बारसूतील रिफायनरीविरोधी आंदोलन चिघळलेः पोलिस आणि आंदोलकांत जोरदार राडा, ग्रामस्थांवर लाठीमार
रत्नागिरीः रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथील रिफायनरीविरोधात स्थानिक ग्रामस्थांनी सुरू केलेले आंदोलन चिघळू लागले आहे. रिफायनरी सर्वेक्षणावरून आंदोलक आणि पोलिसांत आज जोरदार राडा झाला. सर्वेक्षणाला विरोध करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांना लाठीमार करत अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. सध्या बारसूमध्ये परिस्थिती तणावपूर्ण आहे. त्या पार्श्वभूमीवर तेथे तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
रिफायनरीसाठी सुरू असलेले सर्वेक्षण बंद पाडण्यासाठी आंदोलक सर्वेक्षणस्थळी पोहोचले. त्यांना तेथे तैनात असलेल्या पोलिसांनी अडवून मज्जाव केला. त्यामुळे आंदोलक आक्रमक झाले. आक्रमक आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि आंदोलकांवर लाठीमारही केला. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत हे बारसू येथे आंदोलकांना भेटण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना प्रवेश नाकारला. पोलिसां...