महाराष्ट्र

सीमा भागातील ८६५ गावांमधील संस्था, संघटनांना महाराष्ट्र सरकार देणार बळ
देश, महाराष्ट्र

सीमा भागातील ८६५ गावांमधील संस्था, संघटनांना महाराष्ट्र सरकार देणार बळ

मुंबई: महाराष्ट्र- कर्नाटक सीमा भागातील विविध संस्था आणि संघटना यांना मोठं बळ मिळणार आहे. या भागातील ८६५ गावांमधील सामाजिक, शैक्षणिक, धर्मादाय, सांस्कृतिक तसेच निम सार्वजनिक संस्था व संघटनांना देखील मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीतून अर्थसहाय देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीमा प्रश्नी अलीकडेच सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमा भागातील मराठी बांधव आणि संस्था यांना महाराष्ट्राकडून अर्थसहाय देण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या, त्याप्रमाणे २४ नोव्हेंबर रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीमधून मुख्यमंत्र्यांच्या स्वेच्छाधिकारातून राज्यातील विविध संस्था, संघटना यांना अर्थसहाय करण्याची तरतूद आहे. यात सुधारणा करुन नव्या शासन निर्णयात यात सुधारणा करून आता सीमा भागातील ८६५ गावांचा देखील यात समावेश करण्यात आला आहे. मुख्यमं...
ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसाठी केंद्र शासनाकडून १० हजार कोटी मिळणार: विखे
महाराष्ट्र

ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसाठी केंद्र शासनाकडून १० हजार कोटी मिळणार: विखे

मुंबई: राज्यातील ग्रामीण कुटुंबियांना नियमितपणे रोजगार उपलब्ध करण्यासाठी राष्ट्रीय सहकारी विकास निगम (एनसीडीसी) ही एक केंद्र शासनाची वित्तीय संस्था असून यांच्याकडून राज्याला १० हजार कोटी रूपये मिळणार आहेत. यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ आणि महिला आर्थिक विकास महामंडळांनी रोजगार निर्मितीचे प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी  बुधवारी दिले. शेळी-मेंढीपालन सहकारी संस्थेच्या योजनांच्या अनुषंगाने एनसीडीसीचे सादरीकरण मंत्रालयात आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी विखे-पाटील बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जगदीश गुप्ता, राष्ट्रीय सहकारी विकास निगमचे महाव्यवस्थापक विनीत नारायण, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक रुबल अग्रवाल, उमेदचे मुख्य कार्यकारी अधिकारी ...
न्यूजटाऊन इम्पॅक्टः एमआयडीतील भूखंड वाटपावरील स्थगिती अखेर उठवली, राज्यातील गुंतवणुकीचा मार्ग मोकळा
महाराष्ट्र, विशेष

न्यूजटाऊन इम्पॅक्टः एमआयडीतील भूखंड वाटपावरील स्थगिती अखेर उठवली, राज्यातील गुंतवणुकीचा मार्ग मोकळा

मुंबईः महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) राज्यातील विविध औद्योगिक क्षेत्रात भूखंड वाटप करण्यावर राज्य सरकारने दिलेली स्थगिती अखेर उठवण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय गुरूवारी जारी करण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्याच्या औद्योगिक क्षेत्रात गुंवणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. भूखंड वाटपावरील स्थगितीमुळे राज्यातील १६ हजार ५०० कोटींचे गुंतवणुकीचे प्रस्ताव रखडल्याचे वृत्त न्यूजटाऊनने दिले होते. एमआयडीसीने १ जून २०२२ नंतर विविध स्तरावर वाटप केलेल्या भूखंड वाटपाच्या निर्णयास राज्य सरकारने ८ ऑगस्ट २०२२ रोजी स्थगिती दिली होती. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे  महाविकास आघाडी सरकारच्या काळातील १२ हजार कोटींची गुंतवणुकीचे १९१ प्रस्ताव धूळखात पडून आहेत. या स्थगितीमुळे विद्यमान सरकारमधील ४ हजार ५०० कोटींच्या गुंतवणुकीचे १५० प्रस्ताव रखडले होते. हेही वाचाः उद्योगांसाठी भूखंड...
न्यूजटाऊन इम्पॅक्टः एमआयडीसीच्या भूखंड वाटपाची स्थगिती त्वरित उठवा: विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
महाराष्ट्र, विशेष

