हिमायतनगरः ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कागदपत्रे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्रामसेवकाला जोड्याने हाणले, पहा व्हिडीओ


हिमायतनगरः  राज्यातील विविध जिल्ह्यांतील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदासह सदस्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू असून या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या एका ग्रामसेवकाला एका होतकरू ग्रामपंचायत सदस्याने भरचौकात जोड्याने मारहाण केली. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथे आज ही घटना घडली.

 राज्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबरला मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने आज सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ऑफलाइन पद्धतीने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी  मुदतवाढ दिली होती. त्यासाठी होतकरू उमेदवारांची शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी धडपड सुरू होती.

काहीही झाले तरी निवडणूक लढवायचीच असा चंग बांधलेल्या काही इच्छूक उमेदवारांच्या या धडपडीत काही ग्रामसेवक अडचणी निर्माण करत होते. काही जण नियमांवर बोट ठेवून तर काही ग्रामसेवक गावातील राजकारण्यांच्या हातचे बाहुले बनून. असाच एक प्रकार आज नांदेड जिह्यातील हिमायतनगरात घडला. दरेगाव येथील एक इच्छूक उमेदवार ग्रामसेवकाकडे आवश्यक कागदपत्रांची मागणी करत होता. हा ग्रामसेवक त्याला ती कागदपत्रे काही देत नव्हता. त्यामुळ  इच्छूक उमेदवाराचा पारा चढला. त्याने या ग्रामसेवकाला हिमायतनगर येथील कमानीजवळ गाठले आणि चारचौघात भरचौकात त्या ग्रामसेवकाला जोड्याने हाणले. के.डी. सूर्यवंशी असे त्या ग्रामसेवकाचे नाव असल्याचे सांगण्यात येते.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!