मराठवाड्यात सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी, नेत्यांचे मनधरणीचे प्रयत्न निष्फळ; वाचा कोणत्या मतदारसंघात कोणाविरुद्ध कोणाचे बंड?


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  महायुती आणि महाविकास आघाडीची जागांची समीकरणे जुळवताना उसळलेल्या नाराजीचे रंग सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या मुदतीनंतरही कायम राहिले. उमेदवारी न मिळाल्याने बंडाचा झेंडा हाती घेणाऱ्यांनी पक्षश्रेष्ठी किंवा नेते मंडळींच्या मनधरणीलाही दाद दिली नाही. मराठवाड्यात सर्वच पक्षात बंडखोरांनी बंडाचे झेंडे कायम ठेवले. बंडखोरांमुळे बसणाऱ्या संभाव्य फटक्याचा अंदाज आता सर्वच राजकीय पक्षांना घ्यावा लागणार आहे.

मराठवाड्यातील ४६ मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर अर्ज भरणाऱ्यांनी दिवाळीनंतर एका दिवसातच अर्ज माघारीही घेतले. मात्र बंडखोरांनी अर्ज कायम ठेवले. घनसावंगीमधून शिवाजी चोथे, बीडमध्ये ज्योती मेटे, आष्टीमध्ये  भीमराव धोंडे या बंडखोरांनीही आपले अर्ज कायम ठेवले. नांदेडमध्ये महायुतीत बंडखोरी झाली. लातूर आणि धाराशीवमध्ये (उस्मानाबाद) बंडखोरांना शमवण्यात नेत्यांना यश आले.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता होती. त्यांच्याकडे असंख्य उमेदवारांनी उमेदवारी मागितली होती. उमेदवारी अर्ज भरा, निवडणूक लढवायची की नाही, हे ४ नोव्हेंबरला ठरवू, असे जरांगे यांनी सांगितल्यामुळे अनेक मतदारसंघात उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. जरांगेंच्या ताकदीवर बंडखोरी करू, असा काही जणांचा मनसुबा होता, परंतु जरांगेंनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्यामुळे त्यांच्या भरवश्यावर उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या बहुतेकांनी अर्ज मागे घेतले.

आष्टी विधानसभा मतदारसंघात महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. आष्टीत राष्ट्रवादीचे (अजित पवार) प्रताप आजबे आणि भाजपचे सुरेश धस या दोघांनाही अधिकृत एबी फॉर्म देण्यात आले आहेत. घनसावंगीमध्ये शिवसेना (उद्धव ठाकरे) नेते शिवाजीराव चोथे यांनी अपक्ष अर्ज कायम ठेवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) अधिकृत उमेदवार राजेश टोपे यांच्याविरुद्ध त्यांनी बंडखोरी केली.

अशी झाली बंडखोरी

मतदारसंघबंडखोर उमेदवारकोणाविरुद्ध बंडखोरी?
नांदेड उत्तरमिलिंद देशमुख (भाजप)बालाजी कल्याणकर (शिंदेसेना)
नांदेड दक्षिणदिलीप कंदकुर्ते (भाजप)आनंद बोंढारकर (शिंदेसेना)
मुखेडबालाजी खतगावकर (शिंदेसेना)डॉ. तुषार राठोड (भाजप)
हिंगोलीभाऊराव गोरेगावकर (काँग्रेस)
रामदास पाटील (भाजप)
रुपाली गोरेगावकर (ठाकरेसेना)
तान्हाजी मुटकुळे (भाजप)
कळमनुरीअजित मगर (ठाकरेसेना)संतोष टारफे (ठाकरेसेना)
बीडडॉ. ज्योती मेटे (राकाँ-शप)
अनिल जगताप (शिंदेसेना)
संदीप क्षीरसागर (राकाँ-शप)
योगेश क्षीरसागर (राकाँ-अप)
आष्टीभिमराव धोंडे (भाजप)सुरेश धस (भाजप)
बाळासाहेब आजबे (राकाँ-अप)
गेवराईलक्ष्मण पवार (भाजप)विजयसिंह पंडित (राकाँ-अप)
माजलगावरमेश आडसकर (राकाँ-शप)
बाबरी मुंडे (भाजप)
मोहन जगताप (राकाँ-शप)
प्रकाश सोळंके (राकाँ-अप)
पाथरीबाबाजानी दुर्राणी (राकाँ-शप)
माधवराव फड (भाजप)
सुरेश वरपूडकर (काँग्रेस)
राजेश विटेकर (राकाँ-अप)
अहमदपूरगणेश हाके (जस्वप)बाळासाहेब पाटील (राकाँ-अप)
औरंगाबाद मध्यबंडू ओक (ठाकरेसेना)बाळासाहेब थोरात (ठाकरेसेना)
फुलंब्रीरमेश पवार (शिंदेसेना)अनुराधा चव्हाण (भाजप)
गंगापूरप्रा. सुरेश सोनवणे (भाजप)प्रशांत बंब (भाजप)
वैजापूरएकनाथ जाधव (भाजप)रमेश बोरनारे (शिंदेसेना)
सिल्लोडदादाराव आळणे (भाजप)अब्दुल सत्तार (शिंदेसेना)
संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *