पुढचे तीन दिवस धोक्याचेः मराठवाडा, विदर्भ आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात विजांचा कडकडाट आणि वादळ वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता


मुंबईः दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आजपासून पुढचे तीन दिवस विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्य स्वरुपाच्या पावसाची शक्यता असल्याचे प्रादेशिक हवामान केंद्राने म्हटले आहे.

महाराष्ट्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यातील दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आज उद्या आणि परवा विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

रविवार, १३ एप्रिलः सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव (उस्मानाबाद), अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पावसाची शक्यता आहे. ताशी ३०ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

कोल्हापूरचा घाट, कोल्हापूर, सांगली, परभणी, हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

१४ एप्रिल, सोमवारः कोल्हापूर घाट, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव (उस्मानाबाद), चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पावसाची शक्यता आहे. ताशी ३०ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तर सिंधुदुर्ग, हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

१५ एप्रिल, मंगळवारः सोलापूर,  नांदेड, लातूर, धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यात जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पावसाची शक्यता आहे. ताशी ३०ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!