देश

काँग्रेसला मिळाला नवा चेहराः मल्लिकार्जुन खारगे यांची अध्यक्षपदी बहुमताने निवड, २४ वर्षानंतर गांधी कुटुंबाहेरचा अध्यक्ष
देश, राजकारण

काँग्रेसला मिळाला नवा चेहराः मल्लिकार्जुन खारगे यांची अध्यक्षपदी बहुमताने निवड, २४ वर्षानंतर गांधी कुटुंबाहेरचा अध्यक्ष

नवी दिल्लीः  काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी ज्येष्ठ काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खारगे यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे. तब्बल २४ वर्षांनंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदी गांधी कुटुंबाहेरील व्यक्तीची अध्यक्षपदी वर्णी लागली आहे.  गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक देशभर चर्चेचा विषय बनली होती. त्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेमकी कोणाची वर्णी लागणार? याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर आज काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यात मल्लिकार्जुन खारगे यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी बहुमताने निवड झाली आहे.  या निवडणुकीत मल्लिकार्जुन खारगे यांना ७ हजार ८९७ मते मिळाली आहेत. त्यांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उभे असलेले ज्येष्ठ काँग्रेस नेते शशी थरूर यांना १ हजार ७२ मते मिळाली आहेत. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर ...
गुजरात, हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूकः भाजपची सत्ता राहणार की सत्तांतर होणार? आज फैसला!
देश, राजकारण

गुजरात, हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूकः भाजपची सत्ता राहणार की सत्तांतर होणार? आज फैसला!

नवी दिल्लीः  गुजरात आणि हिमाचल प्रदेशात भाजपची सत्ता कायम राहणार की तेथील सरकार बदलणार? गुरूवारी येणाऱ्या निवडणूक निकालानंतर हे स्पष्ट होऊन जाईल. दोन टप्प्यात झालेल्या गुजरात विधानसभा आणि एक टप्प्यात झालेल्या हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणी गुरूवारी होणार आहे. त्याचबरोबर विविध विधानसभेच्या ६ आणि लोकसभेच्या एका जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणीही गुरूवारीच होईल. सायंकाळी उशिरापर्यंत या मतमोजणीचे निकाल हाती येण्याची अपेक्षा आहे. सर्वांचेच लक्ष गुजरातकडेः सर्वांचे लक्ष लागले आहे ते गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे. गुजरात विधानसभेच्या १८२ जागांसाठी मतदान घेण्यात आले. येथे दोन टप्प्यात मतदान झाले. पहिल्या टप्प्यात ८९ आणि दुसऱ्या टप्प्यात ४३ जिल्ह्यातील ९३ मतदारसंघात मतदारांनी मतदानचा हक्क बजावला. या निवडणुकीत अनेक दिग्गजांचे भवितव्याचा मतदारांनी नेमका कोणता फैसला...
महाराष्ट्रात होणार जी-२० परिषदेच्या १४ बैठका, शहरांचे ब्रँडिंग करण्याची संधी; मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
दुनिया, देश

महाराष्ट्रात होणार जी-२० परिषदेच्या १४ बैठका, शहरांचे ब्रँडिंग करण्याची संधी; मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई: भारताला जी-२० परिषदेचे अध्यक्षपद मिळाले ही अतिशय गौरवशाली बाब असून महाराष्ट्रात या परिषदेच्या १४ बैठका होणार आहेत. त्यानिमित्त आपल्या राज्याच्या विकासासोबतच संस्कृती आणि शहरांचे ब्रँडींग करण्याची संधी आहे. जगभरात महाराष्ट्राचा नावलौकीक वाढावा यासाठी शहर सौंदर्यीकरण, स्वच्छता यांवर भर देऊन जास्तीत जास्त लोकांचा सहभाग यात वाढवावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. जी-२० परिषदेनिमित्त महाराष्ट्रात होणाऱ्या बैठकांच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतला. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते. १ डिसेंबरपासून भारताला जी-२० परिषदेचे अध्यक्षपद मिळाले असून ते ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत ...
शाळा- महाविद्यालयात हिजाब घालणे चूक की बरोबर? सुप्रीम कोर्टाच्या दोन न्यायमूर्तींमध्येच मतभेद, कसे ते वाचा सविस्तर
देश, विशेष

शाळा- महाविद्यालयात हिजाब घालणे चूक की बरोबर? सुप्रीम कोर्टाच्या दोन न्यायमूर्तींमध्येच मतभेद, कसे ते वाचा सविस्तर