न्यूजटाऊन इम्पॅक्टः एमआयडीसीच्या भूखंड वाटपाची स्थगिती त्वरित उठवा: विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई: राज्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) विविध स्तरावर भूखंड वाटपाला  देण्यात आलेली स्थगिती त्वरित उठवण्याची मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना लेखी पत्र लिहून केली आहे. न्यूजटाऊनने याबाबतचे वृत्त दिले होते. वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टरचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानंतर उद्योगांसाठीच्या जमिनीबाबत पुनर्वलोकन केलं जात असल्याचा मुद्दा समोर आला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी २० सप्टेंबर रोजी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भूखंड वाटपास दिलेली स्थगिती उठवण्यात आली असल्याचे म्हटले. मात्र आज २२ दिवस उलटूनही भूखंड स्थगिती बाबतचा निर्णय जैसे थे आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना त्यांनी केलेल्या घोषणेची आठवण करून देत दानवे यांनी भूखंड स्थगितीबाबतचे आदेश निर्गमित न झाल्याने भूखंडाच्या निर्णयाबाबतची कार्यवाही ठप्प झाल्याचे...
‘भामटेगिरी’ फसली: ‘डॉ.बामु’च्या वादग्रस्त कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांचा राजीनामा
महाराष्ट्र, विशेष

‘भामटेगिरी’ फसली: ‘डॉ.बामु’च्या वादग्रस्त कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांचा राजीनामा

औरंगाबाद: राजपूत भामटा जातीचे बनावट प्रमाणपत्रामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वादग्रस्त कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी अखेर राजीनामा दिला. त्यांच्या ठिकाणी केमिकल टेक्नॉलॉजीचे प्रा. डॉ. भगवान साखळे यांची प्रभारी नियुक्ती करण्यात आली आहे.डॉ. जयश्री सूर्यवंशी या जन्माने मराठा जातीच्या आहेत. आंतरजातीय विवाह केल्यानंतर त्यांनी राजपूत भामटा जातीचे बनावट प्रमाणपत्र काढले. याच बनावट जातप्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी डॉ. इं.भा. पाठक महिला महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी मिळवली. या अनुभवाच्या जोरावरच त्या पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिव झाल्या. ही 'भामटेगिरी' उघडकीस आल्यानंतर डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी आपल्याकडे असलेले राजपूत भामटा जातीचे प्रमाणपत्र केवळ 'शोभेची वस्तू' असून त्याचा आपण कुठेही वापर केला नसल्याचा बचा...
 राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ मध्ये गैरप्रकारः परीक्षेत ब्लूटूथ वापरणाऱ्या औरंगाबादच्या उमेदवाराविरुद्ध फौजदारी गुन्हा
महाराष्ट्र, विशेष

 राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ मध्ये गैरप्रकारः परीक्षेत ब्लूटूथ वापरणाऱ्या औरंगाबादच्या उमेदवाराविरुद्ध फौजदारी गुन्हा

पुणेः महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ मध्ये औरंगाबाद येथील परीक्षा केंद्रावर झालेल्या गैरप्रकाराची एमपीएससीने गंभीर दखल घेतली असून परीक्षेदरम्यान ब्लूटूथचा वापर करणाऱ्या उमेदवाराविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  एमपीएससीच्या वतीने राज्यातील अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक व पुणे या सहा परीक्षा केंद्रांवर राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ घेण्यात येत आहे. या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी आज औरंगाबाद येथील परीक्षा केंद्रावर गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले. या परीक्षेदरम्यान एक उमेदवार ब्लूटूथचा वापर करत असल्याचे आढळून आले होते. त्याच्या विरोधात आता एमपीएससीने कारवाई केली आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ करिता औरंगाबाद येथे परीक्षेच्या वेळी ब्लूटूथजवळ बाळगल्याबद्दल श्री सचिन नवनाथ बालगाने या उमेदवारावर फौजदारी गुहा दा...
मुंबईचा सर्वांगीण विकास ही आमची सर्वोच्च प्राथमिकता: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
महाराष्ट्र

मुंबईचा सर्वांगीण विकास ही आमची सर्वोच्च प्राथमिकता: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

मुंबई: मुंबईतील विविध विकास कामांच्या माध्यमातून सर्वसामान्य मुंबईकरांना विकासाच्या दिशेने नेण्याचा आमचा संकल्प आहे.प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या माध्यमातून त्याला बळ दिले जात आहे. आधुनिक आणि विकसित मुंबई बनवण्यास शासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे, आगामी काळात मुंबईचा कायापालट झालेला आपल्याला दिसेल, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. मोदी यांच्या हस्ते आज मुंबईतील सुमारे ३८ हजार ८०० कोटी रुपयांच्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण, भूमिपूजन झाले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल, केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय वित्त राज्य...
दारूच्या नशेत अश्लील चाळे भोवलेः  एसीपी विशाल ढुमे निलंबित
महाराष्ट्र

