तीन इच्छुकांवर मात करून औरंगाबाद विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी डॉ. माधव सावरगावे!


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): औरंगाबाद विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी साम टीव्हीचे छत्रपती संभाजीनगरचे प्रतिनिधी डॉ. माधव सावरगावे यांची निवड करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगरातील माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मराठवाडा विभागीय संचालक (माहिती) कार्यालयात आयोजित बैठकीत डॉ. माधव गुणवंतराव सावरगावे यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

विभागीय अध्यक्ष निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. यावेळी समितीचे सदस्य चक्रधर दळवी, अनिल महाजन, विनोद काकडे, अरुण सुरडकर यांनी निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेतला. या निवडणुकीत डॉ.माधव सावरगावे यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अधिस्वीकृती समितीच्या पाच सदस्यांपैकी चार सदस्य रिंगणात उतरले होते. त्यात चक्रधर दळवी, डॉ. माधव सावरगावे, अनिल महाजन आणि विनोद काकडे यांचा समावेश होता. त्यात डॉ. माधव सावरगावे यांनी बाजी मारली आणि अध्यक्षपदी त्यांनी निवड जाहीर करण्यात आली.

ही निवडणूक प्रक्रिया औरंगाबादचे संचालक (माहिती) किशोर गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी समिती सदस्यांसह जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, माहिती अधिकारी मीरा ढास, सहायक संचालक गणेश फुंदे उपस्थित होते. डॉ. माधव सावरगावे यांच्या निवडीमुळे त्यांचे अभिनंदन केले जात आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!