नवी दिल्लीः शाळा-महाविद्यालयांसह अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये मुस्लीम विद्यार्थिनींनी हिजाब घालून येणे चूक की बरोबर? हे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठालाही एकमताने ठरवता आले नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने याबाबत वेगवेगळे निकाल दिले. हिजाबवर बंदी घालण्याचा कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय एका न्यायमूर्तींनी वैध ठरवला तर दुसऱ्या न्यायमूर्तींनी हा निर्णय फेटाळून लावला. आता हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे जाण्याची शक्यता आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थिनींनी हिजाब घालून येण्यावर कर्नाटक सरकारने बंदी घातली आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने कर्नाटक सरकारचा हा निर्णय वैध ठरवला आहे. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणाऱ्या तब्बल २६ याचिका दाखल झाल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठापुढे या सर्व याचिकांवरील एकत्रित सुनावणी झाली. न्यायमूर्ती सुधांशू धुलिया आणि...
महापरिनिर्वाणदिनीच बाबासाहेबांची विटंबनाः हिंदू संघटनेने छापले ‘अंगात भगवे वस्त्र आणि कपाळावर भस्म’ असलेले वादग्रस्त पोस्टर!
देश, विशेष

महापरिनिर्वाणदिनीच बाबासाहेबांची विटंबनाः हिंदू संघटनेने छापले ‘अंगात भगवे वस्त्र आणि कपाळावर भस्म’ असलेले वादग्रस्त पोस्टर!

नवी दिल्लीः  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाणदिनानिमित्त सबंध देश अभिवादन करत असतानाच तामिळनाडूतील इंदू मक्कल काची म्हणजेच हिंदू लोकांचा पक्ष या राजकीय पक्षाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वादग्रस्त पोस्टर त्या राज्यातील भिंतीभिंतीवर लावून विटंबना केली आहे. या पोस्टरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी भगवे वस्त्र परिधान केल्याचे आणि डोक्यावर भस्म लावल्याचे दाखवण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ‘भगव्या’ विचारांचे होते असे दाखवण्याचा हिणकस प्रयत्न बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनीच या हिंदू संघटनेने केला असून त्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. अनेकांनी या कृत्याचा निषेध केला आहे. इंदू मक्कल काची या हिंदू राजकीय पक्षाने बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनीच कपाळावर भस्म आणि अंगात भगवे वस्त्र घातलेले बाबासाहेब आंबेडकरांचे पोस्टर तामिळनाडूत विविध ठिकाणी भिंतीवर लावले आहेत. या पोस्टरवर ...
दिव्यांग सक्षमीकरणात महाराष्ट्राला सात राष्ट्रीय पुरस्कार, औरंगाबादची संस्थाही मानकरी
देश

दिव्यांग सक्षमीकरणात महाराष्ट्राला सात राष्ट्रीय पुरस्कार, औरंगाबादची संस्थाही मानकरी

मुंबई: दिव्यांग सक्षमीकरणात महाराष्ट्र राज्याने तब्बल सात पुरस्कार पटकावले आहेत. ‘सुगम्य भारत अभियान’ ची अंमलबजावणी करणारे सर्वश्रेष्ठ राज्य हा पुरस्कार दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे यांना घोषित झाला आहे. सन २०२१ व २०२२ या दोन वर्षांचे हे पुरस्कार असून केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय अंतर्गत दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या वतीने ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविले होते. सन २०२१ साठी अशोक तुकाराम भोईर, ठाणे (सर्वश्रेष्ठ दिव्यांग व्यक्ती), श्रीमती विमल पोपट गव्हाणे, पुणे (श्रेष्ठ दिव्यांग व्यक्ती), डॉ. शुभम रामनारायण धूत, पुणे (श्रेष्ठ दिव्यांग व्यक्ती), जिल्हा परिषद, अकोला (दिव्यांग अधिकार कायदा/ वैश्विक ओळखपत्र प्रणाली तथा दिव्यांग व्यक्तींसाठीच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणारा जिल्हा) यांची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. सन २०२२ मध्ये जयसिंग कृष...
भीमा कोरेगाव हिंसाचारात एल्गार परिषदेची कोणतीही भूमिका नाही: वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची शपथपत्रात कबुली
देश, विशेष

भीमा कोरेगाव हिंसाचारात एल्गार परिषदेची कोणतीही भूमिका नाही: वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची शपथपत्रात कबुली

