‘डॉ. बामु’ची अधिसभा निवडणूकः पदवीधरच्या खुल्या प्रवर्गातील चार जागांवर उत्कर्ष पॅनलची आघाडी, पाचव्या जागेसाठी टस्सल!

औरंगाबादः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीतील पदवीधर निर्वाचक गणाच्या आरक्षित प्रवर्गातील पाचपैकी पाचही जागांवर दणदणीत विजय मिळवणाऱ्या महाविकास आघाडी प्रणीत विद्यापीठ उत्कर्ष पॅनलने खुल्या प्रवर्गातील पाचपैकी चार जागांवरही आघाडी घेतली आहे. पाचव्या जागेसाठी भाजपप्रणित विद्यापीठ विकास मंचचे उमेदवार स्पर्धेत आहेत. या जागेसाठी खरी टस्सल होईल, असे चित्र आहे. सध्या दुसऱ्या पसंतीक्रमाची मतमोजणी सुरू आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. पदवीधर निर्वाचक गणातील दहा जागांसाठी शनिवारी घेण्यात आलेल्या मतदानाची मतमोजणी सोमवारी सकाळी १० वाजेपासून सुरू झाली. मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात आरक्षित प्रवर्गातील पाच जागांची मतमोजणी झाली. या पाचपैकी पाचही जागा आ. सतीश चव्हण यांच्या नेतृत्वातील विद्यापीठ उत्कर्ष पॅनलने प्रचंड मताधिक्याने जिंकल्या. आता खुल्या प्रवर्गातील पाच जागांची मतमोजणी सध्या सुरू असून या पाचपैकी चार जागांवर पहिल्या पसंतीक्रमाच्या मतमोजणीत उत्कर्ष पॅनलचे चार उमेदवार आघाडीवर आहेत. विद्यापीठ विकास मंचच्या योगिता होके पाटील या उमेदवार स्पर्धेत उतल्यामुळे पाचव्या जागेसाठी टस्सल होण्याची शक्यता दिसत आहे.

 पहिल्या पसंतीक्रमात उमेदवारनिहाय मिळालेली मते अशीः

  • शेख जहूर खालेद (उत्कर्ष पॅनल): २ हजार ७१२
  • नरेंद्र हिरालाल काळे (उत्कर्ष पॅनल): २ हजार ६८०
  • भारत रामदास खैरनार (उत्कर्ष पॅनल): २ हजार २५४
  •  योगिता होके पाटील (विद्यापीठ विकास मंच): १ हजार ३०४
  • हरिदास भगवानराव सोमवंशी (उत्कर्ष पॅनल): १ हजार २६
  • संभाजी शिवाजीराव भोसले (उत्कर्ष पॅनल): ९५७
  •  राकेश सुहासराव भुतेकर (उत्कर्ष पॅनल): ८९०
  •  विजय दादासाहेब पवार (उत्कर्ष पॅनल): ७२१
  • लक्ष्मण उत्तमराव नवलेः ७१९
  • आशिष गोविंदप्रसाद नावंदरः ४६६
  • तुकाराम शरदराव सराफ­: ४४८
  • प्रकाश दादाराव इंगळेः ४०१

राखीव गटातील पाच जागांचे निकाल जाहीर, वाचा उमेदवारनिहाय मतदान

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीधर गटातील पाच राखील जागांचे निकाल मंगळवारी दुपारी जाहीर झाले. या विजयी उमेदवारांना मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. पूनम पाटील, दत्तात्रय भांगे पहिल्यांदाच तर सुनील मगरे, सुनील निकम दुसऱ्यांदा अधिसभेवर निवडूण आले तर सुभाष राऊत यांनी विजयाची हॅट्रिक केली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीधर गटातील अधिसभा निवडणुकीसाठी ५०.७५ टक्के मतदान झाले होते. एकूण ३६ हजार २५४ मतदारांपैकी १८ हजार ४०० पदवीधरांनी मतदानाचा हक्क बजावला. कुलगुरु डॉ. प्रमोद येवले व कुलसचिव डॉ भगवान साखळे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा विभागातील बॅडमिंटन सभागृहात सोमवार व मंगळवारी मतमोजणी झाली. बेगमपुराचे पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार व सिटी चौक पोलीस निरिक्षक अशोक भंडारे यांच्यासह मतमोजणी केंद्रास बंदोबस्त दिला. मतमोजणीसाठी प्रत्येक शिफ्टला ४० प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी असे एकूण १२० जण नेमण्यात आले. सकाळी दहा वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली.अधिष्ठाता डॉ.भालचंद्र वायकर,डॉ. प्रशांत अमृतकर, डॉ. चेतना सोनकांबळे, वाल्मिक सरवदे, डॉ.संजय सांभाळकर, डॉ.आनंद देशमुख हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते.मतमोजणीच्या कक्षात मंगळवारी (दि.२८) प्रकुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ .भगवान साखळे यांच्यासह निवडणुक समितीचे कॅप्टन डॉ.सुरेश गायकवाड, डॉ. प्रकाश पापडीवाल, डॉ.सतीश पाटील, डॉ.राम चव्हाण, डॉ.नंदीता पाटील, डॉ. भारती गवळी डॉ. प्रवीण यन्नावार, डॉ.कैलास पाथ्रीकर,, उपकुलसचिव डॉ.विष्णु क-हाळे, दिलीप भरड, संजय कवडे, प्रताप कलावंत, आदींची उपस्थिती होती. डॉ.पुरुषोत्तम देशमुख, डॉ.कैलास अंभुरे व व डॉ. पराग हासे यांनी निवडणूक प्रक्रियेचे संचलन केले . खुल्या जागांची प्रत्यक्ष मतमोजणी मंगळवारी दुपारी ४ वाजता सुरु करण्यात आली या प्रवर्गातून ५ उमेदवार निवडूण येणार असून कोटा २ हजार ७४६ मतांचा आला आहे.

