Blog

तलाठी भरतीला मुहूर्त: पहिल्या टप्प्यात होणार एक हजार पदांची भरती!
महाराष्ट्र

तलाठी भरतीला मुहूर्त: पहिल्या टप्प्यात होणार एक हजार पदांची भरती!

मुंबई, : महसूल विभागाअंतर्गत तलाठी भरती प्रक्रिया करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात तलाठी संवर्गातील भरण्यात येणाऱ्या १ हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्यात यावी असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे - पाटील यांनी आज दिले. विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव असिम गुप्ता, महसूल विभागाचे सहसचिव श्रीराम यादव, सहसचिव संजय बनकर यांच्यासह महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.  गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा तलाठी याच्याशी संबंध येत असतो. सातबारा, दाखले यासाठी नियमितपणे तलाठी यांच्या संपर्कात राहावे लागते. सध्या तलाठ्याकडे ३ ते ४ गावांचा पदभार असल्याने गावोगावी जावे लागते. गावोगावच्या कार्यालयीन कामकाजाचे नियोजन करताना वार ठरवून घेण्याब...
कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी अननसाचा रस फायदेशीर
जीवनशैली

कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी अननसाचा रस फायदेशीर

मुंबई: शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी ज्यूसचे सेवन करणे अत्यंत फायदेशीर मानले जाते. ज्यूसमधील पोषक तत्त्वे शरीराला अनेक आजारांपासून वाचवतात. बहुतेक लोक मोसंबी आणि डाळिंबाचा रस पिणे पसंत करतात; परंतु हा रस जास्ती गोड असल्यामुळे मधुमेह आणि कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते. तसेच कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी किंवा नियंत्रित करण्यासाठी अननसाचा रस अधिक फायदेशीर ठरू शकते. अननसात (Pineapple) ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. अननस हे लिंबूवर्गीय फळ असून ते चरबीदेखील कमी करण्यास मदत करते. उच्च कोलेस्ट्रॉलमुळे रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होऊ लागते. यामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, मधुमेह आणि उच्च रक्तदाब होऊ शकतो. लिंबूवर्गीय फळे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. यामध्ये अननस हा सर्वांत उत्तम पर्याय मानला जातो. अननसामध्ये व्हिटॅमिन ‘ए’...
पुरोगामी महाराष्ट्राचे राष्ट्रीय पातळीवर ‘दैवतीकरण’, प्रजासत्ताक दिन संचलनात  साडेतीन शक्तीपीठांचा चित्ररथ
देश, विशेष

पुरोगामी महाराष्ट्राचे राष्ट्रीय पातळीवर ‘दैवतीकरण’, प्रजासत्ताक दिन संचलनात  साडेतीन शक्तीपीठांचा चित्ररथ

मुंबई:  फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र ही महाराष्ट्राची पुरोगीमी ओळख आता इतिहासजमा होणार का? असा प्रश्न उपस्थित व्हावा त्या दिशेने महाराष्ट्र सरकारची वाटचाल सुरू आहे. केवळ देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही पुरोगामी राज्य अशी ओळख असलेला महाराष्ट्र येत्या प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात महाराष्ट्रातील तीन शक्तीपीठांचा चित्ररथ सामील करणार आहे. हे महाराष्ट्राचे राष्ट्रीय पातळीवर होणारे दैवतीकरण तर नाही ना?  असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क कार्यालयाने दिलेल्या प्रेसनोट नुसार, प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी व्हावा, यासाठी सतत आग्रही राहून केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी थेट बोलल्यानंतर सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश आ...
कुलगुरू महोदय, फेलोशिपधारकांकडून आठवड्याला किमान दहा तास काम घ्या, अध्यापकांचा दुष्काळ संपवा आणि पैसेही वाचवा!
महाराष्ट्र, विशेष

कुलगुरू महोदय, फेलोशिपधारकांकडून आठवड्याला किमान दहा तास काम घ्या, अध्यापकांचा दुष्काळ संपवा आणि पैसेही वाचवा!

