आता फुकटात करा आधार कार्ड ऑनलाइन अपडेट, ‘एवढे’ महिने लागणार नाही कोणतेही शुल्क!


नवी दिल्लीः ऑनलाइन आधार कार्ड अपडेट करू इच्छिणाऱ्या यूजर्सना आता फुकटात हे अपडेट करता येणार आहे. पुढील तीन महिन्यांपर्यंत आधार कार्ड ऑनलाइन अपडेट करण्यासाठी कोणतेही शुल्क लागणार नाही.

 आधार कार्ड जारी करण्यात येऊन जवळपास १० वर्षे झाली आहेत. या कालावधीत अनेक लोकांचे पत्ते, नाव बदलले आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव यूआयडीएआयकडून सर्व आधार कार्डधारकांना त्यांचे आधार कार्ड अपडेट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.  आधार कार्डचे अपडेट वेगाने व्हावे म्हणून ऑनलाइन आधार कार्ड अपडेटसाठी आकारले जाणारे ५० शुल्क तात्पुरते थांबवण्यात आले आहे.

२०२४ मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आपले आधार कार्ड ऑनलाइन अपडेट करू इच्छिणाऱ्या यूजर्ससाठी ही मोठी सवलत देण्यात आली आहे. आधी ऑनलाइन आधार कार्ड अपडेट करण्यासाठी ५० रुपये शुल्क आकारले जात होते.

आता १५ मार्च २०२३ पासून १४ जून २०२३ पर्यंत आधार कार्ड ऑनलाइन अपडेट करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. म्हणजेच १४ जूनपर्यंत आधार कार्डचे ऑनलाइन अपडेट फुकटात होणार आहे.

असे करा तुमचे आधार कार्ड स्वतःच ऑनलाइन अपडेट

  • सर्वप्रथम myAadhar Portal वर जा. येथे Update Your Address Online वर क्लिक करा.
  • यानंतर Proceed to Update Address वर क्लिक करा.
  • एक नवीन विंडो ओपन होईल. या विंडोमध्ये देण्यात आलेल्या ऑप्शनमध्ये तुमचा १२ डिजिटचा आधार नंबर टाका आणि Send OTP वर क्लिक करा.
  • तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी येईल. तो ओटीपी टाकून व्हेरिफाय करा.
  • यानंतर बदलेल्या पत्त्याचा पुरावा (Address Proof) अपलोड करा आणि सबमिट बटन क्लिक करा.
  • तुमचे आधार कार्ड अपडेटची प्रक्रिया सुरू होईल आणि १४ डिजिटचा URN नंबर जनरेट होईल. या URN नंबरच्या मदतीने तुमचे आधार कार्ड अपडेट झाले की नाही, याचे स्टेटस पहाता येईल. जेव्हा आधार कार्ड अपडेट होईल, तेव्हा डाऊनलोड करून घ्या.
संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!