दारूच्या नशेत अश्लील चाळे भोवलेः  एसीपी विशाल ढुमे निलंबित

औरंगाबादः  दारूच्या नशेत मित्राच्या बायकोशी कारमध्ये अश्लील चाळे केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले औरंगाबाद पोलिस दलातील गुन्हे शाखेचे सहायक उपायुक्त विशाल ढुमे यांना आज अखेर निलंबित करण्यात आले आहे. गेल्या शनिवारी मध्यरात्री औरंगाबाद शहराच्या सिडको भागातील पाम रेस्टॉरंटपासून नारळी बाग परिसरात हाय प्रोफाईल ड्रामा झाला होता. त्यात एसीपी विशाल ढुमे यांनी मित्राच्या पत्नीचा विनयभंग केल्याची फिर्याद सिटी चौक पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. सिटी चौक पोलिसांनी ढुमे यांना अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. हेही वाचाः ‘एसीपी’ने दारूच्या नशेत अश्लील चाळे करत केला मित्राच्या पत्नीचा विनयभंग; उत्तररात्री औरंगाबादेत हायप्रोफाईल ‘ड्रामा’! या प्रकरणानंतर पोलिस आयुक्त डॉ.निखील गुप्ता यांनी ढुमे यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव प...
<strong>राज्यपाल कोश्यारींच्या डोक्यावरून ‘काळी टोपी’ पहिल्यांदाच गायब!</strong>
देश, महाराष्ट्र, विशेष

राज्यपाल कोश्यारींच्या डोक्यावरून ‘काळी टोपी’ पहिल्यांदाच गायब!

मुंबईः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) ओळख असलेली ‘काळी टोपी’ कायम डोक्यावर मिरवणारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या डोक्यावरून आज पहिल्यांदाच ही काळी टोपी गायब झाल्याचे पहायला मिळाले. डोक्यावर काळी टोपी, धोती, सदरा आणि त्यावर स्लीव्ह नसलेले जॅकेट अशा पेहरावात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कायम वावरत असतात. हा पेहरावच त्यांची ओळख बनलेला आहे. कोश्यारी हे कायम डोक्यावर काळी टोपी घालूनच सार्वजनिक जीवनात वावरत आलेले आहेत. त्यांच्या डोक्यावरील आरएसएसची काळी टोपी हा अनेकदा टिकेचा विषयही ठरली आहे. परंतु तरीही राज्यपाल कोश्यारी यांनी ही काळी टोपी काही त्यांच्या डोक्यावरून कधी उतरवली नव्हती. मात्र आज त्यांनी ही काळी टोपी डोक्यावरून उतरवलेली पहायला मिळाले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आज राजभवन मुंबई येथे सदिच्छा ...
औरंगाबाद ‘स्मार्ट सिटी’च्या रस्त्याला तडेः मुंबई आयआयटीच्या पथकाने नेला तपासणीसाठी रस्त्याचा तुकडा!
महाराष्ट्र

औरंगाबाद ‘स्मार्ट सिटी’च्या रस्त्याला तडेः मुंबई आयआयटीच्या पथकाने नेला तपासणीसाठी रस्त्याचा तुकडा!

औरंगाबादः स्मार्ट सिटीअंतर्गत तयार होत असलेल्या रस्त्यांना काही दिवसांतच भेगा पडल्या असून या रस्त्यांच्या तपासणीसाठी आयआयटी मुंबई तज्ज्ञांचे पथक शहरात आले आहे. या पथकाने सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी नोव्हेंबर रोजी शहरात विविध ठिकाणी रस्त्यांच्या कामांची पाहणी करत गुणवत्ता तपासली. यानंतर आता या पथकाने रस्त्यांची गुणवत्ता तपासणी थेट मुंबईच्या आयआयटी लॅबमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तयार झालेल्या रस्त्यावरील तुकडा घेऊन तो मुंबईच्या लॅबमध्ये नेला जाणार आहे. औरंगाबाद स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात रस्त्यांची कामे केली जात आहेत. या कामांचे थर्ड पार्टी इन्स्पेक्शन मुंबईच्या आयआयटी पथकाकडून केले जात आहे. यासाठी मुंबईहून प्राध्यापक डॉ. धर्मवीर सिंग यांच्या नेतृत्वाखाली आयआयटी मुंबईचे पथक दोन दिवसांपासून शहरातील रस्तेकामांची पाहणी करत आहे. त्यांच्यासोबत स्मार्ट सिटीचे प्रकल्प व्यवस्थापक इम्रान...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!