GATE 2025 ग्रॅज्युएट ऍप्टीट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंगचे रजिस्ट्रेशन सुरू, वाचा आवेदन शुल्कापासून ते पात्रता निकषांची संपूर्ण माहिती


नवी दिल्लीः इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) रूरकीने आज म्हणजेच २८ ऑगस्ट २०२४ रोजी GATE 2025 म्हणजेच ग्रॅज्युएट ऍप्टीट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंगसाठी नोंदणी सुरू केली आहे. ही टेस्ट देण्यास इच्छूक आणि पात्र उमेदवार अधिकृत संकेतस्थळ gate2025.iitr.ac.in  वर देण्यात आलेली रजिस्ट्रेशन लिंक ओपन करून आपला फॉर्म भरू शकतात.

आवेदनाची अंतिम तारीख

GATE 2025 म्हणजेच ग्रॅज्युएट ऍप्टीट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंगसाठी विनाविलंब शुल्कासह आवेदन करण्याची शेटवची तारीख २६ सप्टेंबर २०२४ आहे आणि विलंब शुल्कासह आवेदन करण्याची शेवटची तारीख ७ ऑक्टोबर २०२४ आहे.

कधी होणार परीक्षा?

GATE 2025 म्हणजेच ग्रॅज्युएट ऍप्टीट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंगची परीक्षा १.२.१५ आणि १६ फेब्रुवारी २०२५ रोजी निश्चित करण्यात आली आहे. या सर्व तारखांना परीक्षा दोन सत्रांमध्ये आयोजित केली जाईल. शिवाय एक उमेदवार GATE 2025 चे जास्तीत जास्त दोन पेपर देण्यासाठी पात्र आहे.

GATE 2025 पात्रतेचे निकष काय?

GATE 2025 म्हणजेच ग्रॅज्युएट ऍप्टीट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग  टेस्ट देण्यासाठी जे उमेदवार सध्या कोणत्याही स्नातक डीग्री कोर्सच्या तिसऱ्या किंवा उच्चतर वर्षात अध्ययन करत असेल आणि ज्याच्याकडे इंजिनिअरिंग/टेक्नॉलॉजी/वास्तुकला/कला/वाणिज्य/मानव्यविद्या शाखेची सरकारमान्य पदवी आहे, ते उमेदवार GATE 2025 साठी पात्र असतील.

ज्या उमेदवारांकडे MoE/AICTE/UGC/UPSC द्वारा BE/BTech/BArch/BPlanning  इत्यादींच्या समकक्ष मान्यताप्राप्त व्यावसायिक सोसायटीकडून प्रमाणित पदवी असेल तेही उमेदवार GATE 2025 साठी पात्र असतील.

ज्या उमेदवारांनी भारताशिवाय अन्य देशातून आपली योग्यता पदवी प्राप्त केली असेल/ करत असतील, ते GATE 2025 साठी पात्र होण्याकरिता सद्यस्थितीत तिसऱ्या किंवा उच्चतर वर्षात असले पाहिजे किंवा इंजिनिअरिंग/टेक्नॉलॉजी/वास्तुकला/ विज्ञान/ वाणिज्य/कला/ मानव्यविद्या शाखेत आपली स्नातकची पदवी (कमीत कमी तीन वर्षे कालावधी) पूर्ण केलेली असावी.

GATE 2025 साठी आवश्यक कागदपत्रे

  • निर्धारित आकारानुसार उमेदवाराचा एक चांगल्या क्वालिटीचे छायाचित्र.
  • सांगितलेल्या डायमेन्शननुसार उमेदवाराच्या स्वाक्षरीची चांगल्या क्वालिटीची इमेज.
  • पीडीएफ स्वरुपात जातीच्या प्रमाणपत्राची (एससी/एसटी) स्कॅन केलेली प्रत (लागू असल्यास).
  • पीडीएफ स्वरूपात पीडब्ल्यूडी प्रमाणपत्राची स्कॅन केलेली प्रत (लागू असल्यास).
  • पीडीएफ स्वरूपात डिस्लेक्सिया प्रमाणपत्राची स्कॅन केलेली प्रत (लागू असल्यास).
  • फोटो आयडीची मूळप्रत सत्यापनासाठी परीक्षेच्या दिवशी प्रस्तुत करावी लागेल.

GATE 2025 चे आवेदन शुल्क किती?

  • महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दिव्यांग उमेदवारांसाठी ९०० रुपये आणि अन्य सर्व उमेदवारांसाठी १८०० रुपये (निर्धारित कालावधीसाठी).
  • महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दिव्यांग उमेदवारांसाठी १४०० रुपये आणि अन्य सर्व उमेदवारांसाठी २३०० रुपये (विलंब शुल्कासह).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!