समृद्धी महामार्गावर फिल्मी स्टाईलमध्ये हवेत गोळीबार, फुलंब्री पोलिसांत तरूणाविरुद्ध गुन्हा
औरंगाबादः नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर स्कॉर्पिओ कार उभी करून फिल्मी स्टाईलमध्ये गोळीबार करून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर गोळीबार करणाऱ्या युवकाविरुद्ध फुलंब्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या युवकाचा शोध घेत आहेत.
समृद्धी महामार्गावर सावंगी बोगद्याजवळ १४ डिसेंबर रोजी हा फिल्मी स्टाईल थरार करून त्याचा व्हिडीओ करण्यात आला आणि तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. बाळू गायकवाड असे हवेत गोळीबार करणाऱ्या युवकाचे नाव आहे. सावंगी बोगद्यासमोर एमएच २०- एफजी २०२० क्रमांकाची स्कॉर्पिओ उभी करण्यात आली. या स्कॉर्पिओच्या मागून गॉगल घातलेला, गळ्यात चेन, पायात स्पोर्ट्स शूज, मनगटावर दोरे आणि हातात घड्याळ असलेला काळे टी शर्ट घातलेला एक तरूण स्टाईलमध्ये हातात बंदूक घेऊन या स्कॉर्पिओसमोर येतो आणि...