सुभाष राऊत सर्वाधिक मताधिक्याने विजयीः या निवडणूकीत प्रवर्ग निहाय विजयी झालेले उमेदवार, त्यांना मिळालेली मते व प्रतिस्पर्धी उमेदवावरील आघाडी पुढीलप्रमाणे-

  • सुनील यादवराव मगरे (अनुसूचित जाती प्रवर्ग):८ हजार ९३६ मते- आघाडीः ६ हजार ८७१.
  • सुनील पुंडलिकराव निकम (अनुसूचित जमाती प्रवर्ग) ८ हजार ५१ मते आघाडीः ४ हजार ७२१
  • राऊत सुभाष किशनराव (इतर मागास प्रवर्ग):९ हजार ४३३ मते, आघाडीः ७ हजार ४७९
  • पूनम कैलास पाटील (महिला प्रवर्ग):८ हजार २ मते , आघाडीः ५ हजार ९४
  •  दत्तात्रय सुंदरराव भांगे (भटके विमुक्त जाती-जमाती) प्रवर्ग:७ हजार २२६ मते आघाडीः ४ हजार ७३३ मते

कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र देण्यात आले. प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, कुलसचिव तथा निवडणुक निर्णय अधिकारी डॉ.भगवान साखळे, निवडणुक समितीचे अयक्ष कॅप्टन डॉ.सुरेश गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रमाणपत्र देण्यात आले.

निवडणुक प्रवर्गनिहाय उमेदवारांना पडलेली मते पुढीलप्रमाणेः

प्रवर्गः अनुसूचित जाती (एसटी):(वैध मते १४,३२८)

१. मगरे सुनिल यादवरावः ८,९३६, विजयी

२. बनसोडे निवृत्ती विश्वनाथः१,२०१

३. दुर्गे जगन रुपचंदः ३८७

४. जोगदंड रोहित दिपक:७१२

५. कांबळे शिरीष मिलिंदराव:५३६

६. खाजेकर छाया राजु:२,०६५

७. तायडे राहुल भिमराव:४९१ 

प्रवर्ग:अनुसूचित जमाती (एसटी):(वैध मते:१४,२२८)

१. निकम सुनिल पुंडलिकराव:८,०५१, विजयी

२. बर्डे भागवत रामप्रसाद:१,६३०

३. माळी शहाजी विश्वनाथ:१,२१७

४. मोहम्मद अजारुद्दीन मोहम्मद सलीम:३,३३०

 प्रवर्ग:वि.जा/भ.ज (व्हीजे एनटी):(वैध मते:१३,४५१)

१. भांगे दत्तात्रय सुंदरराव: ७,२२६, विजयी

२. आघाव विनोद संतोष:१,३९०

३. कांबळे रखमाजी भागुजी:१,३२९

४. फड चंद्रकांत शिवाजीराव:२,४८९

५. सलामपुरे पुनम केशव:१,०१७ 

प्रवर्ग: इतर मागास वर्ग उमेदवार (ओबीसी):(वैध मते:१३,८४२)

१. राऊत सुभाष किसनराव:९,४३३, विजयी

२. जाधव संदीप दत्तात्रय:१,९५४

३. थोरात संतोष कारभारी:१,५३७

४. वाघ गणेश लक्ष्मण:९१८

प्रवर्ग: महिला उमेदवार:(वैध मते: १३,८८५)

१. पाटील पुनम कैलास: ८,००२, विजयी

२. गायकवाड नंदा लक्ष्मणराव: १,६९५

३. काळे हर्षेमाला नरेंद्र: १,२८०

४. तुपे ज्योती आसाराम: २,९०८ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!