UPSC-2023चा निकाल जाहीर, महाराष्ट्रातील ८७ उमेदवारांचा यशाचा झेंडा; वाचा राज्यातील यशवंतांची नावे  आणि त्यांची रँक!

नवी दिल्‍ली: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा-२०२३ चा अंतिम निकाल जाहीर झाला असून आदित्य श्रीवास्तव देशात पहिला तर अनिमेश प्रधान  देशात दुसरा आला आहे. डोनुरू अनन्या रेड्डी तिसऱ्या क्रमांकावर आहे.

या परीक्षेत देशातील एकूण १ हजार १६ उमेदवार यशस्वी झाले आहेत. यापैकी महाराष्ट्रातील ८७ हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. एकूण निवड झालेल्या उमेदवारांपैकी जवळपास ८.६ टक्के उमेदवार हे महाराष्ट्रातून आहेत. राज्यातून समीर प्रकाश खोडे  पहिला आला असून देशात त्यांनी ४२ वा क्रमांक पटकावला आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२३ चा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर झाला. या निकालात  पहिल्या १०० उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील तीन उमेदवारांचा समावेश आहे. या परीक्षेच्या गुणवत्ता यादीत नेहा राजपूत हिने ५१ वा तर अनिकेत हिरडे याने  ८१ वा क्रमांक पटकावला आहे.

महाराष्ट्रातील यशस्वी उमेदवार आणि त्यांची रँक

समीर प्रकाश खोडे (४२) नेहा उद्धवसिंग राजपूत (५१) अनिकेत ज्ञानेश्वर हिर्डे (८१) विनय सुनील पाटील (१२२) विवेक विश्वनाथ सोनवणे (१२६) तेजस सुदीप सारडा (१२८) जान्हवी बाळासाहेब शेखर (१४५) आशिष अशोक पाटील (१४७) अर्चित पराग डोंगरे (१५३) तन्मयी सुहास देसाई (१९०) ऋषिकेश विजय ठाकरे (२२४) अभिषेक प्रमोद टाले (२४९) समर्थ अविनाश शिंदे (२५५) मनीषा धारवे (२५७).

शामल कल्याणराव भगत (२५८) आशिष विद्याधर उन्हाळे (२६७) शारदा गजानन मद्येश्वर (२८५) निरंजन महेंद्रसिंह जाधवराव (२८७) समिक्षा म्हेत्रे (३०२) हर्षल भगवान घोगरे (३०८) वृषाली संतराम कांबळे (३१०) शुभम भगवान थिटे (३५९) अंकेत केशवराव जाधव (३९५) शुभम शरद बेहेरे (३९७) मंगेश पाराजी खिलारी (४१४) मयूर भारतसिंग गिरासे (४२२) अदिती संजय चौगुले (४३३) अनिकेत लक्ष्मीकांत कुलकर्णी (४३७) क्षितिज गुरभेले (४४१).

अभिषेक डांगे (४५२) स्वाती मोहन राठोड (४९२) लोकेश मनोहर पाटील (४९६) सागर संजय भामरे (५२३) मानसी नानाभाऊ साकोरे (५३१) नेहा नंदकुमार पाटील (५३३) युगल कापसे (५३५) हर्षल राजेश महाजन (५३९) अपूर्व अमृत बालपांडे (५४६) शुभम सुरेश पवार (५६०) विक्रम जोशी (५९३)  प्रियंका मोहिते (५९५) अविष्कार डेरले (६०४) केतन अशोक इंगोले (६१०) राजश्री शांताराम देशमुख (६२२) संस्कार निलाक्ष गुप्ता (६२९) सुमित तावरे (६५५).

सुरेश लीलाधरराव बोरकर (६५८) अभिषेक अभय ओझर्डे (६६९) नम्रता घोरपडे (६७५) जिज्ञासा सहारे (६८१) श्रृति कोकाटे (६८५)  अजय डोके(६८७) सूरज प्रभाकर निकम (७०६) श्वेता गाडे (७११) अभिजित पखारे (७२०) कृणाल अहिरराव (७३२) हिमांशु टेभेंकर (७३८) सुमितकुमार धोत्रे (७५०) गौरी देवरे (७५९) प्रांजली खांडेकर (७६१) प्रितेश बाविस्कर (७६७) प्रशांत डांगळे (७७५) प्रतिक मंत्री (७८६) मयुरी माधवराव महल्ले (७९४) राहुल पाटील (८०४).

