जाता जाता पाऊस झोडपणार! पुढचे चार दिवस तुमच्या जिल्ह्यात कसा असेल पाऊस? २१ जिल्ह्यांत मेघगर्जनेसह ‘मुसळधार’ इशारा!


मुंबईः मान्सूनचा अखेरचा आठवडा सुरू झालेला असतानाच राज्याच्या बहुतांश भागात जोरदार पाऊस होत आहे.  आज विदर्भातील नागपूरला ढगफुटीसदृश्य पावसाने झोडपून काढले असतानाच नाशिक, अहमदनगर, बीड, नांदेड, पुणे, मुंबई आणि सातारा जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला आहे. भारतीय हवामान विभागाच्या कुलाबा वेधशाळेने पुढील चार दिवसांसाठी पावसाचा अंदाज जाहीर केला असून राज्यातील १७ जिल्ह्यात पुढील चार दिवस वादळीवारे, ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

मान्सूनचा हा अखेरचा आठवडा असल्यामुळे या पाच दिवसात होणाऱ्या पावसावरच शेतकऱ्यांची खरिप हंगामी गणिते आणि रब्बी हंगामाची परिस्थिती अवलंबून असल्यामुळे या पाच दिवसांतील पाऊसपाणी महत्वाचे ठरणार आहे. हवामान विभागाने २३ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर या पाच दिवसांसाठीचा  अंदाज व्यक्त केला आहे. शेवटच्या आठवड्यात विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

शनिवार, २३ सप्टेंबर

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड,धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांत वीजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर नागपूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

रविवार, २४ सप्टेंबर

ठाणे, रायगड, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. या दिवशी वीजांचा कडकडाट आणि जोरदार मेघगर्जनेची शक्यता आहे.

लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, नंदूरबार, धुळे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई आणि पालघरमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

सोमवार, २५ सप्टेंबर

ठाणे, रायगड, रत्नागिरी, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), जालना, बीड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, पुणे, अहमदनगर, जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटर असण्याची शक्यता आहे.

पालघर, मुंबई, सिंधुदुर्ग, धुळे, नंदूरबार, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

मंगळवार, २६ सप्टेंबर

मंगळवारी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), जालना, बीड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात मेघगर्जना आणि वीजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मंगळवारी वाशिम, बुलढाणा, अमरावती, अकोला, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, नंदूरबार, धुळे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

बुधवार, २७ सप्टेंबर

बुधवारी राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. यवतमाळ, वाशिम, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, बुलढाणा, भंडारा, अमरावती, अकोला, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, बीड, परभणी, सोलापूर, पुणे, अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *