गुलजार….कवितेची बाग…!
- डॉ.संजय शिंदे, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)
उर्दू भाषेत 'गुलजार' या शब्दाचा अर्थ होतो बगीचा, तोही फुलांनी बहरलेला! हिंदी चित्रपटसृष्टीतील गुलजार हे एक प्रकारे कवितेच्या बागेत बहरलेलं व्यक्तिमत्व. तरल मनाच्या आणि अत्यंत संवेदनशील अशा या कवीला भारतीय साहित्यातील सर्वोत्तम पुरस्कार 'ज्ञानपीठ' घोषित करण्यात आला आहे . या कवीने ऑगस्टमध्ये वयाची ८७ वर्षे पूर्ण केली आहेत. या वयात व्यक्ती येते तेव्हा त्याने एक हजाराहून अधिक पोर्णिमा पाहिलेल्या असतात, असे म्हटले जाते. गुलजार यांनी मात्र अमावस्याही पाहिलेल्या. म्हणूनच तर 'चौदहवी चांद को, फिर आग लगी है देखो..राख हो जायेगा जब, फिरसे अमावस होगी' असं ते बोलून जातात. गुलजार यांच्या कविता, गजल, उर्दू शायरी ही रसिंकासाठी एक गुलजार अर्थात कवितेची बागचं असते.
गुलजार यांना हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या दमदार लिखाणासाठी ओळखले जाते. तर, उर्दूतील उत्क...