अमेरिकेच्या अध्यक्षपदी पुन्हा डोनाल्ड ट्रम्प, भारतीय वंशाच्या कमला हॅरिस पराभूत!
वॉशिंग्टनः जागतिक महासत्ता अमेरिकेच्या सत्तेच्या चाव्या पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांच्या हाती आल्या आहेत. ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला बहुमत मिळाले आणि डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे ४७ वे अध्यक्ष म्हणून आले आहेत. ट्रम्प यांनी बहुमताचा २७० हा आकडा पार करत हा विजय मिळवला.
फॉक्स न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांना २७७ इलेक्ट्रोरल मते मिळाली आहेत. तर डेमॉक्रॅट पक्षाच्या भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांना २२६ इलेक्टोरल मते मिळाली आहेत.
ओहियोमध्ये डेमॉक्रेटिक पक्षाचे उमेदवार शेरॉड ब्राऊन यांचा रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार बर्नी मोरेनो यांच्याकडून पराभव झाला. त्यापूर्वी वेस्ट व्हर्जिनियामध्ये रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार जिम जस्टिस यांनी सहज विजय मिळवला. या दोन जागांमुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. विस्कॉन्सिन, पेनसिल्व्हानिया आणि मिशिगन येथे डेमॉक्रॅटिक पक्षा...