महाराष्ट्र

गुढीपाडवा, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रेशन कार्डधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा
महाराष्ट्र

गुढीपाडवा, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रेशन कार्डधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा

मुंबईः गुढीपाडवा तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. याचा लाभ १ कोटी ६३ लाख शिधा पत्रिकाधारकांना होईल. यापूर्वी दिवाळीत हा आनंदाचा शिधा देण्यात आला होता. अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शिधा पत्रिकाधारक शेतकऱ्यांना १ किलो रवा, १ किलो चणाडाळ, १ किलो साखर आणि १ लिटर पामतेल असा आनंदाचा शिधा गुढी पाडव्यापासून पुढील १ महिन्याच्या कालावधीसाठी ई-पॉसद्वारे १०० रुपये प्रतिसंच असा सवलतीच्या दरात दिला जाईल. ई-पॉसची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने हा शिधा दिला जाईल. हा आनंदाचा शिधा देण्याक...
पुण्याच्या वाकड भागात मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; भोजपुरी अभिनेत्री, मॉडेलचा समावेश
महाराष्ट्र

पुण्याच्या वाकड भागात मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; भोजपुरी अभिनेत्री, मॉडेलचा समावेश

 पुणेः  पिंपरी-चिंचवड पोलिसांनी वाकड परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलमधून चालणाऱ्या मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या सेक्स रॅकेटमध्ये एक भोजपुरी अभिनेत्री आणि एका मॉडेलचा समावेश आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. भोजपुरी अभिनेत्री आणि एका मॉडेलला वेगवेगळे बहाणे करून वेश्या व्यवसायात ओढण्यात आले होते.  अटक करण्यात आलेल्या तिघांनी या अभिनेत्री व मॉडेलला वेश्या व्यवसाय करण्यात प्रवृत्त केले होते. याबाबतची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी खातरजमा केली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या गुप्तचरांनी डमी ग्राहकाची नियुक्ती केली. या डमी ग्राहकांनी त्यांच्या हँडलरशी संपर्क साधला. त्यानंतर अभिनेत्री आणि मॉडेलचे फोटो शेअर केले आणि हॉटेलच्या खोल्याही बुक केल्या. त्यानंतर गुन्हे शाखेचे शुक्रवारी सायंकाळी या पंचतारांकित हॉटेलवर छापा टाकला. या छाप्यादरम्यान अभिनेत्री व ...
छत्रपती संभाजीनगर महाविकास आघाडीमय, सभेच्या तीन तास आधीपासूनच नागरिक एमएसएमच्या मैदानाकडे!
महाराष्ट्र, राजकारण

छत्रपती संभाजीनगर महाविकास आघाडीमय, सभेच्या तीन तास आधीपासूनच नागरिक एमएसएमच्या मैदानाकडे!

छत्रपती संभाजीनगरः महाविकास आघाडीची मराठवाड्यातील पहिलीवहिली संयुक्त  वज्रमूळ सभा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये होत असून या सभेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण संभाजीनगर महाविकास आघाडीमय झाल्याचे पहायला मिळत आहे. सायंकाळी सात वाजता मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या (एमएसएम) मैदानावर ही सभा होणार असली तरी दुपारी चार वाजेपासूनच कार्यकर्ते आणि नागरिकांचे जत्थ्ये सभास्थळाकडे येताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीच्या तीन घटक पक्षांची मराठवाड्यातील पहिली सभा छत्रपती संभाजीनगरात होत आहे. या सभेसाठी तिन्ही पक्षांनी जोरदार तयार केलेली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे या सभेला संबोधित करणार आहेत. सायंकाळी सात वाजता या सभेला सु...
सुप्रिया सुळेंनी मटण खाऊन महादेवाचे दर्शन घेतलेः शिंदे गटाचे विजय शिवतारे यांचा आरोप
महाराष्ट्र

सुप्रिया सुळेंनी मटण खाऊन महादेवाचे दर्शन घेतलेः शिंदे गटाचे विजय शिवतारे यांचा आरोप

