तारीख पे तारीखः महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आता व्हॅलेंटाइन डेपासून सलग सुनावणी
नवी दिल्लीः महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागून असलेला आणि गेल्या सहा महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेला महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. नवीन वर्षात तरी या सत्तासंघर्षाच्या वादावर वेगाने सुनावणी होऊन काही तरी निकाल हाती लागेल, अशी अपेक्षा होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही सुनावणी १४ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली आहे. १४ फेब्रुवारीपासून उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यातील सत्तासंघर्षावर सलग सुनावणी घेतली जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे या सत्तासंघर्षाच्या निकालासाठी आणखी महिनाभर वाट पहावी लागणार आहे.
सरन्यायाधीश वाय.एस. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठासमोर आजची सुनावणी झाली. नबम रेबिया प्रकरणाचा हवाला देत ठाकरे गटाने हे प्रकरण सात सदस्यीय घटनापीठाकडे वर्ग करण्याची मागणी केली होती. त्यावर आज सर्व...