ऑस्कर पुरस्कार २०२४: ‘ओपन हायमर’चा डंका, सिलियन मर्फी सर्वोत्कृष्ट अभिनेता; एमा स्टोनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

लॉस एंजेलिसः जगभरातील चित्रपटप्रेमी आतुरतेने वाट पहात असलेला ऑस्कर २०२४ सोहळा दिमाखात पार पडला असून ऑस्कर पुरस्कार विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. ९६ व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात ओपनहायमरने डंका गाजवला असून या चित्रपटाला सात ऑस्कर जाहीर झाले आहेत. सिलियन मर्फी हा सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला तर एमा स्टोनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर जाहीर झाला आहे.

ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित ओपनहायमर हा सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला आहे. या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पुरस्काराबरोबरच सात ऑस्कर जिंकले आहेत. ख्रिस्तोफर नोलनला याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा प्रतिष्ठीत ऑस्कर मिळाला आहे. याच चित्रपटातील अभिनयासाठी सिलियन मर्फीने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकला आहे. ओपन हायमरने सर्वोत्कृष्ट ओरिजन स्कोअरचाही पुरस्कार जिंकला आहे. याच चित्रपाटने सर्वोत्कृष्ट सिनेमाटोग्राफी, सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंगचाही पुरस्कार जिंकला.

रॉबर्ट डाऊन ज्युनिअरला ओपनहायमर या चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. हा त्याचा पहिलाच ऑस्कर आहे. तर  द होल्डओव्हर या चित्रपटातील भूमिकेसाठी वाइन जॉय रॅँडॉल्फला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा ऑस्कर जाहीर झाला आहे. हा पुरस्कार स्वीकारताना त कमालीची भावूक झाली होती.

पूअर थिंग्ज या चित्रपटातील भूमिकेसाठी ३५ वर्षीय अभिनेत्री एमा स्टोनने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला. सर्वोत्कृष्ट केशभूषा आणि मेकअपसाठीचा ऑस्करही पुअर थिंग्जने जिंकला. बार्बी या चित्रपटाली व्हॉट वॉज आय मेड फॉर? या गाण्यासाठी बिली इलिशने सर्वोत्कृष्ट ओरिजन गाण्याचा पुरस्कार जिंकला. द झोन ऑफ इंटरेस्ट या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट साऊंडचा पुरस्कार मिळाला आहे.

द वंडरफुल स्टोरी ऑफ हेन्री शुगर या चित्रपटाने सर्वोत्कृष्टाइव्ह ऍक्शन शॉर्ट फिल्मसाठीच्या प्रतिष्ठीत ऑस्करवर आपले नाव कोरले आहे. २० डेज इन मायिरायुपोल या चित्रपटाने या वर्षाचा सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फिचर फिल्मचा पुरस्कार जिंकला आहे.

 द लास्ट रिपेअर शॉप या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्मचा पुरस्कार जिंकला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन बेन प्राऊडफूट आणि क्रिस बॉवर्स यांनी केले आहे. गॉडझिला मायनस वन या चित्रपटाला यंदाचा सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्ससाठीचा ऑस्कर मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाइनसाठी पुअर थिंग्ज या चित्रपटाची डिझाइनर होली वॉडिंग्टनला पुरस्कार देण्यात आला आहे.

 कॉर्ड जेफरसन लिखित अमेरिकन फिक्शनने सर्वोत्कृष्ट अडॅप्टेड स्क्रीनप्लेचा ऑस्कर जिंकला. जस्टीन ट्रायट आणि ऑर्थर हरारी यांना ऍनाटॉमी ऑफ अ फॉलसाठी सर्वोत्कृष्ट ओरिजन स्क्रीनप्लेचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.

द बॉय ऑफ द हेरॉन या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट ऍनिमेटेड फिचर फिल्मचा पुरस्कार जिंकला. हायो मियाझाकी आणि तोशियो सुझुकी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. वॉर इज ओव्हर या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट ऍनिमेटेड शॉर्ट फिल्मचा पुरस्कार जिंकला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!