औरंगाबादः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पूर्णवेळ संशोधन करणाऱ्या विशेषतः विविध संस्थांकडून फेलोशिप घेणाऱ्या संशोधक छात्रांसाठी बायोमेट्रिक उपस्थिती अनिवार्य केल्यामुळे या निर्णयाच्या विरोधात संशोधक छात्र आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. मात्र यूजीसी, सीएसएसआर आणि विविध राज्यस्तरीय संस्थांकडून ज्या नियम व अटींच्या अधीन राहून ही फेलोशिप बहाल करण्यात येते, त्याची अंमलबजावणी विद्यापीठ प्रशासनाकडूनच करून घेण्यात येत नसल्याची धक्कादायक माहिती आहे. या फेलोशिपधारकांकडून आठवड्याला दहा तासांपेक्षा जास्त होणार नाही, एवढा काळ काम करून घेणे अपेक्षित असताना विद्यापीठ प्रशासन या फेलोशिपधारकांना मोकळीक देत असल्यामुळे ते उंडारू लागले आहेत. त्यामुळे आता विद्यापीठ प्रशासनाने नियम व अटींच्या अंमलबजावणीचा बडगा उगारून त्यांना कामाला लावण्याची गरज निर्माण झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद...
शाळा, महाविद्यालयातील लैंगिक अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी राज्यात प्रभावी उपाययोजनाः फडणवीस
महाराष्ट्र

शाळा, महाविद्यालयातील लैंगिक अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी राज्यात प्रभावी उपाययोजनाः फडणवीस

नागपूर: शाळा, महाविद्यालयातील किशोरवयीन मुलांमध्ये अश्लील व्हिडिओ व तत्सम चित्रिकरण यांच्या प्रभावामुळे विकृत दृष्टीकोन निर्माण होणे व त्यातून लैंगिक अत्याचार/ हिंसेच्या घटना घडू नयेत यासाठी राज्यात प्रभावी उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली. मुंबईतील माटुंगा येथील महानगरपालिकेच्या शाळेतील तेरा वर्षीय विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेबाबत सदस्य उमा खापरे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले होते. त्याला उत्तर देतांना उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. माटुंगा येथील घटना चिंताजनक आहे. या घटनेचा तपास सुरू आहे. अशा विकृतींना आळा घालणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. सायबर गुन्ह्यांबाबत  संबंधित प्राप्त तक्रारीची तांत्रिक तपासणी करण्यासाठी राज्यामध्ये प्रत्येक पोलीस ठाण्यात सायबर प्रयोगशाळा स्थाप...
शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत राज्यपाल कोश्यारी म्हणाले, शिवाजी जुन्या काळातील आदर्श, नितीन गडकरी तर…
महाराष्ट्र, विशेष

शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत राज्यपाल कोश्यारी म्हणाले, शिवाजी जुन्या काळातील आदर्श, नितीन गडकरी तर…

औरंगाबादः महाराष्ट्राचे राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करत ते जुन्या काळातील आदर्श असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले. शिवाजी तर जुन्या काळातील आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील, असे कोश्यारी म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षांत समारंभात कुलपती म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी बोलत होते. शाळेत शिक्षण घेताना तुमचे आवडते नेते कोण असा प्रश्न आम्हाला शिक्षक विचारायचे. तेव्हा आमच्यापैकी काही जण सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी तर काही जण पंडित जवाहरलाल नेहरी यांचे नाव सांगायचे. शिवाजी तर जुन्या काळातील आदर्श होते. आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून नितीन गडकरी यांच्यापर्यंत नव्या युगाचे आदर्श सापडतील, असे कोश्यारी...
काहीही झालं तरी धीर सोडू नका, मदत देण्यास सरकारला भाग पाडूः उद्धव ठाकरे यांचा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा
महाराष्ट्र

काहीही झालं तरी धीर सोडू नका, मदत देण्यास सरकारला भाग पाडूः उद्धव ठाकरे यांचा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा

औरंगाबादः परतीच्या पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आजपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी आज औरंगाबाद जिल्ह्याच्या गंगापूर तालुक्यातील दहेगाव व पेंढापूर येथील शेतीच्या नुकसानीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. काहीही झाले तरी धीर सोडू नका, अशा शब्दांत त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा आहे. यावेळी शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या. जे सुरू आहे ते सर्व दुर्दैवी आहे. पण तुम्ही काळजी करू नका, धीर सोडू नका. मी तुमच्या सोबत आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. संकटे येत असतात. त्या संकटांना सामोरे जायचे आहे. काहीही झालं तरी तुम्ही धीर सोडू नका. आता रडायचे नाही, लढायचे आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.  कोरोनाच्या काळात अर्थव्यवस्था ठप्प असताना शेतकरी जर उभा राहिला नसता तर आपल्या राज्याचे...
ब्रिटनमध्ये मोठी उलथापालथः वाढत्या महागाईमुळे प्रधानमंत्री लिझ ट्रस यांनी दिला अवघ्या ४५ दिवसांत राजीनामा
दुनिया

ब्रिटनमध्ये मोठी उलथापालथः वाढत्या महागाईमुळे प्रधानमंत्री लिझ ट्रस यांनी दिला अवघ्या ४५ दिवसांत राजीनामा