 सिध्दार्थ तागड (८०९) प्राजंली नवले (८१५) सिध्दार्थ बारवळ (८२३) ओमकार साबळे (८४४) प्रशांत सुरेश भोजने (८४९) प्रतिक बनसोडे (८६२) चिन्मय बनसोड (८९३) निखील चव्हाण (९००) विश्वजीत होळकर (९०५) अक्षय लांबे (९०८) निलेश डाके (९१८) किशनकुमार जाधव (९२३) ऐश्वर्या दादाराव उके (९४३) स्नेहल वाघमारे (९४५) शुभम त्रंबकराव डोंगरदिवे (९६३) गौरव हितेश टेंभुर्णीकर (९६६) मयांक खरे (९६८) शिवानी वासेकर (९७१) श्रावण अमरसिंह देशमुख (९७६) श्रुती उत्तम श्रोते (९८१) सुशीलकुमार सुनील शिंदे (९८९) आदित्य अनिल बामणे (१०१५).

केंद्र सरकारच्या विविध सेवांमधील रिक्त जागांसाठी सप्टेंबर २०२३ मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली. जानेवारी-एप्रिल २०२४ दरम्यान परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या परिक्षेच्या निकालातील उत्तीर्ण १ हजार १६ उमेदवारांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध सेवेतील पदांच्या नियुक्तीसाठी शिफारस केली आहे.

यामध्ये खुल्या प्रवर्गातून ३४७, आर्थिक मागास प्रवर्गातून  (ईडब्ल्यूएस) ११५, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून (ओबीसी) ३०३, अनुसूचित जाती प्रवर्गातून (एससी) १६५, अनुसूचित जमाती प्रवर्गातून ८६  उमेदवारांचा समावेश आहे. एकूण यशस्वी उमेदवारांमध्ये ३७  दिव्यांग उमेदवारांचा (१६ ऑर्थोपेडिकली अपंग, ०६ दृष्टिहीन, ०५ श्रवणदोष आणि १० एकाधिक अपंग) यांचा समावेश आहे.

लोकसेवा आयोगाने २४० उमेदवारांची आरक्षित सूची (Reserve List)  तयार केली आहे. यामध्ये  खुला प्रवर्ग १२०, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) ३६,  इतर मागास वर्ग ६६, अनुसूचित जाती १०, अनुसूचित जमाती ४उमेदवारांचा समावेश आहे. यासोबत एकूण चार दिव्यांग उमेदवारांचा समावेश आहे.

या रिक्त पदांवर उमेदवार होतील रूजू

भारतीय प्रशासन सेवा (आयएएस) या सेवेत एकूण १८० जागा रिक्त आहेत. यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी ७३, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) १७ इतर मागास वर्ग (ओबीसी) ४९, अनुसूचित जाती (एससी) २७, अनुसूचित जमाती (एसटी) १४  जागा रिक्त आहेत. उमेदवारांच्या गुणानुक्रमे रिक्त जागांवर यशस्वी उमेदवारांची निवड केली जाईल.

भारतीय विदेश सेवा (आयएफएस) या सेवेत एकूण ३७ जागा रिक्त आहेत. यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी १६, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) ४,  इतर मागास वर्ग (ओबीसी) १०, अनुसूचित जाती (एससी) ५, अनुसूचित जमातीसाठी (एसटी) २ जागा रिक्त आहेत.

भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) या सेवेमध्ये एकूण २००जागा रिक्त आहेत. यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी ८०,  आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) २०,  इतर मागास प्रवर्गातून ५५, अनुसूचित जाती प्रवर्गातून ३२, तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून १३  उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे.

केंद्रीय सेवा गट-अ या सेवेमध्ये एकूण ६१३ जागा रिक्त आहेत. यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी २५८, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) ६४ , इतर मागास प्रवर्गातून १६०, अनुसूचित जाती प्रवर्गातून ८६ तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून ४५ उमेदवारांना नियुक्ती देण्यात येईल.

केंद्रीय सेवा गट-ब सेवेमध्ये एकूण ११३  जागा रिक्त आहेत. यामध्ये  खुल्या प्रवर्गासाठी ४७, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस)  १०, इतर मागास प्रवर्गातून २९, अनुसूचित जाती प्रवर्गातून १५ तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून १२ उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल.

एकूण ३५५ उमेदवारांची निवड तात्पुरत्या स्वरुपाची असेल. अधिकृत निकाल व यशस्वी उमदेवारांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या www.upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!