फडणवीस- बावनकुळेंची नागपुरात धक्कादायक नामुष्की, १३ पंचायत समित्यांमध्ये भाजपची पाटी कोरीच!
नागपूरः जंग जंग पछाडून राज्याची सत्ता हस्तगत करणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना त्यांचा गृह जिल्हा नागपुरातच धक्कादायक नामुष्कीला सामोरे जावे लागले आहे. नागपूर जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांपैकी एकाही पंचायत समितीत भाजपला एकही सभापतिपद जिंकता आलेले नाही. या १३ पंचायत समित्यांपैकी ९ पंचायत समित्यांत काँग्रेस तर ३ पंचायत समित्यांचे सभापतिपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात गेले असून एका ठिकाणी शिंदे गटाच्या शिवसेनेचा सभापती झाला आहे.
पक्षनिहाय पंचायत समित्यांचे सभापती असेः
काँग्रेसः सावनेर, कळमेश्वर, पारशिवनी, कामठी, मौदा, कुही, उमरेड, भिवापूर, नागपूर
राष्ट्रवादी काँग्रेसः कोटोल, नरखेड आणि हिंगणा.
बाळासाहेबांची शिवसेनाः रामटेक.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना नागपूर जिल्ह्याच्या राजकारणाची खडानखडा माहिती असूनही ...