लंडनः ब्रिटनमध्ये एक मोठी राजकीय घडामोड घडली असून ब्रिटनच्या प्रधानमंत्रा लिझ ट्रस यांनी अवघ्या ४५ दिवसांतच पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी ६ सप्टेंबर २०२२ रोजी प्रधानमंत्रिपदाची शपथ घेतली होती. आता पुढील आठवड्यात नव्या प्रधानमंत्र्यांची निवड केली जाणार आहे.  मागील काही दिवसांमध्ये ब्रिटनमध्ये अन्नधान्यांच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे येथील महागाई गेल्या ४० वर्षांतील उच्चांकी स्तरावर पोहोचली आहे.  गेल्या महिन्यात झालेली दरवाढ ही १९८० नंतरची सर्वात मोठी दरवाढ ठरली होती. आर्थिक आणि राजकीय संकट असलेल्या लिझ ट्रस सरकारसमोर महागाई नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान होते. लिझ ट्रस यांनी प्रधानमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ब्रिटनमधील महागाई नियंत्रणात आणण्यासाठी काही धोरणात्मक पावले उचलली होती. मात्र ब्रिटनचे नेतृत्त्व स्वीकारल्यानंतर त्यांनी केवळ सहा आठवड्यांतच प...
वीज मनोरे व वाहिन्या उभारण्यासाठीच्या जमिनीसाठी देणार तीन वर्षातील खरेदी-विक्री व्यवहारातील सर्वाधिक दराने मोबदला
महाराष्ट्र

वीज मनोरे व वाहिन्या उभारण्यासाठीच्या जमिनीसाठी देणार तीन वर्षातील खरेदी-विक्री व्यवहारातील सर्वाधिक दराने मोबदला

मुंबईः अति उच्च दाब पारेषण वाहिन्यांसाठीच्या मनोऱ्यांसाठी जमिनीचा मोबदला देण्याकरिता सुधारित धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. वीज मनोरा आणि वाहिनी उभारण्यासाठी जमिनीचे अधिग्रहण केले जात नाही.  केवळ जमिनीचा वापर केला जातो. मनोरा उभारतांना जमिनीच्या आणि पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपोटी मोबदला दिला जातो. यासाठी सध्या असलेल्या शासनाच्या धोरणात सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. सध्याच्या धोरणात बाधित शेतकरी आणि जमीन मालकांना मिळणारी नुकसान भरपाई तुटपुंजी असल्याने त्यांचा तीव्र विरोध होत आहे. त्यामुळे पारेषण कंपन्याचे विविध प्रकल्प रखडले आहेत. नव्या धोरणामुळे मनोरा आणि वाहिनी उभारणी वेगाने होवून वीज निर्मितीस मदत होईल. या सुधारित धोरणाप्रमाणे ६६ के.व्ही. व त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या अतिउच्चदाब पारेषण वाहिन्यांसाठ...
नरेंद्र मोदी आणि गुजरात दंगलीवरील बीबीसीची डॉक्युमेंट्री यूट्यूब, ट्विटरवर ब्लॉक; केंद्र सरकारचा बडगा
दुनिया, विशेष

नरेंद्र मोदी आणि गुजरात दंगलीवरील बीबीसीची डॉक्युमेंट्री यूट्यूब, ट्विटरवर ब्लॉक; केंद्र सरकारचा बडगा

नवी दिल्लीः बीबीसी या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीने अलीकडेच प्रदर्शित केलेली नरेंद्र मोदी आणि गुजरात दंगलीवरील ‘इंडियाः दी मोदी क्वेशन’ ही वादग्रस्त डॉक्युमेंट्री म्हणजेच माहितीपट दाखवणारे अनेक यूट्यूब चॅनल्सवर मोदी सरकारने बंदी घातली आहे. केवळ यूटयूबच नव्हे तर या डॉक्युमेंट्रीची लिंक शेअर करणारे पन्नासहून अधिक ट्विटर अकाऊंट्सवरही बंदी घालण्यात आली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ही कारवाई केली. ब्रिटिश सरकारने २००२ मध्ये गुजरात नरसंहाराची गुप्त पद्धतीने चौकशी केली होती. त्यात गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत, असे या डॉक्युमेंट्रीत दाखवण्यात आले आहे. दोन भागातील डा डॉक्युमेंट्रीच्या पहिल्या भागाचे प्रसारण बीबीसीने ब्रिटनमध्ये केले. परंतु भारतात बीबीसीला ही डॉक्युमेंट्री प्रसारित करण्यास मनाई करण्यात आली आहे. तरीह...