आयआयटीच्या विद्यार्थ्याला उच्च शिक्षित दाम्पत्याने बनवले ‘लैंगिक गुलाम’, अमानुषपणे सेक्स करायला भाग पाडले!


मुंबईः एका समलैंगिक ऍपच्या माध्यमातून पवईतील आयआयटीच्या विद्यार्थ्याशी ओळख करून घेऊन एका उच्च शिक्षित नराधम दाम्पत्याने त्याला लैंगिक गुलाम बनवले आणि त्याच्यावर अनैसर्गिक पद्धतीने लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी त्या नराधम दाम्पत्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पवईतील क्रिस्टल टॉवरमध्ये शुभ्रो बॅनर्जी आणि मनश्री मुखर्जी हे उच्च शिक्षित दाम्पत्य राहते. एका समलैंगिक ऍपवरून शुभ्रोने आयआयटी-पवईतील एका ३३ वर्षीय विद्यार्थ्याची ओळख करून घेतली. ओळखीनंतर शुभ्रोने त्या विद्यार्थ्यावर अमानुषपणे लैंगिक अत्याचार केले. यात त्याची पत्नी मनश्री मुखर्जीही सहभागी आहे.

शुभ्रो हा जप, तप, मंत्र वगैरे म्हणत हातावर कापूर जाळून या विद्यार्थ्याला तांत्रिक सेक्स करायला भाग पाडायचा. तांत्रिक सेक्स आणि टॅरट कार्डचा वापर करून संमोहनाद्वारे तो आयआयटीतील या विद्यार्थ्याला बेशुद्ध करायचा, अंगावर मेणबत्तीचे गरम थेंब टाकत हातावर, गळ्यात धागेदोरे बांधायचा.

शुभ्रोने दुधात गुंगीचे औषध मिसळून या विद्यार्थ्याची स्वाक्षरीने तीन फॉर्म भरून घेतले. शुभ्रोची पत्नी मनश्री हिचीही पती शुभ्रोच्या कृत्याला साथ होती. तिने या विद्यार्थ्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली होती.

या अमानुष लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या या विद्यार्थ्याने अखेर पोलिसात धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्याच्या तक्रारीनुसार, ९ मे २०१९ ते जानेवारी २०२२ पर्यंत शुभ्रोने त्याच्याशी बळजबरीने वारंवार अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवले. ३ जानेवारी २०२० रोजी या विद्यार्थ्याने नकार देताच त्याला जमिनीवर पाडले व फरफरट पलंगावर नेऊन आपटले आणि तोंड दाबून जिवे मारण्याचा प्रयत्नही केला.

आयआयटीतील या विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी अंमली पदार्थविरोधी कायदा, माहिती तंत्रज्ञान कायदा, जादूटोणा कायद्यासह लैंगिक अत्याचार, हत्येचा प्रयत्न असे गुन्हे दाखल केले आहेत. हा हिणकस आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!