अभिनेता रितेश-जेनिलिया देशमुखांच्या कंपनीला लातुरात दिलेल्या भूखंडाची होणार चौकशी, शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय
मुंबईः ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि राज्याचे दिवगंत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव आणि अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनिलिया देशमुख यांच्या कंपनीला लातूर एमआयडीसीमध्ये अवघ्या दहा दिवसांत देण्यात आलेल्या भूखंडाची चौकशी करण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात आणि विशेषतः मराठवाड्यात आलेली असताना रितेश देशमुख या यात्रेकडे फिरकलाही नव्हता. तेव्हाच या भूखंड प्रकरणाची चर्चा सुरू झाली होती.
लातूरच्या भाजप जिल्हाध्यक्षांनी अभिनेता रितेश देशमुख आणि जेनिलिया देशमुख यांच्या देश अॅग्रो प्रायव्हेट लिमिडेट या कंपनीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. देशमुख दाम्पत्याच्या या कंपनीला अवघ्या दहा दिवसांत लातूर एमआयडीसीमध्ये भूखंड देण्यात आला. त्याचबरोबर देशमुख कुटुंबाचे वर्चस्व असलेल्या बँकेकडून रितेश-जेनिल...