आणखी किती अक्षय भालेरावचे बलिदान?


बोंढार येथे आंबेडकर जयंतीच्या विरोधात गावकऱ्यांनी ठराव  घेतला. तो राष्ट्रपतींचा कायदा समजून पोलिसांनी दलितांना ‘आंबेडकर जयंतीची मिरवणूक डीजे लाऊन वाजत गाजत काढायची नाही’ अशी तंबी दिली. यामुळे जातीयवाद्यांचे बळ वाढले. तरीही अक्षय श्रावण भालेराव याने पुढाकार घेऊन २९ एप्रिल २०२३ रोजी बोंढार गावात भव्य प्रमाणात आंबेडकर जयंती साजरी केली. यामुळे सनातनी जातीयवादी लोक हादरुन गेले. त्यांचा जळफळाट झाला. त्यामुळे ते आता आणखी एकवटले होते. अक्षयचा काटा कसा काढायचा याची खलबते चालू झाली होती.  अखेर ती काळी वेळ आली आणि जातीयवादी गावगुंडांनी अक्षय भालेरावचा निर्घृणपणे खून केला… असे आणखी किती अक्षय आपण शहीद होऊ देणार आहोत?

इंजि.चंद्रप्रकाश देगलूरकर

कट्टर आंबेडकरी विचारधारेचा अनुयायी असलेल्या अक्षय श्रावण भालेराव या युवकाचा बोंढार हवेली (तालुका, जिल्हा नांदेड) येथील कट्टर सनातनी जातीयवादी लोकांनी अत्यंत क्रूर मारहाण करुन बळी घेतला आहे. या क्रूर घटनेचा करावा तितका निषेध कमीच ठरणार आहे. शिंदे सरकारच्या काळात जातीयवादी विषारी सापांनी आपले डोके वर काढले आहे, असेच या निंदनीय घटनेनंतर म्हणावे लागेल.

नांदेड जिल्ह्यातील बोंढार या गावात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती अक्षय भालेराव हा युवक पुढाकार घेऊन उत्साहात साजरी करु लागला. गावातील काही जातीयवादी मराठ्यांना हे सहन न झाल्याने त्यांनी कांगावा सुरु केला. जयंती साजरी करु नका असे डायरेक्ट म्हणता येत नसल्याने डीजे वाजवू नका, गावकऱ्यांना त्रास होतो.  डीजे लाऊन आम्ही जयंती साजरी करु देणार नाही, असा ठरावच या गावगुंडांनी घेतला व तो पोलिस प्रशासनाला पाठवला.

बोंढार येथे हागल्या मुतल्या कारणाला विनापरवाना डीजे लाऊन धांगडधिंगा घातला जातो, तेव्हा गावातील कुणालाही त्रास होत नाही. झाला तरी कुणी त्याबद्दल ब्र काढत नाहीत. लग्नाच्या वरातीत तर चार-पाच तास डीजेचा थयथयाट चालू असतो. रस्ते आडवून मुद्दाम कुणालाही मिरवणुकीतून जाऊ दिले जात नाही. जो कुणी आपल्या कामाला पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, त्याची आडवणूक करण्यात येते. त्यास अश्लील शिविगाळ आणि मारहाण करण्यात येते. या प्रकाराची नोंद जातीयवादी गावकरी घेत नाहीत. हे बंद झाले पाहिजे म्हणून ठराव घेत नाहीत.

बोंढार येथे हागल्या मुतल्या कारणाला विनापरवाना डीजे लाऊन धांगडधिंगा घातला जातो, तेव्हा गावातील कुणालाही त्रास होत नाही. झाला तरी कुणी त्याबद्दल ब्र काढत नाहीत. लग्नाच्या वरातीत तर चार-पाच तास डीजेचा थयथयाट चालू असतो. रस्ते आडवून मुद्दाम कुणालाही मिरवणुकीतून जाऊ दिले जात नाही. जो कुणी आपल्या कामाला पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, त्याची आडवणूक करण्यात येते. त्यास अश्लील शिविगाळ आणि मारहाण करण्यात येते. या प्रकाराची नोंद जातीयवादी गावकरी घेत नाहीत. हे बंद झाले पाहिजे म्हणून ठराव घेत नाहीत. विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मिरवणुकीतील डीजे मात्र जातीयवादी भावनेतून त्रासदायक वाटतो.

विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मिरवणुकीतील डीजे मात्र जातीयवादी भावनेतून त्रासदायक वाटतो. याच्या विरोधात सर्व जातींचे जातीयवादी द्वेषबंधू एक होतात. तसा ठराव संमत करतात आणि तो पोलिस प्रशासनास पाठवतात. जिल्हा प्रशासनास पाठवतात. पुढाऱ्यांना पाठवतात. हे पाहून सारे जातीयवादी आतून सुखावतात. या आधारे मग दलितांना तंबी दिली जाते की, खबरदार डीजे लाऊन डॉ. आंबेडकांची मिरवणूक काढायची नाही. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत आंबेडकर जयंतीची मिरवणूकच काढायची नाही, असा हा फतवा होता. किती हा आसुरी आनंद?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत परिश्रमातून भारताला सर्वश्रेष्ठ संविधान दिले. या संविधानाच्या आधारे संपूर्ण देशाचा कारभार चालतो आणि म्हणे या संविधान निर्मात्याच्या जयंतीचा गावकऱ्यांना त्रास होतो. गावात आठ पंधरा दिवस सप्ते चालतात, कथा चालतात, किर्तन सोहळे चालतात. महिना दीडमहिना गावात लाऊडस्पिकर वाजतात. त्याचा कुणालाही त्रास होत नाही. त्याच्या विरोधात कुणीही ठराव घेत नाहीत. गावात रविदास जयंती, आंबेडकर जयंती, अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करणे म्हणजे सनातनी जातीयवादी लोकांना देशद्रोही कृत्य वाटते की काय?

याला कारणीभूत येथील सनातन जात व्यवस्था आहे. वेद पुराण आहेत. ‘इथे वेद सांगून भेद केला आणि माणसा-माणसांचा उभा छेद केला !’ अशी ही विषवल्ली आहे. बहुजन समाजातील महामानवांची जातनिहाय वाटणी ब्राम्हणांनी करुन टाकली. गोरा कुंभार, सेना नाव्ही, नरहरी सोनार, सावता माळी, चोखा महार, रविदास चांभार, अण्णाभाऊ मांग आणि बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे पुढारी! हे महामानव कितीही मोठे असले तरी यांचा उल्लेख त्यांच्या जाती शोधून त्याप्रमाणे करण्यात येतो. त्यामुळे गावामध्ये रविदास म्हणजे चांभार ही हिनतेची भावना रुजली आहे.  त्यामुळे एखाद्या चांभाराची, एखाद्या मांगाची, एखाद्या महाराची ही जयंती आहे, याच हिन भावनेतून यांच्या जयंतीकडे पाहण्यात येते.

गावात आठ पंधरा दिवस सप्ते चालतात, कथा चालतात, किर्तन सोहळे चालतात. महिना दीडमहिना गावात लाऊडस्पिकर वाजतात. त्याचा कुणालाही त्रास होत नाही. त्याच्या विरोधात कुणीही ठराव घेत नाहीत. गावात रविदास जयंती, आंबेडकर जयंती, अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करणे म्हणजे सनातनी जातीयवादी लोकांना देशद्रोही कृत्य वाटते की काय?

याउलट ‘महात्मा’ गांधी, ‘पंडित’ जवाहरलाल नेहरु, ज्ञानेश्वर ‘माऊली’, ‘स्वातंत्र्यवीर’ सावरकर, ‘महर्षी’ दयानंद, ‘स्वामी’ विवेकानंद, ‘लोकमान्य’ टिळक यांचा असा सन्माननीय उल्लेख करण्यात येतो. हे झाले देशाचे राष्ट्रीय नेते. यांच्या आदरणीय उल्लेखांमुळे हे महान वाटतात. याचा गावकऱ्यांना अभिमान वाटतो. त्यांच्या जयंत्यांना कुणीही विरोध करीत नाही. कारण त्यांची जातीय विभागणी झालीच नाही. आता तर गोळवळकर गुरुजी, श्यामाप्रसाद मुखर्जी, हेडगेवार, दिनदयाल उपाध्याय हे भारताचे महान राष्ट्रीय नेते होते अशी पेरणी सुरु झाली आहे. त्यासाठी अभ्यासक्रम बदलले जात आहेत. त्यांच्या जयंतीला कुणीही विरोध करणार नाही.

शिवाजी महाराज हे तर यांच्या जातीचेच. तसे तर शिवाजी महाराजांचा सर्वच जातींना अभिमान वाटतो. पण यांना ते आपल्याच जातीचे वाटतात. मग गावात फक्त एकच जयंती साजरी व्हावी असे यांना वाटते. मग डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि ती देखील वाजत गाजत निघाली तर ती यांना कशी सहन होणार? अश्यावेळी यांच्या जातीय भावना उफाळून आल्या तर दंगल होणारच ना? बाबासाहेबांची जयंती साजरी करणे हे अतिरेकी कृत्य आहे काय?

नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील वाळकी या गावात मातंग जातीच्या लोकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली तर गावातील काही लोकांना आश्चर्य वाटले. यामुळे काही जातीयवाद्यांना मळमळ झाली. अरे, तुम्ही मातंग आहात आणि एका महाराची जयंती कशी काय साजरी करता? असा जाहीर उल्लेख झाला. यातून वाद वाढला.

मातंग समाजावर हल्ला झाला. अनेक समाज बांधव गंभीर जखमी झाले. त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. अट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाले. त्याविरोधात क्रॉस कम्प्लेन्ट घेऊन पोलिसांनी मातंग समाजाच्या विरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल केला. अट्रॉसिटीची आता तत्काळ जमानत होऊ लागली आणि दरोड्याची जमानतच होणार नाही. म्हणजे दलितांना मार खाऊन जेलमध्ये सडत रहावे लागणार आणि अन्याय करणारे सवर्ण मोकळे फिरणार ? असा हा लोकशाहीचा दुरुपयोग पोलीस प्रशासनाकडून होत असेल तर दलितांना न्याय कधी आणि कसा मिळणार? जातीयवादाला आळा कसा बसणार?