मुंबईः भीमा कोरेगावमध्ये १ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या हिंसाचारात पुणे शहरात आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेच्या कार्यक्रमाची कोणतीही भूमिका नव्हती, अशी कबुली या हिंसाचाराचा तपास करणाऱ्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने आपल्या शपथपत्रात दिली आहे. त्यामुळे मागील चार-पाच वर्षे सरकारपासून पोलिस आणि एनआयएपर्यंतच्या सर्व यंत्रणा दलित, दलितांसाठी काम करणारे कार्यकर्ते, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्यामागे नेमक्या कोणत्या आधारावर हात धुवून लागली होती, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. ‘द वायर’ने दिलेल्या वृत्तानुसार, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश मोरे यांनी या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या दोन सदस्यीय न्यायालयीन आयोगासमोर दाखल केलेल्या शपथपत्रात ही कबुली दिली आहे. मोरे यांच्या या कबुलीमुळे पुणे पोलिसांनी नंतर एनआयएने अटक केलेले मानवी हक्कांसाठी लढणारे कार्यकर्ते,...
राजधानी दिल्लीत नाइट लाइफः ३०० पेक्षाजास्त आस्थापना २४ तास सुरू राहणार
जीवनशैली, देश, विशेष

राजधानी दिल्लीत नाइट लाइफः ३०० पेक्षाजास्त आस्थापना २४ तास सुरू राहणार

नवी दिल्लीः मुंबईत नाइट लाइफ सुरू करण्याचे युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांचे स्वप्न राजधानी दिल्लीतही साकार होणार आहे. दिल्लीतील ३०० पेक्षा जास्त आस्थापना २४ तास सुरू ठेवता येणार आहेत. यामध्ये रेस्टॉरंट्सपासून मेडिकलची दुकाने, परिवहन सेवा, बीपीओ आणि ऑनलाइन डिलिव्हरीचा समावेश आहे. या श्रेणीतील दुकानांनी २४ तास सुरू ठेवण्याच्या परवानगीसाठी अर्ज केल्यानंतर त्यांना पुढील आठवड्यापासून परवानगी दिली जाणार आहे.  दिल्लीचे उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी ३१४ आस्थापनांना २४ तास सुरू ठेवण्याची सूट देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यामधील काही प्रस्ताव २०१६ पासून प्रलंबित होते. आता उपराज्यपालांनी दिलेल्या निर्देशांनुसार यासंबंधीची अधिसूचना सात दिवसांच्या आत जारी करावी. या निर्णयानंतर मोठ्या शहरांमध्ये प्रचलित असलेल्या ‘नाइट लाइफ’ संस्कृतीलाही चालना मिळणार असल्याचे मानले जात आहे. यामध्...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुरुवारी मुंबई दौऱ्यावर; विविध विकासकामांचे करणार लोकार्पण, भूमिपूजन
देश, राजकारण

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुरुवारी मुंबई दौऱ्यावर; विविध विकासकामांचे करणार लोकार्पण, भूमिपूजन

मुंबई:  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे उद्या, गुरुवारी, १९ जानेवारी रोजी एकदिवसीय मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते मुंबईतील सुमारे ३८ हजार ८०० कोटी रुपयांच्या विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण, भूमीपूजन होणार असून प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या एक लाखापेक्षा जास्त लाभार्थींना मंजूर झालेल्या कर्जांच्या हस्तांतरणाचा प्रारंभ होणार आहे. वांद्रे- कुर्ला संकुल येथील एमएमआरडीए मैदानावर हा कार्यक्रम होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती यावेळी असणार आहे. प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते मेट्रो मार्गिका २-अ आणि ७ चे लोकार्पण, बृहन्मुंबई महापालिकेच्या २० नवीन ‘हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’चे लोकार्पण, सात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची पायाभरणी, महानगरपालिकेच्या गोरेगाव, भांडुप आणि ओशिवरा...
सांगलीतील तब्बल ४० गावे कर्नाटकात समाविष्ट करण्याचा घाट, महाराष्ट्राचा लचका तोडण्याचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा इरादा
देश, विशेष

सांगलीतील तब्बल ४० गावे कर्नाटकात समाविष्ट करण्याचा घाट, महाराष्ट्राचा लचका तोडण्याचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा इरादा

बेंगळुरूः गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नी समन्वय ठेवून हा प्रश्न धसास लावण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने दोन मंत्र्यांची नियुक्ती करून काही तास उलटले नाही तोच कर्नाटक सरकारने महाराष्ट्राचा आणखी लचका तोडण्याचा मनसुबा जाहीर केला आहे.कर्नाटकातील सीमा भागातील मराठी भाषक गावे महाराष्ट्रात समाविष्ट होणे तर दूरच पण सांगली जिल्ह्यातील तब्बल ४० गावांचा कर्नाटकमध्ये समावेश करण्याचा गांभीर्याने विचार सुरू असल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री बस्वराज बोम्बई यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील दुष्काळग्रस्त ४० गावांनी कर्नाटक राज्यात सामील होण्याचा ठराव नुकताच मंजूर केला होता. त्या ठरावानंतर आता कर्नाटकने ही ४० गावे आपल्या राज्यात सामावून घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे बेळगाव, निपाणी, कारवारसह कर्नाटकातील म...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!