजार ३८१ महिला तर १४० इतर तसेच २,५७३ सर्व्हिस मतदार असे एकूण ३० लाख ६७ हजार ७०७ मतदार समाविष्ट आहेत.
विधानसभा क्षेत्रनिहाय मतदार असे
सिल्लोडः पुरुष १ लाख ७९ हजार १७, महिला १ लाख ६० हजार८२६, इतर ४, सर्व्हिस मतदार ५७७.
फुलंब्रीः पुरुष १ लाख ८४ हजार ९८५, महिला १ लाख ६६ हजार ८१९, इतर ४, सर्व्हिस मतदार ३५३
पैठणः पुरुष १ लाख ६४ हजार ८०२, महिला १ लाख ४८ हजार ९६३, इतर ४, सर्व्हिस मतदार १३४
कन्नडः पुरष १ लाख ७१ हजार ६८, महिला १ लाख ५३ हजार ९९५, इतर ९, सर्व्हिस मतदार ५६५
औरंगाबाद (मध्य): पुरुष १ लाख ८० हजार ३५६, महिला १ लाख ६९ हजार ७९०, इतर ५, सर्व्हिस मतदार १०१.
औरंगाबाद (पश्चिम): पुरुष २ लाख ५ हजार ९०, महिला १ लाख ८४ हजार ६८, इतर ७७, सर्व्हिस मतदार १४१.
औरंगाबाद (पूर्व): पुरुष १ लाख ७६ हजार ६८१, महिला १ लाख ६१ हजार ४१९, इतर १३, सर्व्हिस मतदार ५१.
गंगापूर: पुरुष १ लाख ८२ हजार २६८, महिला १ लाख ६४ हजार ८३२, इतर २२, सर्व्हिस मतदार २८९.
वैजापूरः पुरुष १ लाख ६२ हजार ३४६, महिला १ लाख ४७ हजार ६६९, इतर २, सर्व्हिस मतदार ३६३.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा जालना लोकसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या सिल्लोड, फुलंब्री, पैठण या तीन विधानसभा क्षेत्रातील एकत्रित मतदार संख्या याप्रमाणे- पुरुष ५ लाख २८ हजार ८०४, महिला ४ लाख ७६ हजार ६०८, इतर १२ सर्व्हिस मतदार १०६३ असे एकूण १० लक्ष ६ हजार ४८७.
औरंगाबाद लोकसभा मतदार संघात समाविष्ट अन्य सहा विधानसभा क्षेत्रातील एकत्रित मतदार संख्या याप्रमाणे- पुरुष १० लाख ७७ हजार ८०९, महिला ९ लाख ८१ हजार ७७३ इतर १२८ सर्व्हिस मतदार १५१० असे एकूण २० लाख ६१ हजार २२० इतके मतदार आहेत.