‘तू तुझ्या औकातीत राहा…..’ म्हणत खा. ओमराजे निंबाळकर- आ. राणा पाटलांना भिडले, जिल्हाधिकाऱ्यांसमोरच हमरीतुमरी!
उस्मानाबादः उस्मानाबादचे शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर आणि तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पीकविम्याबाबतच्या बैठकीत जोरदार खडाजंगी झाली. पीकविम्याच्या मुद्द्यावरून त्यांच्यात हमरी-तुमरी झाली. अरे-तुरेच्या भाषेचा वापरही झाला आणि एकमेकांची औकात काढण्यापर्यंत हे प्रकरण गेले. 'तू तुझ्या औकातीत राहा. तुझी आणि तुझ्या खानदानाची औकात सगळ्यांना माहीत आहे,' अशा शब्दांत खा. ओमराजेंनी राणा जगजितसिंह पाटलांना सुनावले. जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांच्यासमोरच हा प्रकार घडल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज, शनिवारी तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची पीकविम्याच्या प्रश्नाबाबत जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक होती. या बैठकीला नंतर शिवसेना खासदार ओमप्रकाश निंबाळकरही पोहोचले. त्यांनी शे...