व्हॉट्सअप घेऊन आलंय नवीन फिचर, सेंड झालेल्या मेसेजमध्येही आता करता येणार हवा तसा बदल!

कॅलिफोर्नियाः एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या ग्रुपमध्ये चुकीचा मेसेज पाठवला गेल्यास अनेकदा अनेकांची पंचाईत होते. आता मात्र काळजी करण्याचे कारण नाही. यूजर्सच्या गरजा लक्षात घेऊन एकापेक्षा एक नवनवीन फिचर्स आणणाऱ्या व्हॉट्सअपने बऱ्याच दिवसांपासूनची मागणी असणारे एडिट मेसेज पे फिचर आणले आहे. त्यामुळे आता सेंड झालेल्या मेसेजमध्येही बदल करता येणे शक्य होणार आहे.

एडिस मेसेज हे व्हॉट्सअपचे नवीन फिचर सध्या आयओएस बेटा व्हर्जनमध्ये रिलीज करण्यात आले आहे. लवकरच ते यूजर्सना आपल्या फोनमध्येही वापरता येणार आहे. या नवीन फिचरमुळे व्हॉट्सअपमध्ये सेंड केलेल्या मेसेजमध्येही हवा तसा बदल करता येणे शक्य होणार आहे.

व्हॉट्सअपमध्ये सेंड केलेला मेसेज तो मेसेज सेंड केल्याच्या वेळेपासून पुढील १५ मिनिटांपर्यंत एडिट करता येणार आहे. त्यानंतर मात्र त्या मेसेजमध्ये कुठलाही बदल करता येणार नाही.

व्हॉट्सअप हे मेटा कंपनीच्या मालकीचे ऍप असून मेटा कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर एक फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. त्या फोटोमध्ये व्हॉट्सअपमध्ये सेंड झालेल्या एका मेसेजमध्ये एडिटिंग होत असल्याचे दिसत आहे. कोणताही मेसेज सेंड झाल्यावर १५ मिनिटांपर्यंत एडिड केला जाऊ शकतो, असे झुकेरबर्ग यांनी त्या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

मेसेज एडिट करण्यासाठी काय कराल?

  • बेटा व्हर्जनमधील हे फिचर नियमित व्हॉट्सअपमध्ये उपलब्ध झाल्यानंतर व्हॉट्सअपचे लेटेस्ट अपडेट करावे लागेल.
  • सेंड झालेल्या मेसेजवर टॅप करून होल्ड म्हणजे लाँग प्रेस करून ठेवावे. त्यानंतर स्क्रीनवर एडिटचा पर्याय येईल.
  • एडिटचा पर्याय आल्यानंतर त्या मेसेजमध्ये हवा तो बदल करता येईल आणि हा बदल करून झाल्यावर पुन्हा सेंडवर टॅप करताच ओरिजनल मेसेजच्या जागी एडिटेड मेसेज सेंड होईल.

व्हॉट्सअपने नुकतेच पर्सनल चॅट लॉक हे फिचर आणले आहे. या फिचरमुळे यूजर्सना त्यांचे पर्सनल चॅट लॉक करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. या फिचरनंतर आता सेंड केलेला मेसेज एडिट करण्याची सुविधा देणारे हे नवीन फिचर आणण्यात आले आहे.  आतापर्यंत एखादा चुकीचा मेसेज पाठवला गेल्यास तो पूर्ण मेसेज डिलिट करावा लागत असे. आता मात्र तो पूर्ण मेसेज डिलिट न करता त्यात हवा तसा बदल करून तो पुन्हा सेंड करता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!