दावोस परिषदेत महाराष्ट्रात गुंतवणुकीचे १ लाख ३७ हजार कोटींचे सामंजस्य करार
मुंबई: दावोस येथे गेल्या दोन दिवसांत विविध उद्योगांशी १ लाख ३७ हजार कोटीं गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले. प्रथमच दावोस इथे महाराष्ट्राचे इतक्या मोठ्या संख्येने करार झाल्यामुळे गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र गुंतवणूकदारांचे पसंतीचे राज्य असल्याचे ठळकपणे अधोरेखित झाले आहे, असे सांगून या गुंतवणूकदारांचे प्रकल्प लवकरात लवकर सुरु होतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
राज्यात उद्योग वाढीसाठी पोषक वातावरण असून उत्तम पायाभूत सुविधा आणि कुशल मनुष्यबळ आहे. त्यामुळे उद्योजकांना मॅग्नेटिक महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची संधी असून दावोसमध्ये महाराष्ट्रात विविध क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी उद्योजकांनी पसंती दर्शवली आहे. त्यासाठी त्यांचे आभार मानत त्यांना संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
हायटेक आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात ५४ हजार २७६ कोटी: प्रधानमंत...