महाराष्ट्र

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राजीनामा देणार, ‘निरोपाच्या भाषे’त स्वतःच दिली माहिती
महाराष्ट्र, विशेष

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राजीनामा देणार, ‘निरोपाच्या भाषे’त स्वतःच दिली माहिती

मुंबईः महापुरूषांबद्दल आक्षेपार्ह आणि अपमानास्पद विधाने करून कायम वादाच्या भोवऱ्यात राहिलेले महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनामा देण्याची मानसिक तयारी केली आहे. आपल्याला राजकीय जबाबदारीतून मुक्त व्हायची इच्छा असल्याचे त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडेही बोलून दाखवली आहे. राजभवनाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे. ही माहिती देताना कोश्यारी यांनी निरोपाची भाषाच वापरली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी १९ जानेवारी रोजी मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यावेळी भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांच्याकडे राजकीय जबाबदारीतून मुक्त होण्याची आपली इच्छा बोलून दाखवली असल्याचे राजभवनाने म्हटले आहे.  महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ ...
शेतजमिनीच्या ताब्यावरून वाद आहे का?: आता फक्त १ हजार १०० रुपयांत होणार आदलाबदलीची दस्त नोंदणी!
महाराष्ट्र

शेतजमिनीच्या ताब्यावरून वाद आहे का?: आता फक्त १ हजार १०० रुपयांत होणार आदलाबदलीची दस्त नोंदणी!

मुंबईः शेतजमिनीच्या ताब्यावरून वाद मिटवणाऱ्या सलोखा योजनेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी सवलतीत मुद्रांक शुल्क नाममात्र १००० रुपये व नोंदणी फी १०० रुपये आकारण्यात येईल. शेतजमिनीच्या ताबा व वहिवाटीबाबत शेतकऱ्यांमध्ये आपापसात वाद होतात. ते मिटवण्यासाठी व समाजामध्ये सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी ही योजना आणण्यात आली आहे. या योजनेत एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमीन धारकांचे अदलाबदल दस्तासाठी नोंदणी फी व मुद्रांक शुल्कामध्ये सवलत देण्यात येईल. या योजनेमुळे शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक मानसिकता निर्माण होईल. तसेच विविध न्यायालयातील प्रकरणे निकाली निघतील.  भूमाफियांचा अनावश्यक हस्तक्षेप सुद्धा होणार नाही. महाराष्ट्रात एकूण जमिनधारकांची खातेसंख्य...
शिवसेनेशी युती का केली?, प्रकाश आंबेडकरांनी सांगितले कारण; ‘वंचित’ महाविकास आघाडीत असेल का? ठाकरे म्हणाले…
महाराष्ट्र, राजकारण

शिवसेनेशी युती का केली?, प्रकाश आंबेडकरांनी सांगितले कारण; ‘वंचित’ महाविकास आघाडीत असेल का? ठाकरे म्हणाले…

मुंबईः महाराष्ट्राच्या राजकारणात गेली काही दिवस चर्चेचा विषय ठरलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीवर आज अखेर शिक्कामोर्तब झाले. या ऐतिहासिक युतीचे महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होतील, असे राजकीय जाणकारांना वाटते. मात्र प्रकाश आंबेडकरांनी शिवसेनेशी युती का केली? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. खुद्द प्रकाश आंबेडकरांनीच या प्रश्नाचे उत्तर दिले आणि एमआयएमने वंचित बहुजन आघाडीची चळवळ गिळंकृत करण्याचा प्रयत्न केल्याचा थेट आरोपच त्यांनी एमआयएमचे नाव न घेता केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आंबेडकर भवनात संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली. यावेळी प्रकाश आंबेडकारांनी भूमिका मांडली. वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना एकत्र आल्याने निवडणुकीत बदलाचे राजकारण सुरू होणार आहे. उपेक्षितांना संधी देऊन त्...
विनाअनुदानित शाळांना अनुदानासाठी १ हजार १०० कोटींची तरतूद, महिनाभरात त्रुटींची पूर्तता न केल्यास ‘दुकान’ बंद होण्याचा धोका!
महाराष्ट्र

विनाअनुदानित शाळांना अनुदानासाठी १ हजार १०० कोटींची तरतूद, महिनाभरात त्रुटींची पूर्तता न केल्यास ‘दुकान’ बंद होण्याचा धोका!

