नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील मुलीच्या मृत्यू प्रकरणी अधिष्ठाता आणि डॉक्टरांची विभागीय चौकशी
नागपूर: नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात येथे व्हेंटिलेटर अभावी मुलीचा मृत्यू झाल्याप्रकरणी रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि संबंधित डॉक्टर यांची विभागीय चौकशी करण्यात येत असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी दिली. रुग्णालयात पुरेशी यंत्रसामग्री आणि औषधी असावी तसेच पदभरती याबाबत कार्यवाही करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मुलीचा मृत्यू झाल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना महाजन बोलत होते.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर येथे भरती करतांनाच ती मुलगी गंभीर आजाराने ग्रस्त होती. अतिदक्षता विभागातील सर्व व्हेंटिलेटर गंभीर आजाराच्या रुग्णांसाठी वापरात असल्यामुळे या मुलीला उपचाराकरीता आर्टिफिशिअल मॅन्युअल ब्रिदिंग युनिट (अ...