 पुणेः राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मटण खाऊन महादेवाचे दर्शन घेतले, असा गंभीर आरोप शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी केला आहे. शिवतारे यांनी फेसबुक पोस्ट करून सुप्रिया सुळे यांच्यावर हा आरोप केल्यामुळे सुळे या नवीन वादात सापडण्याची आणि हा राजकीय वाद तापण्याची शक्यता दिसू लागली आहे.  सुप्रिया सुळे यांनी शनिवारी एका हॉटेलात मटण खाऊन नंतर महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतले, असे शिवतारे यांनी म्हटले आहे. शिवतारे यांनी फेसबुकवर सुप्रिया सुळे यांचा हॉटेलमधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सुप्रिया सुळे ‘मी हीच थाळी खाल्ली’ असे म्हणताना दिसत आहेत. या हॉटेलमध्ये मटण खाल्ल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याचा फोटोही शिवतारे यांनी शेअर केला आहे. आधी मटण खाल्ले. मग भैरवनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मग महादेव मंदिरात गेल्या....
शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हासाठी २ हजार कोटींचा सौदा….संजय राऊतांचा गंभीर आरोप
महाराष्ट्र, राजकारण

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हासाठी २ हजार कोटींचा सौदा….संजय राऊतांचा गंभीर आरोप

मुंबईः केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देऊन टाकले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर राजकीय नेत्यांबरोबरच कायदेतज्ज्ञही टीका करत असतानाच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी आर्थिक व्यवहाराचा गंभीर आरोप केला आहे. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह देण्यासाठी आतापर्यंत २ हजार कोटींचा सौदा झाल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. ‘माझी खात्रीची माहिती आहे आहे... चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आतापर्यंत २००० कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत... हा प्राथमिक आकडा आहे आणि १०० टक्के सत्य आहे... बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील... देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते...’ असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. संजय राऊत यांनी या ट्विटसोबत लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एक कविताही शेअर केली आहे. ‘ही न्याय...
अमृता फडणवीसांवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे भाजपचा ‘बाहुबली’ नेता जिल्ह्यातून हद्दपार!
महाराष्ट्र, विशेष

अमृता फडणवीसांवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे भाजपचा ‘बाहुबली’ नेता जिल्ह्यातून हद्दपार!

चंद्रपूरः भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांच्यावर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या भाजप नेत्याला पोलिसांनी चंद्रपूर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी शहरातील भाजप नेते खेमचंद गरपल्लीवार असे हद्दपार केलेल्याचे नाव आहे. विशेष म्हणजे गरपल्लीवार हे गोंडपिपरीतील ‘बाहुबली’ नेते म्हणून ओळखले जातात. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत नोव्हेंबर २०२२ मध्येच त्यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोंडपिपरी येथील खेमचंद गरपल्लीवार यांनी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गायिका पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. या पोस्टमुळे भाजप कार्यकर्ते नाराज झाले होते. त्यांनी पोलिसांत ...
बारावी परीक्षेत इंग्रजीचा पेपर फोडून गुरूजींनीच तयार केल्या कॉप्या, परभणी जिल्ह्यात सहा शिक्षकांना ठोकल्या बेड्या!
महाराष्ट्र

बारावी परीक्षेत इंग्रजीचा पेपर फोडून गुरूजींनीच तयार केल्या कॉप्या, परभणी जिल्ह्यात सहा शिक्षकांना ठोकल्या बेड्या!

परभणीः इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी राज्यात कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबवण्यात येत असतानाच परभणी जिल्ह्यात सहा शिक्षकांनीच बारावी परीक्षेचा इंग्रजीचा पेपर फोडून विद्यार्थ्यांसाठी कॉप्या तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या सहा शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटकही करण्यात आली आहे. इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी राज्यभर कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबवण्यात येत आहे. त्यासाठी परीक्षेच्या आधी मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीमही हाती घेण्यात आली होती. कॉपीमुक्तीसाठी शिक्षकांच्या कार्यशाळाही आयोजित करण्यात आल्या होत्या. एवढे करूनही ज्यांच्यावर कॉपीमुक्त परीक्षा घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती, त्याच शिक्षकांनी कॉपीयुक्त परीक्षेचे अभियान हाती घेतल्याचे इंग्रजीच्या पहिल्याच पेपरच्या दिवशी स्पष्ट झाले. त्यामुळे मोठा गाजावाजा करून राबवण्या...
प्रा. विलास भवरे यांना ‘धम्मभूषण’ पुरस्कार
महाराष्ट्र

