पुण्याच्या वाकड भागात मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; भोजपुरी अभिनेत्री, मॉडेलचा समावेश

 पुणेः  पिंपरी-चिंचवड पोलिसांनी वाकड परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलमधून चालणाऱ्या मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या सेक्स रॅकेटमध्ये एक भोजपुरी अभिनेत्री आणि एका मॉडेलचा समावेश आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

भोजपुरी अभिनेत्री आणि एका मॉडेलला वेगवेगळे बहाणे करून वेश्या व्यवसायात ओढण्यात आले होते.  अटक करण्यात आलेल्या तिघांनी या अभिनेत्री व मॉडेलला वेश्या व्यवसाय करण्यात प्रवृत्त केले होते. याबाबतची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी खातरजमा केली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या गुप्तचरांनी डमी ग्राहकाची नियुक्ती केली.

या डमी ग्राहकांनी त्यांच्या हँडलरशी संपर्क साधला. त्यानंतर अभिनेत्री आणि मॉडेलचे फोटो शेअर केले आणि हॉटेलच्या खोल्याही बुक केल्या. त्यानंतर गुन्हे शाखेचे शुक्रवारी सायंकाळी या पंचतारांकित हॉटेलवर छापा टाकला. या छाप्यादरम्यान अभिनेत्री व मॉडेलची सुटका करण्यात आली.

प्रबीर मजुमदार, दिनेश यादव आणि विराज यादव अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या तिघांनीच अभिनेत्री व मॉडेलला मोठ्या रकमेचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायाच्या रॅकेटमध्ये ओढले होते. या रॅकेटचे जाळे कुठपर्यंत पसरले आहे, त्यात किती महिलांचा समावेश आहे, याचा तपास आता पोलिस करत आहेत. पिपंरी-चिंचवड आणि आसपासच्या भागात वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या लोकांचाही तपासही पोलिसांनी सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!