चंद्रकांत पाटलांचा निषेध करणाऱ्या कार्यकर्त्यांची औरंगाबादेत धरपकड, राज्यभरात संतापाची लाट
औरंगाबादः महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भीक मागून शाळा चालवल्या असे वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल भाजप नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्याविरोधात महाराष्ट्रात संतापाची लाट उसळत असून त्यांचा निषेध करणाऱ्या कार्यकर्त्यांची औरंगाबादेत धरपकड करण्यात आली. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा सर्वस्तरातून निषेध केला जात आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संचलित पैठण येथील संतपीठाच्या पहिल्या प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात बोलताना उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरूषांनी दिलेल्या योगदानाची तुलना थेट भीक मागण्याशी केली. तुम्ही अनुदानावर अवलंबून का रहाता? या देशामध्ये शाळा कुणी सुरू केल्या? कर्मवीर भाऊराव पाटील, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या सगळ्यांनी शाळा सुरू केल्या. या सगळ्यांनी शाळा सुरू करताना सरकारने त्यांना अनुदान ...