२०२४ मध्ये किती सुट्ट्या मिळणार? वर्ष संपण्याच्या दीडमहिना आधीच पुढील वर्षीच्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर, वाचा संपूर्ण यादी


मुंबईः पुढच्या वर्षी किती आणि कधी सार्वजनिक सुट्ट्या मिळणार, याची उत्सुकता सरकारी कर्मचारी, शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी, बँक कर्मचारी अशा सर्वांनाच लागलेली असते. २०२३ हे चालू वर्ष संपण्याआधीच राज्य सरकारने २०२४ या नवीन वर्षातील सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या २०२४ च्या सार्वजनिक सुट्ट्यांच्या यादीनुसार पुढील वर्षीच्या सरकारी कर्मचाऱ्यांना २४ सार्वजनिक सुट्ट्या मिळणार आहेत. यात स्थानिक सुट्ट्यांचा समावेश नाही. पुढील वर्षीच्या दोन सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी रविवार आहे.

 पुढील वर्षीच्या सार्वजनिक सुट्ट्या अशा

  • शुक्रवार, २६ जानेवारी- प्रजासत्ताक दिन
  • सोमवार, १९ फेब्रुवारी- छत्रपती शिवाजी महाराज जयंती
  • शुक्रवार, ८ मार्च- महाशिवरात्री
  • सोमवार, २५ मार्च- होळी (दुसरा दिवस)
  • शुक्रवार, २९ मार्च- गुड फ्रायडे
  • मंगळवार, ९ एप्रिल- गुढीपाडवा
  • गुरूवार,११ एप्रिल- रमझान ईद
  • रविवार, १४ एप्रिल- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
  • बुधवार,१७ एप्रिल- रामनवमी
  • रविवार, २१ एप्रिल- महावीर जयंती
  • बुधवार, १ मे- महाराष्ट्र दिन
  • गुरूवार, २३ मे- बुद्ध पोर्णिमा
  • सोमवार, १७ जून- बकरी ईद (ईद-उल-झुआ)
  • बुधवार, १७ जुलै- मोहर्रम
  • गुरूवार, १५ ऑगस्ट- स्वातंत्र्य दिन
  • गुरूवार, १५ ऑगस्ट- पारशी नववर्ष दिन (शहेनशाही)
  • शनिवार, ७ सप्टेंबर- गणेश चतुर्थी
  • सोमवार,१६ सप्टेंबर- ईद-ए-मिलाद
  • बुधवार, २ ऑक्टोबर- म. गांधी जयंती
  • शनिवार, १२ ऑक्टोबर- दसरा
  • शुक्रवार, १ नोव्हेंबर- दिवाळी आमावस्या (लक्ष्मीपूजन)
  • शनिवार, २ नोव्हेंबर- दिवाळी (बलिप्रतिपदा)
  • शुक्रवार, १५ नोव्हेंबर- गुरूनानक जयंती
  • बुधवार, २५ डिसेंबर- ख्रिसमस
संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!