मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात गुरूवारी झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीमध्ये राज्यातील पाच मतदारसंघात एकूण १८१ पैकी ११० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे. त्यात रामटेकच्या काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वेंचाही समावेश आहे.
पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ३० मार्च असून या मतदारसंघात १९ एप्रिल रोजी मतदान होईल. विशेष म्हणजे गडचिरोली-चिमूर मतदारसंघात एकाही उमेदवाराचा अर्ज अवैध ठरला नाही.
मतदारसंघनिहाय वैध ठरलेल्या उमेदवारांची संख्या अशी: नागपूर- ५३ पैकी २६, भंडारा-गोंदिया- ४० पैकी २२, गडचिरोली-चिमूर- १२ पैकी १२, चंद्रपूर- ३५ पैकी १५ आणि रामटेक लोकसभा मतदार संघात ४१ पैकी ३५ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.