शिंदे गटाच्या नेत्या, अभिनेत्री दीपाली सय्यदने पाकिस्तानी राष्ट्रीयत्व स्वीकारले? जवळच्याच व्यक्तीचा खळबळजनक खुलासा


मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या नेत्या आणि भिनेत्री दीपाली सय्यद यांनी पाकिस्तानी राष्ट्रीयत्व स्वीकारला असून त्यांच्याकडे पाकिस्तानी पासपोर्टही आहे, असा खळबळजनक खुलासा दीपाली सय्यद यांचे माजी स्वीय सहायक भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. पाकिस्तानमध्ये दीपाली सय्यद यांचे नाव सोफिया सय्यद असल्याचा दावाही भाऊसाहेब शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केला आहे. शिंदे यांच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दीपाली सय्यद यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याबाबतचे पुरावे मी गेल्या तीन महिन्यात प्रशासनाला दिले आहेत. परंतु त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. मी तुम्हाला दीपाली सय्यद यांच्या बँक खात्याचा तपशील दिला, असे ते म्हणाले.

२०१९ मध्ये दीपाली सय्यद यांनी पाकिस्तानचा नकली पासपोर्ट देण्यात आला. त्या पासपोर्टची प्रतही मी तुम्हाला दिली आहे. दीपाली सय्यद यांनी पाकिस्तानी राष्ट्रीयत्व स्वीकारले आहे. पाकिस्तानात त्यांचे नाव सोफिया सय्यद असे आहे, असा दावा भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे.

दीपाली सय्यद यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम आणि त्याच्या बायकोशी संबंध असल्याचा दावाही भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. दीपाली सय्यद यांची लंडन आणि दुबई येथे मालमत्ता असल्याचा दावा शिंदे यांनी या पत्रकार परिषदेत केला आहे.

दीपाली सय्यद यांचे पाकिस्तानशी संबंध आहेत. त्या अनेकदा पाकिस्तानात जातात. कराचीत राहतात. त्यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम आणि त्याच्या बायकोशी संबंध आहेत. आम्हाला परवानगी द्या, आम्ही दीपाली सय्यदला भरदिवसा गोळ्या घालतो. आम्ही तुरूंगात जायलाही तयार आहोत, असे भाऊसाहेब शिंदे म्हणाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!