महाराष्ट्रदिनी पोलिस दलातील २९ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरव, सामाजिक एकता अबाधित राखाः पालकमंत्री शिरसाट यांचे आवाहन


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  महाराष्ट्रदिनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते पोलिस दलातील २९ अधिकारी-कर्मचाऱ्यांसह विविध क्षेत्रातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरव करण्यात आला. दहशतवादाचा सक्षमतेने मुकाबला करत असतांना देशांतर्गत शांतता व लोकशाही अबाधित राखून देश आणि राज्य प्रगतीपथावर वेगाने वाटचाल करीत आहे. न्याय, समता, शांतता, बंधुता या मूलभूत तत्त्वांचा अंगीकार करत नागरिकांनी सामाजिक एकता आणि राष्ट्रप्रेम अबाधित ठेवा, असे आवाहन शिरसाट यांनी केले.

महाराष्ट्रदिनाचा सोहळा आज पोलिस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर उत्साहात संपन्न झाला. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली.

यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे, खा. संदिपान भुमरे, माजी खा.चंद्रकांत खैरे तसेच विभागीय आयुक्त दिलीप गावडे, छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, पोलिस आयुक्त प्रवीण पवार, पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड तसेच प्रशासनातील अन्य अधिकारी, सामाजिक, राजकीय कार्यकर्ते, स्वातंत्र्य सैनिक, विद्यार्थी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पोलिस पदके देऊन गौरवण्यात आलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची नावे अशी-

पोलिस पदके

  •  संदीप अनंतराव आटोळे, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग
  • श्रीमती स्वाती रामराव भोर, पोलीस अधीक्षक, लोहमार्ग
  • अशोक रामलू भंडारे, पोलीस निरीक्षक,पोलीस आयुक्तालय
  • श्रीमती गीता मोतीचंद बागवडे, पोलीस निरीक्षक, पोलीस आयुक्तालय
  • शरद बाबुराव जोगदंड, पोलीस निरीक्षक, लोहमार्ग,पोलीस आयुक्तालय
  • इसाक उस्मानखान पठाण, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस आयुक्तालय
  • दिपक परदेशी, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस आयुक्तालय
  • मनोहर बुरुड, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस आयुक्तालय
  • शेख हबीब खान मोहमद, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस आयुक्तालय
  • संजय जानुजी जोगदंड, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस आयुक्तालय
  • विष्णू लक्ष्मणराव उगले, सहायक पोलिस उपनिरीक्षक,पोलीस आयुक्तालय
  • मुश्ताक गफूर शेख, पोलीस हवालदार, पोलीस आयुक्तालय
  • मच्छीन्द्रंनाथ रंगानाथ जाधव, पोलीस हवालदार, पोलीस आयुक्तालय
  • विठ्ठल विनायकराव मानकापे, पोलीस हवालदार, पोलीस आयुक्तालय
  • संतोष लोंढे, पोलीस हवालदार, पोलीस आयुक्तालय
  • शिवाजी राजाराम कचरे, पोलीस हवालदार, पोलीस आयुक्तालय
  • प्रभाकर साहेबराव राऊत, पोलीस हवालदार, पोलीस आयुक्तालय
  • कैलास तेजराव गाडेकर, पोलीस हवालदार, पोलीस आयुक्तालय
  • राजेंन्द्र देविदास चौधरी, पोलीस हवालदार, पोलीस आयुक्तालय
  • मो.इरफान मो.इसाकखान, पोलीस हवालदार, पोलीस आयुक्तालय
  • लक्ष्मण दशरथ किर्तीकर, पोलीस हवालदार, पोलीस आयुक्तालय
  • सुनिल सुरेश बेलकर, पोलीस हवालदार, पोलीस आयुक्तालय
  • शाकिल अहेमद शेख रहीम शेख, पोलीस उपनिरीक्षक, ग्रामीण
  • गफारखान सरोवरखान पठाण, पोलीस उपनिरीक्षक,ग्रामीण
  • खालेद हबीब शेख, सहा. पोलिस उपनिरीक्षक, ग्रामीण
  • अफसर खाजा शेख, पोलीस हवालदार, ग्रामीण
  • राजू बबनराव खरात, पोलीस हवालदार, ग्रामीण
  • विश्वास प्रल्हाद नागरे, पोलीस हवालदार, रा.रा. पो. बल गट क्र.१४, संभाजीनगर
  • अशोक परशुराम पवार, पोलीस अंमलदार, रा.रा. पो. बल गट क्र.१४, संभाजीनगर
  • दिनेश शामराव ढगे, पोलीस अंमलदार, रा.रा. पो. बल गट क्र.१४, संभाजीनगर

प्रशासकीय कामगिरीबाबतचे अन्य पुरस्कार असे

  • राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानः जिल्हाधिकारी दिलीप स्वामी व उपविभागीय कार्यालय कन्नड.
  • आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कारः सजा बाजारात सावंगी तालुका खुलताबाद येथील नारायण पठ्ठे.
  • संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान पुरस्कार (सन २०२३-२४)

-प्रथम पुरस्कार- ग्रामपंचायत पुरस्कारसोयगाव तालुक्यातील जरंडी

-द्वितीय पुरस्कार- कन्नड तालुक्यातील नादरपूर ग्रामपंचायत

-तृतीय पुरस्कार- छत्रपती संभाजी नगर तालुक्यातील दुधड ग्रामपंचायत, -विशेष पुरस्कार- छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील ग्रामपंचायत वाहेगाव वळदगाव व ग्रामपंचायत करोडी.

जिल्हा विकासात अग्रेसर

जम्मू-काश्मीरमध्ये पहेलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करून पालकमंत्री शिरसाट म्हणाले की,   भारत देश हा बलाढ्य आणि विकसनशील देश असून सर्व क्षेत्रात आघाडीवर आहे. जिल्ह्याची विकासाकडे अग्रेसर असून उद्योग, कृषी अशा विविध क्षेत्रांमध्ये प्रगती होत आहे. औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत असून त्यामुळे रोजगार निर्माण होणार आहे. जिल्ह्यात कामगारांना विविध योजनेत २६४ कोटी ४४ लक्ष ९३  हजार रुपयांचा लाभ देण्यात आला आहे.

 आरोग्य,आवास योजना, शिक्षण,ग्रामविकास, आरोग्य क्षेत्रातील सुधारणा यासह लघुउद्योग आणि व्यवसायासाठी जिल्ह्यामध्ये भरीव निधीची तरतूद केली आहे. कायदा सुव्यवस्था आणि शांततेसाठीही पोलीस प्रशासनास अद्यावत वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत असून या विकास प्रक्रियेत सर्व नागरिक, प्रशासकीय अधिकारी व सर्व घटकांनी सहभागी होऊन जिल्ह्याला प्रगतीपथावर नेण्याचा संकल्प करू या, असे आवाहन शिरसाट यांनी केले.

पोलिस दलाच्या ताफ्यात ३३ वाहने

ध्वजारोहण समारंभानंतर पोलिस विभागासाठी अद्यावत ३३ वाहनांचे लोकार्पण पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले. त्यात चारचाकी वाहने, बसेस, दुचाकी वाहने यांचा समावेश असून गतिमान तपास यंत्रणा व कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये या वाहनांचा उपयोग होईल असा विश्वास पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!