भारतीय नोटांवर गणपती आणि लक्ष्मीचेही फोटो छापाः दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची मागणी
नवी दिल्लीः भारतीय चलनी नोटांवर गणपती आणि लक्ष्मीचेही फोटो छापा, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. याबाबत आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार असल्याचेही केजरीवाल म्हणाले. केजरीवाल यांनी केलेली ही मागणी हिंदुत्वाच्या राजकारणातील एक मोठी खेळी मानली जात आहे. बऱ्याच काळापासून अरविंद केजरीवाल हे सॉफ्ट हिंदुत्ववादी नेता म्हणून आपली प्रतीमा विकसित करण्याच्या प्रयत्नाला लागले होते. आज त्यांनी नोटांवर गणपती आणि लक्ष्मीचे फोटो छापण्याची मागणी करून हिंदुत्ववादी राजकारणाच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकल्याचे मानले जात आहे.
केजरीवाल यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. दिवाळीच्या रात्री पूजा करताना हा विचार आपल्या मनात आला. अनेक लोकांशी आपली याबाबत चर्चा झाली. कोणीही त्यावर आक्षेप घेण्याचे कारण नाही...