छत्रपती संभाजीराजेंच्या पत्नी संयोगिताराजेंना नाशिकच्या काळाराम मंदिरात वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंतांकडून मज्जाव!
नाशिकः नाशिकच्या काळा मंदिरातील महंतांनी आपल्याला वेदोक्त मंत्र म्हणण्यास मज्जाव केल्याचा आरोप छत्रपती संभीजीराजे यांच्या पत्नी संयोगिताराजे यांनी केला आहे. शंभर वर्षातही ही मानसिकता का बदलली नाही? असा सवाल करत संयोगिताराजे यांनी अजूनही छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलेल्या विचारांना खूप खोलवर रूजवावे लागणार आहे, असे म्हटले आहे.
छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगिताराजे या नाशिकच्या काळाराम मंदिरात गेल्या होत्या. त्या ठिकाणी त्यांना आलेला अनुभव त्यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करून शेअर केला आहे. काळाराम मंदिरातील महंतांनी संयोगिताराजे यांनाच वेदोक्त मंत्र म्हणण्यास मज्जाव केल्यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे.
नाशिकच्या काळा राम मंदिरातील तथाकथित महंतांनी माझ्या पूजेसाठी पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या वारशामुळे मी ठामपणे विरोध केला. अने...