मुंबईः राज्यातील शाळांना अनुदान देण्याचा व त्यासाठी १ हजार १०० कोटी रुपये देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयाचा लाभ राज्यातील सुमारे ६३ हजार ३३८ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना होणार आहे. असे असले तरी एक महिन्याच्या मुदतीत त्रुटींची पूर्तता न करणाऱ्या शाळांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा घोषित करण्यात येणार असून यासाठी तयार न होणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुळे ६ हजार १० प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना तसेच १४ हजार ८६२ तुकड्यांना अनुदान मिळेल. त्रुटींच्या पूर्ततेनंतर २० टक्के अनुदानासाठी ३६७ शाळा पात्र असून ४० टक्के अनुदानासाठी २८४ शाळा पात्र आहेत. २० टक्के अनुदान घेत असलेल्या २२८ शाळांना ४० टक्के अनुदान देण्यात येईल. तर...
थेट सरपंचपदांसह  राज्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबरला मतदान, आचारसंहिता लागू
महाराष्ट्र, राजकारण

थेट सरपंचपदांसह  राज्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबरला मतदान, आचारसंहिता लागू

मुंबई: राज्यातील विविध जिल्ह्यांतील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ डिसेंबर २०२२ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी बुधवारपासूनच आचारसंहिता लागू झाली असून २० डिसेंबर २०२२ रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी बुधवारी येथे केली. ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या; तसेच नव्याने स्थापित या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १८ नोव्हेंबर २०२२ रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची सूचना प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र २८ नोव्हेंबर २०२२ ते २ डिसेंबर २०२२ या कालावधीत दाखल करण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी ५ डिसेंबर २०२२ रोजी होईल.  नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ७ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदा...
महापुरूषांचा अनादर भाजपच्या निर्देशानुसार केला होता का? मागणी करूनही कोश्यारींना न हटवल्यामुळे सचिन सावंतांचा सवाल
महाराष्ट्र, राजकारण

महापुरूषांचा अनादर भाजपच्या निर्देशानुसार केला होता का? मागणी करूनही कोश्यारींना न हटवल्यामुळे सचिन सावंतांचा सवाल

मुंबईः महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्याला राजकीय जबाबदाऱ्यांतून मुक्त होऊन उर्वरित वेळ मनन-चिंतनात घालवण्याची इच्छा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे बोलून दाखवली आहे. त्यांनी ही इच्छा बोलून दाखवून पाच दिवस उलटले तरी त्यांना राज्यपालपदावरून न हटवल्यामुळे विरोधकांनी मोदी सरकार आणि भाजपवर टिकास्त्र सोडले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महापुरूषांचा अनादर भाजपच्या निर्देशानुसार केला गेला होता का? मोदी सरकारला महाराष्ट्रात इतका आकस का? असा सवाल करत प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी टीका केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे विविध विकास कामांचे उद्घाटन आणि लोकार्पण करण्यासाठी १९ जानेवारी रोजी मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांच्याकडे राजकीय जबाबदाऱ्यांतून मुक्त होण्याची इच्छा बोलून दाखवली, राजभवनाच्या अधिकृत ट्विटर ह...
विद्यापीठ सिनेट निवडणुकीचे सर्व निकाल जाहीरः डॉ. शंकर अंभोरे, डॉ. उमाकांत राठोड विजयी, डॉ. राजेश करपे विद्या परिषदेवर
महाराष्ट्र

विद्यापीठ सिनेट निवडणुकीचे सर्व निकाल जाहीरः डॉ. शंकर अंभोरे, डॉ. उमाकांत राठोड विजयी, डॉ. राजेश करपे विद्या परिषदेवर

औरंगाबादः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीचे सर्व निकाल जाहीर झाले असून महाविद्यालयीन शिक्षक गटातून प्रा. डॉ. शंकर अंभोरे, प्रा. डॉ. उमाकांत राठोड हे विजयी झाले आहेत. तर प्रा. डॉ. राजेश करपे हे विद्या परिषदेवर निवडून गेले आहेत. महाविद्यालयीन शिक्षक गटात अटीतटीची निवडणूक झाली. या निवडणुकीत खुल्या प्रवर्गातून डॉ. अंकुश कदम हे सर्वाधिक ४०४ मते घेऊन विजयी झाले. त्या खालोखाल डॉ. शंकर अंभोरे दुसऱ्या क्रमांकाची म्हणजेच ४०१ मते घेऊन विदयी झाले. डॉ. मुंजा धोंगडे हे ३६६ मते घेऊन विजयी झाले. खुल्या प्रवर्गातील हे तीनच उमेदवार विजयासाठीचा निर्धारित कोटा पूर्ण करून विजयी झाले. डॉ. भगवान ढोबाळ यांना ३४९ मते तर डॉ. विक्रम खिल्लारे यांना ३४१ मते मिळाली. या दोन उमेदवारांनी कोटा पूर्ण केला नसला तरीही त्यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. महाविद्यालयीन शिक्षक गटात आरक्षित प्...
‘डॉ. बामु’ अधिसभा निवडणूक निकालः कोऱ्या मतपत्रिकांच्या ‘जहूर’मुळे काही जणांचा ‘उत्कर्ष’ अडचणीत!
महाराष्ट्र, राजकारण

‘डॉ. बामु’ अधिसभा निवडणूक निकालः कोऱ्या मतपत्रिकांच्या ‘जहूर’मुळे काही जणांचा ‘उत्कर्ष’ अडचणीत!

औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेच्या पदवीधर गणातील दहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया सध्या सुरू आहे. तब्बल दहा तास उलटले तरी अजूनही मतपत्रिकांच्या विलगीकरणाचीच प्रक्रिया अद्यापही सुरूच आहे. त्यामुळे प्रत्यक्ष मतमोजणी सुरू व्हायला किमान दहा वाजण्याची शक्यता आहे. संथगतीने सुरू असलेल्या या प्रक्रियेमुळे उमेदवारांचा रक्तदाब मात्र वर-खाली होत आहे. विद्यापीठ अधिसभेच्या पदवीधर गणातील १० जागांसाठी शनिवारी मतदान घेण्यात आले होते. त्याच्या मतमोजणीची प्रक्रिया आज सकाळी १० वाजता सुरू झाली. मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात या गणातील मतपत्रिकांचे प्रवर्ग निहाय विलगीकरण आणि वैध-अवैध मतांचे वर्गीकरण हाती घेण्यात आले. ते काम अद्यापही सुरू आहे.  गेल्या दहा तासांपासून सुरू असलेलो विलगीकरण आणि वर्गीकरणाचे हे काम संपल्यानंतर बाजूला काढलेले  प्रत्येक अ...
संजय राऊत १०२ दिवसांनंतर तुरूंगात बाहेर येणार, ईडीची जामीन स्थगितीची मागणी न्यायालयाने फेटाळली!
महाराष्ट्र, राजकारण

संजय राऊत १०२ दिवसांनंतर तुरूंगात बाहेर येणार, ईडीची जामीन स्थगितीची मागणी न्यायालयाने फेटाळली!

मुंबईः कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी गेल्या जवळपास तीन महिन्यांपासून तुरूंगात असलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांना अखेर पीएमएलए न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. संजय राऊत यांच्या जामिनाला विरोध करत जामिनाला स्थगिती देण्याची सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) मागणी पीएमएलए न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे १०२ दिवसांनंतर राऊतांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबईतील कथित पत्राचाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी ईडीने संजय राऊत यांना ३१ जुलै २०२२ रोजी अटक केली होती. तेव्हापासून म्हणजेच १०२ दिवस संजय राऊत हे आर्थर रोड तुरूंगात होते. या प्रकरणी पीएमएलए न्यायालयात सुनावणी सुरू होती. ईडीचे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत, असा दावा करत संजय राऊत यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. संजय राऊत हेच या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचा ईडीचा ठपका आहे. ईडीने पत्राचाळ घोटाळा प्रकरणी आरोपपत्र द...
विद्युत सहाय्यकांच्या कागदपत्रांची २९ व ३० ऑक्टोबरला महावितरणच्या परिमंडल कार्यालयांत पडताळणी
महाराष्ट्र

विद्युत सहाय्यकांच्या कागदपत्रांची २९ व ३० ऑक्टोबरला महावितरणच्या परिमंडल कार्यालयांत पडताळणी

मुंबई:  मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रसिद्ध केलेल्या सुधारित निवड यादीमध्ये नव्याने निवड झालेल्या विद्युत सहायक संवर्गातील उमेदवार आणि प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी २९ आणि ३० ऑक्टोबर रोजी होणार आहे. कागदपत्रांची ही पडताळणी परिमंडल निहाय होणार आहे. महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक या संवर्गाची रिक्त पदे भरण्यासाठी तीन वर्षांच्या निश्चित कालावधीकरिता कंत्राटी पध्दतीने उमेदवारांची निवड करण्यासाठी एप्रिल व जुलै २०१९ मध्ये जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. परिमंडलनिहाय यादीमधील उमेदवारांनी त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या परिमंडल कार्यालयांत २९ व ३० ऑक्टोबर रोजी आपल्या कागदपत्रांची पडताळणी स्वत: उपस्थित राहून करणे अनिवार्य आहे. नव्याने निवड झालेल्या उमेवारांची तसेच प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांची परिमंडलनिहाय यादी महावितरणच्या संकेतस्थळावर (www.mahadis...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!