नाट्यशास्त्रात ‘कामसूत्र’चे प्रयोग भोवलेः डॉ. अशोक बंडगर विद्यापीठाच्या सेवेतून बडतर्फ
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): पात्रता नसतानाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागात प्राध्यापकपदी नियुक्ती मिळवलेले प्रा. डॉ. अशोक बंडगर याने नाट्यशास्त्रात ‘कामसूत्र’चे हिणकस प्रयोग करत विद्यार्थींनींचे लैंगिक शोषण केल्याचे सिद्ध झाले असून डॉ. बंडगरला तत्काळ प्रभावाने विद्यापीठाच्या सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. न्यूजटाऊनने सातत्याने या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता.
बंडगर याच्या बडतर्फीचा आदेश कुलगुरू प्रा. डॉ. विजय फुलारी यांच्या आदेशन्वये ८ नोव्हेंबर रोजीच जारी झाला आहे. आधी तक्रार निवारण समिती, नंतर विभागीय चौकशी अशा फेऱ्यात अडकलेल्या बंडगर याला आपण विद्यापीठाच्या सेवेतून बडतर्फ होणार याचा अंदाज आधीच आला होता. त्यामुळे त्याने ही कारवाई टाळण्यासाठी प्रा. डॉ. अशोक बंडगर याने सर्व प्रकारचे प्रयत्न केले. परंतु विद्यापीठ प्रशासनाने अखेर विभागीय चौकशी समि...