प्रा. विलास भवरे यांना ‘धम्मभूषण’ पुरस्कार

पुसदः आंबेकरी चळवळीतील सक्रीय कवि, रंगकर्मी आणि पुसद येथील फुलसिंग नाईक महाविद्यालयातील मराठीचे प्राध्यापक विलास भवरे यांना धम्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रा. विलास भवरे यांनी धम्म चळवळीत दिलेल्या योगदानाबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व सांस्कृतिक चळवळीत दिलेल्या योगदानाच्या सन्मानार्थ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. धम्म चळवळीत महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या उपासकांच्या कार्याच्या गौरवार्थ अमरावतीच्या महाबोधी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो. यवतमाळ जिल्ह्याच्या नेर तालुक्यातील वटफळी वटफळा येथे येत्या ३ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या ३१ व्या बौद्ध धम्म परिषदेत कपिलवस्तु येथील जागतिक किर्तीचे भदन्त धम्मप्रिय महाथेरो यांच्या हस्ते प्रा. विलास भवरे यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय भिक्खू संघाचे सचिव प्रा...
सनातन मनुवादी छत्रपतींना आजही शुद्र समजतातः संयोगिताराजेंच्या काळाराम मंदिर अनुभवावरून जितेंद्र आव्हाडांचे टिकास्त्र
महाराष्ट्र, विशेष

सनातन मनुवादी छत्रपतींना आजही शुद्र समजतातः संयोगिताराजेंच्या काळाराम मंदिर अनुभवावरून जितेंद्र आव्हाडांचे टिकास्त्र

मुंबईः नाशिकच्या काळा मंदिरातील महंतांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगिताराजे यांना वेदोक्त मंत्र म्हणण्यास मज्जाव केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले असून काळाराम मंदिरात घडलेल्या या प्रकारावरून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकारावरून संताप व्यक्त केला असून छत्रपती शिवरायांबरोबर सनातनी मनुवादी असेल वागले. छत्रपती संभाजी महाराजांना हीच वागणूक दिली. सनातन मनुवादी छत्रपतींना आजही शुद्र समजतात, अशा शब्दांत आ. आव्हाड यांनी टिकास्त्र सोडले आहे. छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगिताराजे या नाशिकच्या काळाराम मंदिरात गेल्या होत्या. त्या ठिकाणी त्यांना आलेला अनुभव त्यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करून शेअर केला आहे. काळाराम मंदिरातील महंतांनी आपल्याला वेदोक्त मंत्र म्हणण्यास मज्जाव केल्याचा आरोप त्यांनी या पोस्टम...
सहायक प्राध्यापकाची २ हजार ८८ पदे भरण्यास वित्त विभागाची मंजुरी, भरती प्रक्रिया सुरू
महाराष्ट्र

सहायक प्राध्यापकाची २ हजार ८८ पदे भरण्यास वित्त विभागाची मंजुरी, भरती प्रक्रिया सुरू

मुंबई:  विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हीत आणि महाविद्यालयाच्या प्रशासनिक बाबींवर होणारा विपरीत परिणाम विचारात घेऊन सहायक प्राध्यापक, प्राचार्य, शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल ही पदे भरण्यास वित्त विभागाने मान्यता दिली असून ही पदे भरण्यात येणार असल्याची माहिती, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. वित्त विभागाने २ हजार ८८ सहायक प्राध्यापक पदांच्या पदभरतीवरील निर्बंध शिथिल करून ही पदभरती करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार ही पदभरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे,असे पाटील म्हणाले.  १०० टक्के रिक्त होणारी प्राचार्य संवर्गातील पदे भरण्यासदेखील मान्यता देण्यात आली आहे.याशिवाय उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेल्या पदांपैकी उर्वरित ग्रंथपाल - १२१ आणि शारीरिक शिक्षण संचालक - १०२ अशी एकूण २२३ पदे भरण्यास दिलेली स्थगिती शिथिल करण्याबाबत वित्त व...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!