डॉ. बामुच्या अभ्यास मंडळ अध्यक्ष निवडणुकीत निम्म्या उमेदवारांचे अर्ज अवैध


छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद): डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अभ्यास मंडळांच्या अध्यक्षपद निवडणुकीत दाखल ५९ अर्जांपैकी ३० उमेदवारांचे अर्ज छानणीत अवैध ठरले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांनी दिली.

 अधिसभा व अभ्यासमंडळ सदस्यांची निवडणुक पहिल्या टप्प्यात घेण्यात आली. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकरितीने पार पडली. दुसऱ्या टप्प्यात आता चार विद्याशाखांमधील ३८ अभ्यास मंडळाच्या अध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारिख ३ ते ११ एप्रिल ही होती. एकूण ३८ अभ्यास मंडळासाठी ५९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. या सर्व अर्जांची छानणी महात्मा फुले सभागृहात बुधवारी  करण्यात आली. तर वैध-अवैध उमेदवारांची  गुरुवारी सायंकाळी यादी घोषित करण्यात आली, या छानणी प्रक्रियेत कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांच्यासह निवडणूक समितीचे कॅप्टन डॉ.सुरेश गायकवाड, डॉ.सतीश पाटील, डॉ.भारती गवळी, डॉ.मुस्तजीब खान, डॉ.राम चव्हाण, डॉ.प्रवीण यन्नावार, डॉ.नंदिता पाटील, उपकुलसचिव दिलीप भरड, डॉ.आय.आर.मंझा आदींनी सहभाग घेतला. या प्रक्रियेसाठी भारत वाघ, अर्जुन खांड्रे, संजय लांब, राहुल जावळे आदी प्रयत्नशील आहेत. 

३० उमेदवारांचे अर्ज अवैध

अर्जांच्या छानणीनंतर ३० उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत.

अवैध उमेदवारांची नावे स्पष्टीकरणासह (with justification) घोषित करण्यात आली आहेत. या यादी संदर्भात कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्याकडे उमेदवारांना १५ एप्रिल सायंकाळपर्यंत अपिल दाखल करता येईल. या अपिलांवर १८ एप्रिल रोजी कुलगुरु सुनावणी घेणार आहेत. अर्ज मागे घेण्याचा दिवस १९ एप्रिल याच दिवशी उमेदवारांची यादी अंतिम यादी घोषित करण्यात येणार आहे. तर २५ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

निवडणूक होणारी अभ्यासमंडळे

मानव्य विद्याशाखा (१३ अभ्यास मंडळे) – अर्थशास्त्र, इंग्रजी, भुगोल, हिंदी, इतिहास, मराठी, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, लोकप्रशासन, समाजशास्त्र, ऊर्दु, सबस्टेंटिव्ह लॉ, प्रोसेजरल लॉ.

विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा (१३ अभ्यास मंडळ) वन्स्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, इलेक्ट्रानिक्स, मत्स्यविद्या, गणित, सुक्ष्मजिवशास्त्र, पदार्थविज्ञान, प्राणीशास्त्र, मेकॅनिकल, इंजिनिअरिंग, कॉॅम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रीकल, सिव्हील.

वाणिज्यशास्त्र व व्यवस्थापन शास्त्र (पाच अभ्यास मंडळे)

आंतर विद्याशाखा ७ अभ्यास मंडळे – शारिरीक शिक्षण संचालक, शारिरीक शिक्षण बीपीएड, शारिरीक शिक्षण प्राध्यापक, शैक्षणिक मानसशास्त्र, शैक्षणिक तत्वज्ञान, शैक्षणिक प्रशासन, गृहविज्ञान आदी विषयांचा समावेश आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!