विद्यापीठातील नवीन गेटचे सर्व बांधकाम उद्धवस्त, नव्या वादाच्या ‘मगर’मिठीतून कुलगुरूंनी करून घेतली सुटका!
औरंगाबादः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून अवघ्या दहा-पंधरा फूट अंतरावर बांधण्यात आलेले नवीन गेटचे सर्वच्या सर्व बांधकाम अखेर उद्धवस्त करण्यात आले. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तीन दिवसांत हे बांधकाम पाडून टाकण्याचे आश्वासन आंबेडकरी चळवळीच्या शिष्टमंडळाला दिले होते. अखेर उशिराने का होईना, पण कुलगुरू डॉ. येवले यांनी दिलेला शब्द पाळला आणि नवीन गेटच्या वादाच्या ‘मगर’मिठीतून स्वतःची सुटका करून घेतली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या सुशोभीकरणाचे काम विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. या सुशोभीकरणाचा एक भाग म्हणून विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या शेजारीच अगदी दहा-पंधरा फुटांच्या अंतरावर ‘इन-आऊट गेट’च्या नावाखाली नवीन गेट बांधण्यात आले होते.
विद्यापीठाचे मु...