बोंढार येथेही तेच झाले. आंबेडकर जयंतीच्या विरोधात गावकऱ्यांनी ठराव  घेतला. तो राष्ट्रपतींचा कायदा समजून पोलिसांनी दलितांना ‘आंबेडकर जयंतीची मिरवणूक डीजे लाऊन वाजत गाजत काढायची नाही’ अशी तंबी दिली. यामुळे जातीयवाद्यांचे बळ वाढले. तरीही अक्षय श्रावण भालेराव याने पुढाकार घेऊन २९ एप्रिल २०२३ रोजी बोंढार गावात भव्य प्रमाणात आंबेडकर जयंती साजरी केली. यामुळे सनातनी जातीयवादी लोक हादरुन गेले. त्यांचा जळफळाट झाला. त्यामुळे ते आता आणखी एकवटले होते. अक्षयचा काटा कसा काढायचा याची खलबते चालू झाली होती. अखेर ती काळी वेळ आली.

गुरुवार, १ जून २०२३ रोजी अक्षय भालेराव गावातील मराठा लग्नाच्या एका अनधिकृत डीजे मिरवणुकीजवळून किराणा दुकानाकडे जात असतांना काही जातीयवादी मराठ्यांनी अक्षय भालेरावची चाकू खुपसून क्रूर हत्या केली.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर या नावासाठी खूप जणांचे बळी गेले. त्यात नांदेडचे गौतम वाघमारे यांचे बलिदान कुणीही विसरु शकत नाही. त्यात आणखी एक कट्टर आंबेडकरी युवक अक्षय भालेराव हा शहीद झाला. जातीयवादी झुंडीने पाठलाग करुन चाकूचे वार करुन त्याचा कोथळा बाहेर काढला. त्याच्या पोटातील आतडे जमिनीवर लोळेपर्यंत मारहाण करण्यात येत होती. यावरुन हेच दिसून येते की सनातनी व्यवस्थेने बुद्ध, रविदास, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विरोधात बहुजन समाजात किती जहरी विष पेरुन ठेवले आहे? रुग्णालयात नेत असताना वाटेतच अक्षयचा मृत्यू झाला.

शिवाजी महाराज हे तर यांच्या जातीचेच. तसे तर शिवाजी महाराजांचा सर्वच जातींना अभिमान वाटतो. पण यांना ते आपल्याच जातीचे वाटतात. मग गावात फक्त एकच जयंती साजरी व्हावी असे यांना वाटते. मग डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि ती देखील वाजत गाजत निघाली तर ती यांना कशी सहन होणार? अश्यावेळी यांच्या जातीय भावना उफाळून आल्या तर दंगल होणारच ना? बाबासाहेबांची जयंती साजरी करणे हे अतिरेकी कृत्य आहे काय?

ग्रामीण पोलीस स्टेशन, सिडको, नांदेड येथे फक्त नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. सहा जणांना अटक झाली. बाकीचे फरार झाले. मारणारे असंख्य असतील पण त्यांची नावे कोण घेणार? बरेच जण म्हणतात मी तेथे नव्हतोच. मी इकडे गेलो होतो, मी तिकडे गेलो होतो! आता निमित्ताला काही आरोपींना अटक होईल आणि त्यांच्या विरोधात साक्ष कुणी देणार नाहीत. म्हणून आपलेच काही साक्षीदार भालेराव कुटुंबाला द्यावे लागतील. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. पोलीस दोषी असतील तर त्यांचीही चौकशी होऊन कडक कारवाई झाली पाहिजे.

बोंढारच्या मस्तवाल जातीयवादी गावगुंडांचा फक्त निषेध करुन भागणार नाही तर सर्व राजकीय पक्षांनी, सर्व सामाजिक संघटना तसेच आंबेडकर अनुयायांनी एकत्र येऊन लोकशाही मार्गाने यांना धडा शिकवला पाहिजे. या जातीयवाद्यांना पाठीशी घालणाऱ्या सनातनी पुढाऱ्यांनाही त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे. हल्लेखोरांना जास्तीत जास्त कडक शिक्षा झाली पाहिजे म्हणून आंबेडकरी विचारांच्या सर्व वकील मंडळींनी एकत्र येऊन अक्षयला विनामूल्य न्याय मिळवून दिला पाहिजे, असे वाटते.

देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. कोणत्याही सत्ताधाऱ्यांनी जातीयता संपवण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. मतांसाठी जाती धर्माना गोंजारण्यात येते. निवडणुकीत धर्माचे स्तोम माजवण्यात येते. देशात जातीयवादी शासनव्यवस्था निर्माण होऊ नये यासाठी देखील बहुजन समाजाची प्रबळ एकजूट ही काळाची गरज ठरणार आहे!

(लेखक नांदेड येथील जेष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि गुरू रविदास समता परिषदेचे संस्थापक आहेत. लेखकाचा संपर्कः 9423781114)


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!