समृद्धी महामार्गावरील ‘वाहतूक बंदी’ स्थगित, अतिउच्चदाब वाहिनीच्या कामास स्थगितीमुळे जालना-संभाजीनगरदरम्यानची वाहतूक पूर्ववत


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर करावयाचे नियोजित पॉवर ग्रिड ट्रान्समीशन अतिउच्चदाब वाहिनीच्या टॉवरचे काम स्थगित करण्यात आले असून या कामासाठी करण्यात येणारा वाहतूक मार्गातील बदलही स्थगित करण्यात आला असून या महामार्गावर जालना ते छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दरम्यान वाहतूक पूर्ववत सुरु राहील, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता व प्रकल्प संचालक रामदास खलसे यांनी कळवले आहे.

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रिड ट्रान्समीशन अतिउच्चदाब वाहिनी टॉवरचे काम करण्याचे नियोजन होते. तथापि, अपरिहार्य कारणांमुळे हे काम तूर्त स्थगित झाले आहे.

दोन टप्प्यात होणाऱ्या या कामासाठी जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानची वाहतूक वळवण्यात आली होती.  या कामाचा पहिला टप्पा १० ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर  आणि दुसरा टप्पा २५ ऑक्टोबर  ते २६ ऑक्टोबर या कालावधीत होणार होता. त्यासाठी जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान वाहतूक वळवण्याचे नियोजन करण्यात आले होते. तथापि हे काम स्थगित झाल्याने वाहतूक पूर्ववत सुरु राहील, असे कळवण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!