मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्गावर चालवली बिल्डरची गाडी, काँग्रेसने केला खळबळजनक आरोप
मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रविवारी बहुचर्चित समृद्धी महामार्गावरून प्रवास करत या महामार्गाचा आढावा घेतला. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः गाडी चालवली तर त्यांच्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसले होते. नागपूर ते शिर्डी या टेस्ट ड्राइव्हसाठी फडणवीस-शिंदेंनी वापरलेली गाडीच आता वादाचा विषय ठरली आहे. ही गाडी एका बिल्डराच्या मालकीची असून त्यावरून काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. आता राज्य चालवायला बिल्डरांच्या हातात देणार का? असा सवाल काँग्रेसने केला आहे.
फडणवीस आणि शिंदे यांचा टेस्ट ड्राइव्ह नागपूरहून सुरू झाला, तो शिर्डीत संपला. या टेस्ट ड्राइव्हसाठी शिंदे- फडणवीसांनी मर्सिडीज बेन्झ एजी, जी ३५० डी ही अलिशान गाडी वापरली. एमएच ४९ बीआर ०००७ क्रमांकाची ही गाडी कुकरेजा इन्फ्रास्ट्रक्चर्सच्या मालकीची असल्याची कागदपत्रेच महाराष्ट्र प्रदेश काँ...